ETV Bharat / entertainment

कान्स फिल्म फेस्टीव्हलमध्ये मुख्य श्रेणीत 30 वर्षानंतर झळकणार भारतीय चित्रपट - CANNES FILM FESTIVAL - CANNES FILM FESTIVAL

CANNES FILM FESTIVAL : कान्स फिल्म फेस्टीव्हल 2024 मध्ये 30 वर्षानंतर पहिल्यांदाच भारतीय चित्रपट मुख्य श्रेणीत स्पर्धा करत आहे. पायल कपाडिया दिग्दर्शित ऑल वुई इमॅजिन अ‍ॅज लाइट चित्रपटाला हा मान मिळालाय. पॅरीसमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत ही माहिती आयोजकांनी दिलीय.

CANNES 2024
कान्स फिल्म फेस्टीव्हल 2024
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 12, 2024, 4:48 PM IST

मुंबई -CANNES FILM FESTIVAL : ३० वर्षानंतर पहिल्यांदाच प्रतिष्ठित कान्स फिल्म फेस्टिव्हलमध्ये मुख्य स्पर्धेसाठी भारतीय चित्रपट प्रवेश करत आहे. पायल कपाडियाच्या 'ऑल वुई इमॅजिन अ‍ॅज लाइट' या चित्रपटाने महोत्सवाच्या सर्वोच्च स्पर्धा श्रेणीत स्थान मिळवलं आहे. ही आनंदाची बातमी पॅरिसमध्ये आयोजित पत्रकार परिषदेत आयरिस नोब्लोच आणि थियरी फ्रेमॉक्स, फेस्टिव्हलचे अध्यक्ष आणि जनरल-प्रतिनिधी यांनी सांगितली. या फिल्म फेस्टीव्हलमध्ये सामील होत असलेल्या गोष्टीतील विशेष उल्लेखनीय बाब म्हणजे, पायल कपाडिया या वर्षी स्पर्धा करणाऱ्या चार महिला दिग्दर्शकांपैकी एक आहेत.

पायल कपाडिया कान्ससाठी अनोळखी नाहीत, त्यांनी त्यांच्या मागील कामांमुळे लक्ष वेधले आहे. तिनं बनवलेला 'ए नाईट ऑफ नॉट नोईंग नथिंग' या माहितीपटाला 2021 मध्ये दिग्दर्शक फोर्टनाइटमध्ये सर्वोत्कृष्ट माहितीपटासाठी 'गोल्डन आय अवॉर्ड' मिळाला आणि 2017 मध्ये, तिचा चित्रपट 'आफ्टरनून क्लाउड्स' महोत्सवाच्या सिनेफॉन्डेशन विभागात प्रदर्शित झाला होता. पायल कपाडियाचा 'ऑल वुई इमॅजिन अ‍ॅज लाइट' हा चित्रपट फोर्ड कोपोला आणि अँड्रिया अरनॉल्ड सारख्या प्रतिष्ठित चित्रपट निर्मात्यांबरोबर प्रतिष्ठित पाल्मे डी'ओर पुरस्कारासाठी स्पर्धेत असणार आहे.

हा चित्रपट अनु आणि प्रभा या दोन नसर्सेच्या कथानकावर बेतलेला आहे. त्या दोघीही केरळमधून कामासाठी मुंबई शहरात आल्या आहेत आणि रुम पार्टनर म्हणून राहात आहेत. त्या दोघीही मैत्रिणी नाहीत, प्रभा ही वयानं मोठी, तिशी पार झालेली आहे. ती एका हॉस्पिटलमध्ये हेड नर्स म्हणून काम करते. तिचं वडिलांनी पसंत केलेल्या एका व्यक्तीशी लग्न झालंय आणि तो कामाच्या निमत्तानं परदेशात गेलाय आणि त्याच्या आयुष्यातून आता प्रभा वजा झाली आहे. तिची रुम पार्टनर अनु ही 20 वर्षांची तरुणी आहे, तिला एक बॉयफ्रेंड आहे पण ती त्याबद्दल कोणालाही सांगू शकत नाही. त्याला भेटण्याच्या जागा निवडताना तिची तारांबळ उडते. अशी ही एक दोन तरुणींची अनोखी कहानी आता कान्स फिल्म फेस्टीव्हलमध्ये झळकणार आहे.

या वर्षी कान्समध्ये भारतीय सिनेमासाठी 'ऑल वुई इमॅजिन अ‍ॅज लाइट' हा एकमेव चित्रपट नाही. संध्या सुरीचे पदार्पण असलेला 'संतोष' हा चित्रपट अन सरटेन रिगार्ड सेगमेंटमध्ये प्रदर्शित केला जाईल. हा चित्रपट म्हणजे ब्रिटिश-भारतीय चित्रपटसृष्टीसाठी एक महत्त्वपूर्ण कामगिरी समजली जाते.

इतिहासाचा विचार करता, कान्समध्ये भारतीय चित्रपटांची उपस्थिती विरळ असली तरी प्रभावी ठरली होती. 'नीचा नगर', 'आवारा' आणि 'गरम हवा' यांसारख्या चित्रपटांनी आपली छाप या महोत्सवावर सोडली आहे. 'नीचा नगर'ने प्रतिष्ठित पाल्मे डी'ओर देखील जिंकला आहे.

हेही वाचा -

  1. मन्नतच्या बाहेर शाहरुख खानच्या चाहत्यांना दिसला ईदचा चाँद, पाहा व्हिडिओ - Shahrukh Khan Eid
  2. शाहरुख चमकला, तापसी लग्नानंतर पहिल्यांदाच दिसली, स्टार स्टडेड पार्टीत इम्रान हाश्मीची मल्लिकाशी भेट - ANAND PANDIT PARTY
  3. स्टार स्टडेट ईद पार्टीमध्ये सलमान खानचा रुबाब, जल्लोष करणाऱ्या चाहत्यांना केलं अभिवादन - Salman Khan Eid

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.