ETV Bharat / entertainment

भारतात परतलेल्या पवन कल्याण यांनी बंदोबस्तातील अधिकाऱ्यांना दिलेल्या वागणूकीनं जिंकली मनं - Pawan Kalyan news - PAWAN KALYAN NEWS

मेगास्टार आणि आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण सिंगापूरहून भारतात परतले आहेत. हैदराबाद विमानतळावर गाडीत बसण्यापूर्वी त्यांनी बंदोबस्तावर असलेल्या पोलीस अधिकाऱ्यांना सलाम केल्यामुळं ते नेटिझन्समध्ये चर्चेचा विषय बनले आहेत.

Pawan Kalyan
पवन कल्याण (Pawan Kalyan (ANI))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 22, 2024, 4:01 PM IST

मुंबई - साऊथ चित्रपटांचा मेगास्टार आणि आंध्र प्रदेशचे उपमुख्यमंत्री पवन कल्याण सिंगापूरमध्ये पत्नी अण्णा लेझनेवा यांच्या दीक्षांत समारंभाला उपस्थित राहिल्यानंतर हैदराबाला परतले आहेत. पोलिस कर्मचाऱ्यांच्या टीमनं त्यांना बंदोबस्तात कारपर्यंत पोहोचवलं. मात्र, यावेळी पवन कल्याण यांच्या चेहऱ्यावर कोणाताही गर्व दिसत नव्हता, तर पोलिसांबद्दल त्यांनी दाखवलेल्या आदरामुळं नेटिझन्सची मनं जिंकली आहेत.

हैदराबादमधील एका पापाराझीने शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये, पवन कल्याण काळ्या पोशाखात हैदराबाद विमानतळावर येताना दिसत आहे. त्यांनी आपल्या कारमधून निघण्यापूर्वी अधिकाऱ्यांकडे आरानं पाहिलं आणि त्यांना हृदयस्पर्शी हावभावात सलाम केला. मेगास्टारच्या या आदरणीय कृतीनं सोशल मीडिया युजर्सनी त्यांच्याबद्दल आश्चर्यचकित केलं आहे.

व्हिडिओवर प्रतिक्रिया देताना, एका चाहत्यानं लिहिलं: "त्यांचा हा सलाम शेवटी पोलीस अधिकाऱ्यांना आहे. दुसऱ्यानं कमेंट केली: "तुम्ही, नेहमीच माझी प्रेरणा राहिला आहात.. लव्ह यू ऑलवेज पवनकल्याण सर" दुसऱ्या सोशल मीडिया युजर्सनं त्यांना सलाम केला आहे.

पवन कल्याण हे त्यांच्या पत्नीच्या पदवीदान समारंभात सहभागी होण्यासाठी सिंगापूरला गेले होते. त्यांच्या पत्नीनं सिंगापूरच्या नॅशनल युनिव्हर्सिटीमधून मास्टर ऑफ आर्ट्सची पदवी प्राप्त केली. उपमुख्यमंत्र्यांसाठी ही एक अल्पकालीन वैयक्तिक सहल होती. आता ते पुन्हा एकदा आपली राज्य कर्तव्ये सुरू करण्यासाठी मायदेशी परतले आहेत.

चित्रपटाच्या आघाडीवर, पवन कल्याण 2022 मध्ये प्रदर्शित झालेल्या 'भीमला नायक'मध्ये शेवटचे दिसले होते. तो 2020 मधील मल्याळम ब्लॉकबस्टर असलेल्या 'अय्यप्पनम कोशियुम'चा रिमेक होता. 'भीमला नायक'नंतर पवन यांनी त्यांच्या राजकीय कारकिर्दीवर लक्ष केंद्रित करण्यासाठी अभिनयातून ब्रेक घेतला परंतु गेल्या वर्षी प्रदर्शित झालेल्या त्यांचा पुतण्या साई धरम तेजच्या 'ब्रो' चित्रपटात त्यांनी महत्त्वाची भूमिका केली होती.

हेही वाचा -

  1. चंद्राबाबू नायडूंनी घेतली आंध्र प्रदेशच्या मुख्यमंत्री पदाची शपथ, पवन कल्याण उपमुख्यमंत्री - Chandrababu Naidu
  2. "ये पवन नहीं आँधी है" : नरेंद्र मोदींनी केलं जनसेना प्रमुख पवन कल्याणचं कौतुक - Pawan Kalyan
  3. निवडणूक जिंकल्यानंतर पवन कल्याणचं कुटुंबीयांकडून जंगी स्वागत, चिरंजीवीच्या पायावर झाला नतमस्तक - Pawan Kalyan

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.