मुंबई - 'बिग बॉस सीझन 14'मध्ये पवित्रा पुनिया आणि एजाज खान त्यांच्या नात्यामुळे खूप चर्चेत होते. या दोघांनी साखरपूडा देखील केला होता, मात्र चार वर्षे एकमेकांना डेट केल्यानंतर त्यांनी वेगळे होण्याचा निर्णय घेतला. आता अलीकडेच पवित्रानं एका मुलाखतीत, एजाज खानबद्दल एक खुलासा केला आहे. या मुलाखतीत ती एजाज खानसोबतच्या नात्याबद्दल बोलली. याशिवाय तिनं विभक्त होण्याचे कारण देखील सांगितलं. एजाज खानसोबत ब्रेकअप झाल्यानंतर पवित्रा ही पुन्हा प्रसिद्धीझोतात आली होती. या दोघांची ब्रेकअपची बातमी एकूण चाहत्यांना देखील धक्का पोहचला होता.
पवित्रा पुनियानं एक्स बॉयफ्रेंड एजाज खानबद्दल केला खुलासा : पवित्रा पुनियानं अलीकडेच एका मुलाखतीत तिच्या ब्रेकअपचं कारण सांगितलं. तिनं खुलासा केला की, ब्रेकअपदरम्यान एजाज खान तिला धर्म बदलण्याची मागणी करत होता. पवित्राला मुलाखतीत विचारण्यात आलं की, एकमेकांना चार वर्ष डेट केल्यानंतर कसे वेगळे झाले. यावर तिनं उत्तर दिलं, "माझ आणि एजाजचं पटत नव्हत आणि त्यामुळे मी नात तोडलं. मला एजाज हा नेहमीच प्रेशर देत होता, यामुळे मी त्याच्याबरोबर राहू शकली नाही. मी रिलेशनशिपच्या सुरुवातीलाच एजाजला सांगितलं होतं की, मी माझा धर्म बदलणार नाही, कारण जो व्यक्ती आपल्या धर्माशी एकनिष्ठ नाही तो तुझ्याबरोबर कसा राहू शकतो?" पुढं तिनं सांगतलं, "मुस्लिम मुलगी हिंदू घरात आली, तरी तिला धर्म बदलण्याची गरज नाही. याशिवाय हिंदू मुलगी मुस्लिम घरात गेली तर तिलाही धर्म बदलण्याची काहीही गरज नाही."
पवित्रा पुनियाला काम मिळणं झालं बंद : पवित्रानं पुढं सांगितलं की, "एजाज खानबरोबर मी 4 वर्षांच्या नात्यामधील दीड वर्ष मोठ्या कष्टानं घालवले आहे. मला माझ्या आयुष्यात कधीही याबद्दल पश्चाताप झाला नाही, पण एक गोष्ट मी नेहमी लक्षात ठेवेन, मी रिलेशनशिपमध्ये असताना माझ्या वडिलांच्या उपचारांकडे दुर्लक्ष केलं होतं. जेव्हा त्यांना माझी सर्वात जास्त गरज होती, त्यावेळी मी त्याच्याकडे जाऊ शकली नाही. मला त्याच्याकडे जाण्याची परवानगीही नव्हती." पवित्राचं एजाज खानबरोबर ब्रेकअप झाल्यानंतर तिला काम मिळणं देखील बंद झालं, याबद्दल देखील तिनं यावेळी उघड केलं. याशिवाय तिनं पुढं म्हटलं, "मला मनोरंजन क्षेत्रातील पार्ट्यांमध्ये देखील बोलावणेही बंद केलं होतं. मला काम काम न मिळाल्यानं अनेक अडचणीचा सामना करावा लागला होता." आता पवित्रा आपलं आयुष्य सुंदर पद्धतीनं जगत आहे.
हेही वाचा :