ETV Bharat / state

बेस्टच्या ताफ्यात लवकरच नवीन १३०० बसेस येणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची विधान परिषदेत माहिती - BEST FLEET

बेस्टच्या अपघातावर आता जालीम उपाय करण्यात येतोय. बेस्टच्या ताफ्यात आता १३०० नवीन बस येणार आहेत. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी याबाबतची घोषणा केली.

बेस्टच्या ताफ्यात लवकरच नवीन १३०० बसेस
बेस्टच्या ताफ्यात लवकरच नवीन १३०० बसेस (Etv Bharat)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : 3 hours ago

मुंबई - सोमवारी हिवाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी सुरुवातील विरोधकांनी ईव्हीएमविरोधात आंदोलन करत ईव्हीएम आणि सरकार विरोधात घोषणाबाजी केली. यानंतर सभागृहात बीड जिल्ह्यातील सरपंच संतोष देशमुख ​हत्या प्रकरणाचे पडसाद उमटले. यावरुन सत्ताधारी-विरोधकांमध्ये खडाजंगी झाल्याचं पाहायला मिळालं. दरम्यान, मुंबईतील कुर्ला येथे झालेल्या अपघातात सात लोकांचे बळी गेले. ही घटना ताजी असताना आता मुंबईतील बेस्टमधील अनेक बसेस ह्या जुन्या झाल्या आहेत. त्यामुळं आगामी काळात १३०० बसेस विकत घेण्याचा निर्णय झाला आहे. त्याची ऑर्डर काढली असून लवकरच बेस्टच्या ताफ्यात या बसेस दाखल होतील, अशी माहिती मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत दिली.

आयुर्मान संपलेल्या बसेसमुळं अपघात - गेल्या काही वर्षापासून मुंबईत बेस्ट बसेसच्या अपघातात मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. मुंबईत कुर्ला, सीएसएमटी आणि गोवंडीत बेस्ट बसचा अपघात झाला. कुर्ला येथील घटनेत ७ जण दगावले. तर ४२ जण जखमी झाले. गेल्या वर्षभरात बेस्टचे ३४७ अपघात झाले. अनेक निष्पापांचा यात बळी गेला. आयुर्मान संपलेल्या गाड्या रस्त्यावर आल्याने अपघात वाढत आहेत. परिणामी मुंबईकरांचा जीव धोक्यात आला आहे. शासनाने या घटनांची गांभीर्याने दखल घ्यावी. आयुर्मान संपलेल्या बस गाड्यांमुळे अपघात होणार नाहीत, याची काळजी घ्यावी अशा स्वरूपाचे शिवसेना (ठाकरे) आमदार सुनील शिंदे यांनी सभागृहात मुंबईतील बेस्ट बस अपघात प्रकरणी २८९ अंतर्गत स्थगन प्रस्ताव मांडला. यानंतर सभागृहात चर्चा घडवून आणण्याची मागणी केली.

सुरक्षेसाठी उपाययोजनेबाबत निर्देश - आमदार सुनील शिंदे यांनी स्थगन प्रस्ताव मांडला. यावर बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले की, बेस्टचे होणारे अपघात ही गंभीर घटना आहे. सरकार यावर नक्कीच गांभीर्यपूर्वक चर्चा करेल. जो अपघात घडला त्यासंदर्भात चालकाची अल्कोहोलची टेस्ट केली. परंतु, त्यामध्ये तसे काहीही आढळलेले नाही. तरीही त्याबाबत चालकांची अचानक तपासणी सुरू केली आहे. या अपघातांमधील सर्व वस्तूस्थिती जाणून घेऊन बेस्ट आणि प्रवाशांच्या सुरक्षेसाठी पालिका आयुक्तांना बेस्टच्या प्रमुखांसोबत बसून उपाययोजनेबाबत निर्देश दिले आहेत. लेखी निवेदनाद्वारे माहिती दिली जाईल, असं आश्वासन फडणवीस यांनी दिलं. बेस्ट आणि प्रवाशांच्या सुरक्षिततेसाठी पालिका आयुक्त, बेस्टचे प्रमुख यांनी उपाययोजना कराव्यात, अशा सूचना दिल्या. तसंच कुर्ला येथील दुर्घटनेतील वाहन चालकाने कोणतीही नशा केली नव्हती, असं निष्पन्न झाल्याचा खुलासा फडणवीसांनी केला.

हेही वाचा..

  1. कुर्ला बस अपघातातील सरकारी मदत कागदावरच, रुग्ण स्वखर्चाने घेताहेत उपचार
  2. कुर्ला बस अपघात; ब्रेक ऐवजी चालकानं अ‍ॅक्सिलेटर दाबला अन् गेला 7 जणांचा बळी ? ; कुर्ला बस अपघातात धक्कादायक खुलासे

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.