ETV Bharat / entertainment

ऑलिम्पिक जिंकणाऱ्या मनू भाकरसह सरबज्योत सिंगचे सेलिब्रिटींकडून अभिनंदन, वाचा कोण काय म्हणाले? - Paris Olympics 2024 - PARIS OLYMPICS 2024

Manu Bhaker and Sarabjot Singh: पॅरिस ऑलिम्पिक 2024मध्ये नेमबाजीत (मिश्र दुहेरी) कांस्यपदक जिंकल्याबद्दल विजेते मनू भाकर आणि सरबज्योत सिंग यांचं देशात अनेकजण कौतुक करत आहेत. चित्रपटसृष्टीमधील कलाकारांकडून भारतीय खेळाडुंवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Manu Bhaker and Sarabjot Singh
मनू भाकर आणि सरबज्योत सिंग ((Instagram))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Jul 31, 2024, 11:07 AM IST

मुंबई - Manu Bhaker and Sarabjot Singh: देशासाठी मंगळवार 30 जुलै हा दिवस खूप चांगला होता. भारतीय नेमबाज मनू भाकर आणि सरबज्योत सिंग यांनी पॅरिस ऑलिम्पिक 2024 मध्ये कांस्यपदक जिंकलं आहे. दोघांनी 10 मीटर एअर पिस्तूल (मिश्र दुहेरी) स्पर्धेत भाग घेतला होता. या दोघांनीही आपल्या उत्कृष्ट नेमबाजीनं पदक जिंकलं आहे. या शानदार विजयानंतर देशात आनंदाचं वातावरण आहे. आता त्यांच्या विजयाबद्दल संपूर्ण देश त्यांचं अभिनंदन करत आहे. चित्रपटसृष्टीतील स्टार्सनंदेखील दोन्ही खेळाडूंच्या कामगिरीचे कौतुक केले आहेत. या विजयानंतर त्याचं अनेकांनी अभिनंदन केलं आहे.

Manu Bhaker and Sarabjot Singh
मनू भाकर आणि सरबज्योत सिंग ((Instagram))

स्टार्सन केलं खेळाडूंचं अभिनंदन : बॉलिवूडमधील सुंदर जोडपे दीपिका पदुकोण आणि रणवीर सिंगनं मनू भाकर आणि सरबज्योत सिंग यांचं कांस्यपदक जिंकल्याबद्दल अभिनंदन केलंय. अजय देवगणनं सोशल मीडियावर पॅरिस ऑलिम्पिकमधील मनू आणि सरबज्योतचा एक फोटो शेअर करत लिहिलं, "बक्षीसावर नजर" या शब्दाला एका नवीन स्तर मिळत आहे. मला खूप चांगलं वाटलं. आणखी पदके आपल्याला पाहायला मिळतील, अशी आशा आहे." तसेच मीरा राजपूत कपूर, सोनाली बेंद्रे, अनिल कपूर, प्रिती झिंटा, पुलकित, सम्राट, महेश बाबू, सुनील शेट्टी, रकुल प्रीत, आयुष्मान खुराना यांच्यासह अनेक कलाकारांनी शूटर्सचे कौतुक करत त्यांचे अभिनंदन केलं आहे.

पॅरिस ऑलिम्पिक स्पर्धेत पदकांची संख्या दोन : याआधी मनु भाकरनं महिलांच्या 10 मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत कांस्य पदक पटकावलं होतं. यानंतर तिनं सरबज्योत सिंगबरोबर 10 मीटर एअर पिस्तूल स्पर्धेत (मिश्र दुहेरी) भाग घेतल्यानंतर एक इतिहास रचला आहे. या स्पर्धेत दोन्ही खेळाडूंनी उत्तम कामगिरी केली आहे. आता पॅरिस ऑलिम्पिकमधील भारताच्या पदकांची संख्या दोन झाली आहे. त्यामुळे भारतीय खूप खुश आहेत. या दोघांनी राष्ट्राचं नाव मोठ केल्यानंतर त्याचे फोटो सोशल मीडियावर शेअर करून त्याचा गौरव अनेकजण करत आहेत. आता येणाऱ्या काही दिवसात भारत आणखी पदक जिंकेल, अशी आशा प्रत्येक भारतीय करत आहेत.

हेही वाचा :

  1. मनू भाकरनं कांस्यपदक जिंकल्यानंतर बॉलिवूड सेलिब्रिटींकडून अभिनंदनाचा वर्षाव, वाचा कोण काय म्हणाले? - Celebs congratulate Manu Bhaker

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.