ETV Bharat / entertainment

परिणीती चोप्रानं 'अमर सिंग चमकीला'च्या यशानंतर सिद्धिविनायक मंदिरात घेतलं दर्शन - PARINEETI CHOPRA - PARINEETI CHOPRA

Parineeti Chopra : परिणीती चोप्राचा आता सोशल मीडियावर एक व्हिडिओ व्हायरल झाला आहे. या व्हिडिओमध्ये ती सिद्धिविनायक मंदिरामध्ये प्रसाद वाटप करताना दिसत आहे.

Parineeti Chopra
परिणीती चोप्रा
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 18, 2024, 1:18 PM IST

मुंबई - Parineeti Chopra : बॉलिवूड अभिनेत्री परिणीती चोप्रा तिच्या नुकत्याच प्रदर्शित झालेल्या 'अमर सिंग चमकिला' चित्रपटामुळे खूप चर्चेत आहे. 'अमर सिंग चमकिला' या चित्रपटानं जबरदस्त कामगिरी केली आहे. दरम्यान आता परिणीती या यशाबद्दल आभार मानण्यासाठी बुधवारी म्हणजेच 17 एप्रिल रोजी सिद्धिविनायक मंदिरात पोहोचली. चित्रपटाच्या यशाबद्दल तिनं बाप्पाचं आभार मानलं आहे. याशिवाय तिनं बाप्पाचं दर्शन झाल्यानंतर प्रसादाचं वाटपही केला आहे. परिणीती 'अमर सिंग चमकीला'मध्ये गायक दिलजीत दोसांझबरोबर मुख्य भूमिकेत दिसली आहे. पंजाबचा रॉकस्टार आणि त्याच्या काळातील सर्वाधिक लोकप्रिय कलाकार अमरसिंग चमकिलाची कहाणी खूप अप्रतिम आहे. हा चित्रपट सत्य घटनेवर आधारित आहे.

परिणीती चोप्रा पोहचली सिद्धिविनायक मंदिरात : या चित्रपटात परिणीतीनं अमर सिंग चमकिलाची पत्नी अमरजोत कौरची भूमिका साकारली आहे. 'अमर सिंग चमकीला' हा चित्रपट प्रेक्षकांना खूप आवडला आहे. या चित्रपटामध्ये परिणीतीनं खूप सुंदर अभिनय केला आहे. दरम्यान सोशल मीडियावर काही व्हिडिओ व्हायरल होत आहेत, ज्यात ती पांढऱ्या सुटमध्ये दिसत आहे. याशिवाय ती हातात मोदक घेऊन तिथे उपस्थित असलेल्या पापाराझीला प्रसाद देत आहे. अलीकडेच परिणीतीनं तिच्या भूमिकेबद्दल खुलासा केला की, तिच्या काही बॉलिवूडमधील सहकलाकारांनी तिला म्हटलं होत की, जर तिनं ही भूमिका साकरली तर तिचं चित्रपटसृष्टीमधील करिअर संपेल, ही भूमिका नाकारण्याचा करण्याचा सल्ला त्यांनी दिला होता.

परिणीतीसाठी भूमिका खूप खास : या भूमिकेबद्दल बोलताना परिणीतीनं सांगितलं की, तिच्यासाठी इम्तियाज अलीच्या चित्रपटात काम करणे हे स्वप्न पूर्ण होण्यासारखे आहे. या कामामुळे तिनं अनेक संधी गमावल्याचं तिनं सांगितलं. 'मी दोन वर्षांहून अधिक काळ 'चमकिला'चं शूटिंग करत असल्यानं माझे बरेचसे काम कमी झालं. आता मी खूप वाईट दिसत आहे आणि लोक असा अंदाज लावत होते की मी गरोदर आहे, पण मी बोटॉक्स घेतलं होतं.' दरम्यान परिणीतीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती शेवटी अक्षय कुमारबरोबर 'मिशन रानीगंज' या चित्रपटामध्ये दिसली होती.

हेही वाचा :

  1. सुनील शेट्टीनं जावई केएल राहुलला 32व्या वाढदिवसानिमित्त दिल्या शुभेच्छा, केला फोटो शेअर - KL Rahul 32nd Birthday
  2. 'दो और दो प्यार'च्या स्क्रिनिंगदरम्यान विद्या बालन आणि कार्तिक आर्यननं केली धमाल, व्हिडिओ व्हायरल - vidya balan
  3. शाहरुख खानच्या सुरक्षेत वाढ, रक्षकांच्या गराड्यात किंग खान विमानतळावर दिसला - पाहा व्हिडिओ - Shah Rukh Khan

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.