ETV Bharat / entertainment

शीर्षक गीत आणि गडबड गीतानंतर परेश मोकाशी दिग्दर्शित ‘नाच गं घुमा'चा धमाल ट्रेलर लॉन्च - Nach Gam Ghuma - NACH GAM GHUMA

'हरिश्चंद्राची फॅक्टरी', 'एलिझाबेथ एकादशी', 'वाळवी', 'आत्मपॉम्पलेट' अशा अनेक पुरस्कार प्राप्त चित्रपटाचं दिग्दर्शन करणारे परेश मोकाशी नव्या चित्रपटासह सज्ज झाले आहेत. त्यांचा 'नाच गं घुमा' हा नवा चित्रपट येत्या 1 मे रोजी प्रदर्शित होणार आहे. याचा ट्रेलर नुकताच लॉन्च करण्यात आला आहे.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 18, 2024, 2:43 PM IST

मुंबई - मोलकरीण हा शहरी मध्यम वर्गीय कुटुंबांना प्रफुल्लित करणारा शब्द. शहरातील महिला कामानिमित्त घराबाहेर पडू लागल्या आणि घरकाम आणि मुलं यांची काळजी घेण्यासाठी मोलकरणीची गरज भासू लागली. तिच्यावरील अवलंबित्व इतकं वाढलं की ती सोडून गेली की कुटुंबावर आभाळ कोसळल्यागत अवस्था होऊ लागली. मोलकरीण हा घरातील स्त्रीचा हळवा विषय झाला असून तिच्याशिवाय काहीही करू शकणार नाही ही भावना वाढीस लागलेली आहे. याच विषयाला धरून 'नाच गं घुमा' बनवण्यात आला असून घरात काम करणारी बाई घरातील बाईप्रमाणेच माणूस आहे हे अधोरेखित करण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे.

जेव्हा घरात कामवाली कामं करण्यासाठी असते तेव्हा सर्व कामं चुटकीसारखी होत असतात परंतु ती जेव्हा नसते तेव्हा तिची कामं करताना घरच्यांची त्रेधातिरपीट उडते. याप्रकारचे प्रसंग ट्रेलर मधून दिसतात आणि वास्तविक वाटतात. अर्थात चित्रपटातून कोणालाही कमी लेखण्यात आलं नसून प्रत्येकाच्या घरात घडणारे प्रसंग मांडण्यात आले आहेत आणि तेही मिश्किल पद्धतीनं मनोरंजनाचा हात पकडून. 'नाचं गं घुमा' चित्रपटातून मनोरंजन तर होणारच आहे परंतु एक संदेशही नकळत दिला जातो.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

निर्माते स्वप्नील जोशी , मधुगंधा कुलकर्णी, परेश मोकाशी, शर्मिष्ठा राऊत, तेजस देसाई आणि, तृप्ती पाटील यांचा बहुचर्चित चित्रपट 'नाच गं घुमा' चित्रपटाचे पोस्टर, शीर्षक गीत आणि गडबड गीतानंतर आता ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. या चित्रपटाचे लेखन मधुगंधा कुलकर्णी आणि परेश मोकाशी यांनी केले असून यात मुक्ता बर्वे, नम्रता संभेराव , सुकन्या कुलकर्णी, सुप्रिया पाठारे, सारंग साठे, मधुगंधा कुलकर्णी, शर्मिष्ठा राऊत आणि बालकलाकार मायरा वायकुळ यांच्या भूमिका आहेत.

हिरण्यगर्भ मनोरंजन निर्मित, परेश मोकाशी दिग्दर्शित आणि मुक्ता बर्वे व नम्रता संभेराव यांच्या प्रमुख भूमिका असलेला मराठी चित्रपट ‘नाच गं घुमा’ येत्या १ मे रोजी प्रदर्शित होणार आहे.

हेही वाचा -

  1. 'दो और दो प्यार'च्या स्क्रिनिंगदरम्यान विद्या बालन आणि कार्तिक आर्यननं केली धमाल, व्हिडिओ व्हायरल - vidya balan
  2. शाहरुख खानच्या सुरक्षेत वाढ, रक्षकांच्या गराड्यात किंग खान विमानतळावर दिसला - पाहा व्हिडिओ - Shah Rukh Khan
  3. दहशत निर्माण करण्यासाठी सलमानच्या घरावर गोळीबार, बिहारमध्येच रचला होता गोळीबाराचा कट; चौकशीत धक्कादायक खुलासे - Salman Khan House Firing

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.