ETV Bharat / entertainment

पंकज त्रिपाठीच्या मेहुण्याचं अपघातात निधन, बहीणही गंभीर जखमी - PANKAJ TRIPATHI BROTHER IN LAW DIED - PANKAJ TRIPATHI BROTHER IN LAW DIED

Pankaj Tripathi brother in law Died: पंकज त्रिपाठीच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. त्यांच्या मेहुण्याचं रस्ते अपघातात मृत्यू झाला आहे, तर बहिणीची प्रकृती चिंताजनक आहे.

Pankaj Tripathi brother in law Died
पंकज त्रिपाठीच्या मेहुण्याचा मृत्यू
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Apr 21, 2024, 11:55 AM IST

मुंबई Pankaj Tripathi brother in law Died : हिंदी चित्रपटसृष्टीमधील दिग्गज अभिनेता पंकज त्रिपाठीच्या घरी एक दुःखद घटना घडली आहे. त्यांची बहीण सरिता तिवारी आणि त्यांचा मेहुणा राजेश तिवारी उर्फ मुन्ना तिवारी यांचा शनिवारी 20 एप्रिल रोजी अपघात झाला. या अपघातात राजेश तिवारी यांचा दुर्दैवी मृत्यू झाला, तर सरिता तिवारी गंभीर या जखमी झाल्या आहेत. सध्या सरितावर धनबाद मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू आहेत. मिळालेल्या माहितीनिसार, हा अपघात दिल्ली-कोलकाता राष्ट्रीय महामार्ग-2 वर निरसा मार्केटमध्ये संध्याकाळी 4 च्या सुमारास झाला. राजेश आणि सरिता बिहारमधील गोपालगंज येथून पश्चिम बंगालमधील चित्तरंजन येथे जात असल्याचं सांगितलं जात आहे.

पंकज त्रिपाठीच्या मेहुणाचं निधन : निरसा मार्केट चौकात येण्यापूर्वी त्यांची कार डिव्हायडरला धडकली, त्यामुळे कारच्या पुढील भागाचं मोठं नुकसान झालं. यानंतर पोलिसांनी स्थानिक लोकांच्या मदतीनं राजेश आणि सरिता यांना कारमधून बाहेर काढले आणि त्यांना तात्काळ धनबाद मेडिकल कॉलेज हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. इथेच राजेशला मृत घोषित केले. आता सरिताची प्रकृती गंभीर असल्याचं सांगण्यात येत आहे. त्यांना आयसीयूमध्ये दाखल केलं गेलं आहे. सरिताच्या प्रकृतीबद्दल माहिती देताना आपत्कालीन एचओडी डॉ. दिनेश कुमार गिंडौरिया यांनी सांगितले की, "पंकज त्रिपाठी यांच्या बहिणीच्या पायाला फ्रॅक्चर झाला आहे. आता सध्या त्या धोक्याबाहेर आहेत. मात्र त्यांना ठीक होण्यासाठी थोडा वेळ लागेल."

ऑगस्ट 2023 मध्ये पंकज यांनी वडिलांना गमावलं होतं : पंकज यांचे मेहुणे राजेश हे रेल्वेचे कर्मचारी होते आणि त्यांची पोस्टिंग चित्तरंजन स्टेशनवर होती. दरम्यान पंकज त्रिपाठी यांनी गेल्या वर्षी ऑगस्ट महिन्यात वडिलांना गमावले होते. त्यांचे वडील पंडित बनारस तिवारी यांनी वयाच्या 99 व्या वर्षी अखेरचा श्वास घेतला. त्यांच्या अंत्यसंस्कारात जवळचे लोक आणि कुटुंबीय सहभागी झाले होते. वडिलांच्या निधनामुळे पंकज यांना धक्का बसला होता.

हेही वाचा :

  1. नुकतंच लग्न झालेली आमिर खानची मुलगा आयरा वाटतेय एकटेपणाची भीती, इन्स्टावर पोस्ट करुन दिली भीतीची माहिती - Ira Khan
  2. अथिया शेट्टीनं आयपीएल 2024 सामन्यात सीएसके विरुद्ध केएल राहुलच्या स्मॅशिंग परफॉर्मन्सचे फोटो केले शेअर - ATHIYA SHETTY SHARE PIC
  3. पुष्कर जोगचा स्कॅाटलॅंडमध्ये शूटिंग सुरू असताना अपघात, पाहा व्हिडिओ - Pushkar Jog

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.