मुंबई - Murder Mubarak : सारा अली खान, विजय वर्मा, पंकज त्रिपाठी, करिश्मा कपूर आणि डिंपल कपाडिया यांसारख्या स्टार्सची भूमिका असलेला 'मर्डर मुबारक' ओटीटी प्लॅटफॉर्म नेटफ्लिक्सवर रिलीज झाला आहे. 'मर्डर मुबारक' चित्रपटाचं दिग्दर्शन होमी अदजानिया यांनी केलंय. 'मर्डर मुबारक' चित्रपटाची कहाणी दिल्लीतील रॉयल क्लबमध्ये झालेल्या एका हत्येभोवती फिरते. या क्लबमध्ये फक्त शहरातील श्रीमंत व्यक्ती येत असतात. दरम्यान याचं क्लबमध्ये व्यायाम करताना लिओ मॅथ्यू या देखण्या मुलाचा मृत्यू झाल्यानं शहरातील सर्व प्रसिद्ध लोक संशयाच्या भोवऱ्यात येतात. या मृत्यूची चौकशी शहर एसीपी भवानी सिंग (पंकज त्रिपाठी) करत आहेत. हा फक्त एक अपघात आहे असे क्लबचे अध्यक्ष पोलिसांना सांगतो, पण एसीपी भवानी सिंग हा अपघात नसून पूर्वनियोजित खून असल्याचं मानतात आणि या हत्येचे चौकशी करतो.
'मर्डर मुबारक' चित्रपटाची कहाणी : या चित्रपटात जसजसा पोलिसांचा तपास पुढे सरकतो तसतसे श्रीमंत व्यक्तीच्या आयुष्याशी निगडीत वास्तव समोर येऊ लागतात. 'मर्डर मुबारक' चित्रपटाची कहाणी 'क्लब यू टू डेथ' या पुस्तकावर आधारित असून अनुजा चौहान, गझल धालीवाल, सुप्रतीम सेनगुप्ता यांनी संयुक्तपणे या चित्रपटासाठी लेखन केलं आहे. करिश्मा कपूरनं बऱ्याच काळानंतर चित्रपटात पुनरागमन केलं आहे. नूरानीच्या भूमिकेत शहनाज अप्रतिम दिसत आहे. कुकी कटोचच्या भूमिकेत डिंपल कपाडिया, रोशनी बत्राच्या भूमिकेत टिस्का चोप्रा, रणविजय सिंगच्या भूमिकेत संजय कपूर आणि लिओ मॅथ्यूच्या भूमिकेत आशिम गुलाटी यांनी जबरदस्त अभिनय केला आहे. या चित्रपटात विजय वर्मानं आकाश डोगराची भूमिका साकारली आहे.
पंकज त्रिपाठीचा अभिनय : 'मर्डर मुबारक' चित्रपटात सारा अली खान, विजय वर्मा, करिश्मा कपूर आणि संजय कपूर, डिंपल कपाडिया, टिस्का चोप्रा त्यांच्या पात्रांना न्याय देताना दिसले. डिंपल कपाडिया गेल्या वर्षी रणबीर कपूर स्टारर 'तू झुठी मैं मक्कर' या चित्रपटात दिसली होती. दरम्यान 2 तास 20 मिनिटांच्या मर्डर मुबारक' चित्रपटात असे वेगवेगळे वळण प्रेक्षकांना पाहायला मिळेल. या चित्रपटामधील अनेकांना पंकज त्रिपाठीचा अभिनय आवडला आहे. अनेकजण या चित्रपटासाठी पंकज त्रिपाठी यांचे कौतुक करत आहेत.
हेही वाचा :