मुंबई - Highest Paid Actor on Panchayat 3 : 'पंचायत 3' ओटीटीवर प्रसारित झाला आहे. रिलीज झाल्यापासून ही वेब सीरीज खूप चर्चेत आली आहे. यावेळी कलाकारांमध्ये जितेंद्र कुमार हा सर्वाधिक मानधन घेणारा अभिनेता असल्याची चर्चा आहे. त्यानं प्रत्येक एपिसोडसाठी मोठी रक्कम घेतल्याचं समोर आलं आहे. आता त्यानं या चर्चेला पूर्णविराम दिलाय. त्यानं ही अफवा असल्याचं म्हटलं आहे. एका मुलाखतीत जितेंद्र कुमारनं 'पंचायत 3'च्या फीबद्दल खुलासा केला. त्यानं सांगितलं, "मला वाटते की कोणाच्या फी आणि आर्थिक बाबींवर चर्चा करणे योग्य नाही. हे अयोग्य आहे. चर्चेतून काहीही चांगले निष्पन्न होत नाही. त्यामुळे अशा अफवांमध्ये कोणीही पडू नये, असं मला वाटते. अशा अफवा टाळल्या पाहिजेत, असे कोणताही प्रकार घडू नयेत."
'पंचायत ३'मध्ये जितेंद्र कुमारनं किती कमाई केली : मिळालेल्या माहितीनुसार 'पंचायत 3'च्या 'सचिवजी'नं या वेब सीरीजसाठी अंदाजे 70,000 रुपये प्रति एपिसोड घेतले आहेत. जितेंद्रनं 8 एपिसोड असलेल्या 'पंचायत'च्या तिसऱ्या सीझनमधून 5.6 लाख रुपये कमावले आहेत. तो सर्वाधिक कमाई करणारा अभिनेता आहे, तर दुसऱ्या क्रमांकावर नीना गुप्ता आहे. त्यांनी प्रति एपिसोड 50,000 रुपये कमावले आहेत. त्यांनी तिसऱ्या सीझनमध्ये एकूण 4,00,000 रुपये कमाई केल्याचं सांगण्यात येत आहे. या सीझनमधील तिसऱ्या क्रमांकावरील सर्वात जास्त मानधन घेणारा अभिनेता रघुबीर यादव आहेत. त्यांना प्रति एपिसोड 40,000 रुपये, म्हणजेच या सीझनमध्ये 3,20,000 रुपये दिले गेले आहे.
'पंचायत 3' झाला हिट : 'पंचायत 3' दीपक कुमार मिश्रा यांनी दिग्दर्शित केला आहे. चंदन कुमार यांनी लिहिलेला ही वेब सीरीज सुरुवातीपासूनच ॲमेजन प्राइम व्हिडियोवर खूप यशस्वी झाली आहे. दुसऱ्या सीझन आल्यानंतर अनेकजण तिसऱ्या सीझनची वाट पाहात होते. या शोचा तिसरा सीझन यावर्षी मे महिन्यात रिलीज झाला होता. जितेंद्रनं या शोमध्ये 'अभिषेक त्रिपाठी'ची भूमिका साकारली आहे. आता त्याला त्याचे चाहते प्रेमानं 'सचिवजी' म्हणतात. त्यानं शेअर केल्या अनेक फोटोवर काही चाहते 'सचिवजी' लिहिताना दिसतात. या सीझनलाही प्रेक्षकांचा सकारात्मक प्रतिसाद दिला आहे.
हेही वाचा :