ETV Bharat / entertainment

'द ग्रेट इंडियन कपिल शो' नेटफ्लिक्सवर आज स्ट्रीमिंग होईल, पाहा प्रोमो - the great indian kapil show - THE GREAT INDIAN KAPIL SHOW

The Great Indian Kapil Show : कपिल शर्माचा 'द ग्रेट इंडियन कपिल शो' हा नवीन शो नेटफ्लिक्सवर दिसणार आहे. या शोच्या प्रोमोमध्ये रणबीर कपूर हा कपिलबरोबर धमाल करताना दिसत आहे.

The Great Indian Kapil Show
द ग्रेट इंडियन कपिल शो
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 30, 2024, 10:31 AM IST

Updated : Mar 30, 2024, 12:28 PM IST

मुंबई - The Great Indian Kapil Show : कॉमेडियन कपिल शर्मा 'द ग्रेट इंडियन कपिल शो' हा नवीन शो प्रेक्षकांसाठी घेऊन येणार आहे. या शोबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता आहेत. यावेळी कपिलच्या शोमध्ये सुनील ग्रोव्हर आपल्या जुन्या अंदाजात दिसणार आहे. 'द ग्रेट इंडियन कपिल शो'मध्ये तेच जुने चेहरे पाहिला मिळणार आहेत. पण या सीझनमध्ये एक कॉमेडियन दिसणार नाही. भारती सिंगनं या शोला टाटाला बाय-बाय केलं असल्याची माहिती मिळाली आहे. आतापर्यंतच्या सीझनमध्ये कृष्णा अभिषेक, भारती सिंग, चंदू आणि इतर कलाकारांनी भरपूर मनोरंजन केलं आहे. आता हा हंगाम धमाकेदार असणार असल्याचं बोललं जात आहे.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

भारती सिंगनं केला खुलासा : 'द ग्रेट इंडियन कपिल शो' हा सीझन टेलिव्हिजनवर प्रसारित होणार नसून ओटीटीवर दिसणार आहे. नुकताच 'द ग्रेट इंडियन कपिल शो'चा ट्रेलर रिलीज झाला, ज्यामध्ये 'बुवा' भारती सिंग दिसली नाही. ट्रेलरमध्ये ती न दिसल्यामुळे तिच्याबाबतीत अफवा सोशल मीडियावर पसरू लागल्या. आता खुद्द भारतीनं या संदर्भात खुलासा केला आहे. एका दिलेल्या मुलाखतीत भारतीनं सांगितलं की, ''कपिलच्या शोमध्ये सहभागी होण्याचा तिचा कोणताही विचार नाही. मला फोन आला तर मी नक्की जाईन. मी सध्या माझे प्रोजेक्टस्, पॉडकास्ट आणि 'डान्स दिवाने'च्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे.'' भारती सिंगनं कपिल शर्मा शोच्या सर्व सीझनमध्ये 'बुवा'ची भूमिका साकारली होती. तिचे हे पात्र खूप प्रसिद्ध झालं आहे. तिच्या या पात्राला प्रेक्षकांनी भरभरून प्रेम दिलंय.

'द ग्रेट इंडियन कपिल शो' आज होणार प्रसारित : 'द ग्रेट इंडियन कपिल शो' 30 मार्चपासून नेटफ्लिक्सवर प्रसारित होणार आहे. या शोच्या प्रोमा सोशल मीडियावर खूप व्हायरल झाला आहे. 'द ग्रेट इंडियन कपिल शो'मध्ये रणबीर कपूर त्याची आई नीतू सिंग आणि त्याची बहिण रिद्धिमा कपूर साहनी बरोबर दिसणार आहे. व्हायरल झालेल्या प्रोमोमध्ये कपिल आणि सुनील हे रणबीर, नीतू आणि रिद्धिमाबरोबर धमाल करताना दिसत आहेत. दरम्यान, कपिलच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर, तो 'क्रू' चित्रपटामध्ये तब्बू , करिना कपूर खान, आणि क्रिती सेनॉनबरोबर दिसणार आहे.

हेही वाचा :

  1. "प्रिये, दोन अर्जुन कशी सांभळशील?" म्हणत अल्लु अर्जुननं केला पत्नीला सवाल - ALLU ARJUN AT MADAME TUSSAUDS DUBAI
  2. ७० एमएम स्क्रीनची मजा ७० सेंटीमीटरच्या मोबाईल स्क्रीनवर मिळणार नाही! : श्रुती मराठेची खास मुलाखत - interview with Shruti Marathe
  3. ‘वहिनी नमस्कार’ म्हणताच आलिया भट्ट लाजून झाली गोरी मोरी, पाहा व्हिडिओ - Alia Bhatt at Mumbai airport

Last Updated : Mar 30, 2024, 12:28 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.