ETV Bharat / entertainment

'बिग बॉस मराठी 5'मध्ये अभिजीत सावंतमुळे निक्की तांबोळी आणि अरबाज पटेल यांच्यात होणार वाद - Bigg Boss Marathi - BIGG BOSS MARATHI

Bigg Boss Marathi 5 : 'बिग बॉस मराठी 5' ची रंगत दिवसेंदिवस वाढत चालली आहे. अभिजीत सावंतमुळे निक्की आणि अरबाज यांच्यात वाद झाल्याचं प्रोमोमध्ये दाखविण्यात आलं आहे. आता हा प्रोमो पाहून यूजर्स निक्कीला ट्रोल करत आहेत.

Bigg Boss Marathi 5
बिग बॉस मराठी 5 (Instagram)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 20, 2024, 1:07 PM IST

मुंबई - Bigg Boss Marathi 5 : 'बिग बॉस मराठी 5' सीझन हा दिवसेंदिवस खूप धमाकेदार होत आहे. आता या शोचा चौथा आठवडा सुरू आहे. 'बिग बॉस'च्या घरात तीन आठवड्यात दोन गट पडलेले आहेत. दरम्यान 'ग्रुप बी' हा घरात रोजच कल्ला आणि दादागिरी करताना दिसतो. आतापर्यंत या शोमध्ये शांतपणे खेळणाऱ्या 'ग्रुप ए' मधील अभिजीत सावंत, धनंजय पोवार, पंढरीनाथ कांबळे आणि अंकिता वालावलकर हे आता 'ग्रुप बी'ला दमदार उत्तर देताना दिसत आहेत. यामधूनचं घनःश्याम दरोडेची चुगली निक्की तांबोळीजवळ केल्यानंतर दोघांमध्ये चांगलाच वाद पाहायला मिळाला.

निक्की तांबोळी आणि अरबाज पटेल यांच्या वाद : दरम्यान आजच्या एपिसोडमध्ये निक्की तांबोळी, अरबाज पटेल आणि अभिजीत सावंतमध्ये वाद पाहायला मिळणार आहे. 'बिग बॉस'च्या घरात तीन आठवड्यांनंतर घरातील काही सदस्य कायमच कल्ला करताना दिसत आहेत. 'बिग बॉस मराठी 5'च्या निर्मात्यांनी सोशल मीडियावर एक प्रोमो रिलीज केला आहे. यामध्ये निक्की ही अभिजीतची माफी मागताना दिसत आहे. यानंतर या गोष्टीमुळे अरबाज हा निक्कीवर चिडताना दिसत आहे. अरबाज इतका संतापतो की तो गार्डन एरियामध्ये सोफ्यासमोरील वस्तूला जोरात हात मारतो. अभिजीतमुळे अरबाज आणि निक्कीमध्ये फूट पडल्याचं प्रोमोमध्ये दाखविण्यात आलं आहे.

निक्की झाली ट्रोल, अभिजीतला मिळाला पाठिंबा : यापूर्वी 19 ऑगस्ट रोजी निक्की आणि घनःश्याममध्ये वाद झाल्यानंतर यूजर्स या दोघांनाही सोशल मीडियावर ट्रोल करत होते. दरम्यान सध्या घरात 'सत्याचा पंचनामा' टास्क सुरू आहे. सोमवारच्या एपिसोडमध्ये घनःश्याम दरोडे आणि आर्या जाधव यांचा 'सत्याचा पंचनामा' टास्क झाला. या दोघांनी टास्कदरम्यान खूप राडा केला होता. आजच्या एपिसोडमध्ये उर्वरीत सदस्यांचा टास्क होईल. दरम्यान आता व्हायरल होत असलेल्या प्रोमोमध्ये अनेकजण अभिजीत सावंतला पाठिंबा देत आहेत. याशिवाय काहीजण ही निक्कीला 'बिग बॉस'च्या घरातून बाहेर काढण्याची मागणी करताना दिसत आहेत.

हेही वाचा :

  1. 'बिग बॉस मराठी 5'मध्ये रक्षाबंधनाच्या दिवशी छोटा पुढारी आणि निक्की तांबोळी यांच्यात वाद! - Bigg Boss Marathi
  2. सूरज चव्हाणनं केली इच्छा व्यक्त, 'बिग बॉस' मराठीची ट्रॉफी जिंकेल? - Bigg Boss Marathi
  3. 'बिग बॉस मराठी 5'मध्ये अंकिता वालावलकर आणि पंढरीनाथ कांबळेबरोबर निक्की तांबोळीनं केला वाद - Bigg Boss Marathi Season 5 Day 16

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.