मुंबई - Lata Mangeshkar Abhang : डझनहून अधिक भाषांमधील हजारो चित्रपट गीतं, भाव गीत, गझल, देशभक्तीपर गीतं, गैर-फिल्मी गाणी, मराठीतील उत्कृष्ट अर्ध-शास्त्रीय गाणी अशा सर्व प्रकरची गाणी लता मंगेशकर यांनी गायली. परंतु या सर्वात त्यांनी गायलेले अभंग हे त्यांच्या हृदयाच्या सर्वाधिक जवळचे आहेत. 'अभंग' किंवा 'जे कालांतरानेही भंग पावत नाही' अशी ही त्यांची शैली त्यांच्या आध्यात्मिक शक्तीची अभिव्यक्ती होती. संत ज्ञानेश्वर, तुकाराम, नामदेव आणि एकनाथ यांचे विठ्ठलाची स्तुती करणारे अभंग हे शतकानुशतके टिकून आहेत कारण ते जवळजवळ प्रत्येक थरातील समाजमनाशी एकरुप झाले आहेत. अभंग हे ज्यांना 'संत साहित्य' (पारंपारिक धार्मिक साहित्य) आवडते, किंवा जे दरवर्षी पायी चालत पंढरपूरला जातात अशा 'वारकरी संप्रदाय' यांच्यामध्ये परिचित होते मात्र लताजींच्या भावपूर्ण सादरीकरणामुळे ते जगभर सर्वदूर पसरले, असेही काहीजण मानतात.
त्यांनी गायलेल्या अनेक अभंगांपैकी, संगीतकार श्रीनिवास खळे यांनी संगीत दिलेले 'अभंग तुकयाचे' आणि लताजींचे बंधू आणि एक महान संगीतकार हृदयनाथ मंगेशकर यांनी संगीतबद्ध केलेले 'संत ज्ञानेश्वरांचे अभंग' सर्वात लोकप्रिय संग्रह आहेत.
"मला 'संत रचना'नी नेहमीच भुरळ घातली आहे. जेव्हा मी ते वाचते आणि ऐकते तेव्हा मला भाव समाधीचा अनुभव येतो ... सर्व संत विठ्ठलाला 'माऊली' (आई) म्हणतात. माझ्यासाठी विठ्ठल आणि हे संत दोघेही 'माऊली स्वरूप' आहेत', म्हणून ही 'रचना' गाताना मी नेहमीच भारावून जाते," असे लताजींनी 2017 मध्ये एका मराठी दैनिकासाठी लिहिलेल्या लेखात म्हटले होते.
महाराष्ट्रातील थोर वक्ते आणि लेखक दिवंगत राम शेवाळकर यांनी एकदा स्पष्ट केल्याप्रमाणे, विशेषत: भक्ती परंपरेत, विठ्ठलाकडे 'आई' म्हणून पाहणे आवश्यक आहे आणि म्हणूनच 'विठू माऊली', आणि अगदी 'ज्ञानेश्वर माऊली' यांना ही संज्ञा वापरली जाते. लतादीदींच्या आवाजाने विठोबाच्या भक्तीची तीव्रता सहज आत्मसात केली आणि संत तुकाराम आणि ज्ञानेश्वरांच्या अभंगाच्या ओळींमध्ये दडलेली खोलवर उत्कटता त्यांनी अतिशय तळमळीने सादर केली.
'सुंदर ते ध्यान' मधील राग यमनमधील त्यांची गेय उत्कृष्टता असो, किंवा 'रुणू झुनू रे भ्रमारा' मधील त्यांच्या आवाजात गुंजत असलेल्या जल तरंगमध्ये मिसळणारे बासरीचे सूर असोत, किंवा 'अरे अरे ज्ञाना झाला सी पावन' या अभंगामधील त्यांच्या आर्त स्वरात मिसळणारे मंदिरातील घंटांचा कर्कश आवाज असो, किंवा 'पैल तो गे कहू कोकटाहे' च्या श्लोकात, किंवा सदाहरित सुखदायक 'मोगरा फुलाला' अशा प्रत्येक 'अभंग' प्रकारातून त्यांच्या खास सादरीकरणाचे वेगळेपण स्पष्ट होते.
"श्रद्धा', 'भक्ती' आणि 'आस्था' हे भाव त्यांच्या अभंग गायनात वेगळेपण दिसून येतात. त्यांच्या अप्रतिम गायन शैलीतून लताजी तुम्हाला 'अभंगां'च्या युगात घेऊन जातात," असे इंदिरा गांधी नॅशनल सेंटर फॉर परफॉर्मिंग आर्ट्स (IGNCA), नवी दिल्लीचे सदस्य-सचिव सच्चिदानंद जोशी म्हणाले.
"हृदयनाथ मंगेशकर आणि श्रीनिवास खळे यांसारख्या संगीत दिग्दर्शकांच्या विलक्षण रचनांनी लताजींच्या आवाजातून देवत्वाचा कळस गाठला. त्यांनी गायनाच्या विविध शैलीही जपल्या आणि वेगवेगळ्या संतांसाठी विलक्षण स्वरांचा वापर केला. त्यामुळेच ऐकल्यावर एक वेगळीच अनुभूती येते.' सुंदर ते ध्यान' आणि 'वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचारी'," असे जोशी यांनी आपल्या निरीक्षणातून सांगितले.
'साराभाई व्हर्सेस साराभाई' फेम अभिनेता सुमीत राघवन हा देखील एक गायक आहे. त्यांनी लता दीदींना देवी सरस्वती असे म्हटलंय. त्यांच्या अभंगाबद्दल बोलताना राघवन म्हणाला, "केवळ त्यांची हिंदी आणि मराठी गाणीच नाही, तर त्यांचे 'अभंग तुकयाचे' ही एक मेजवानी आहे. कोणीही या जादुई स्वरांचा आनंद वारंवार घेऊ शकतो. मंगेशकर आणि (श्रीनिवास) खळे काकांनी ऐतिहासिक कार्य साधून, संपूर्णपणे एक वेगळी शैली निर्माण केली आहे. हा एक अनमोल वारसा आहे."
राघवन पुढे म्हणाला, "लता दीदी या आमच्या पिढीसाठी दीपस्तंभ आहेत, नॉर्थ स्टार आहेत. त्यांच्या 'अभंगांनी' किती खोल प्रभाव टाकला आहे हे कोणीही मोजू शकतो. आजही 'लिटिल चॅम्प्स' किंवा 'सा रे ग म पा' स्पर्धांमधील अनेक तरुण स्पर्धक 'सुंदर ते ध्यान' हा अभंग निवडतात."
लतादीदींना 'संगीत सम्राज्ञी' किंवा 'गान कोकिला'पासून सुरुवात करून अनेक पदव्या बहाल करण्यात आल्या. करवीर पीठ शंकराचार्यांनी त्यांना 'स्वर माऊली' ही उपाधी दिली आहे. ज्यांनी त्यांचे अभंग ऐकले आहेत असे सर्वजण त्यांच्या या बहाल केलेल्या उपाधीशी सहमत असतील.
हेही वाचा -