ETV Bharat / entertainment

निक जोनास-देसी गर्लची जोडी पुन्हा चर्चेत, मित्राच्या लग्नात दिसला रोमॅंटिक अंदाज - Nick Jonas shares a romantic photo - NICK JONAS SHARES A ROMANTIC PHOTO

Nick Jonas Priyanka Chopra : हॉलिवूड गायक निक जोनास त्याच्या जवळच्या मित्राच्या लग्नात पत्नी आणि कुटुंबासह गेला होता. त्यानं आता सोशल मीडियावर या लग्नातील अनेक फोटो शेअर केले आहेत.

Nick Jonas and Priyanka Chopra
निक जोनास आणि प्रियांका चोप्रा ((Priyanka Chopra - Instagram))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Sep 2, 2024, 1:12 PM IST

मुंबई - Nick Jonas Priyanka Chopra: अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि गायक निक जोनास प्रसिद्ध स्टार जोडप्यांपैकी एक आहे. दोघेही एकमेकांवरील प्रेम नेहमीच व्यक्त करताना दिसतात. निक अनेकदा प्रियांकाची काळजी घेताना दिसतो. अलीकडेच या लव्हबर्ड्सचे काही फोटो समोर आले आहेत. फोटोंमध्ये दोघेही एकमेकांच्या नजरेत हरवलेले दिसत आहेत. अलीकडेच, निकनं त्याच्या खास मित्राच्या लग्नात पत्नी आणि कुटुंबासह हजेरी लावली.

निक आणि प्रियांकाचा फोटो व्हायरल : निकनं काल मध्यरात्री त्याच्या अधिकृत इंस्टाग्रामवर फोटो शेअर केले आहेत. या पोस्टद्वारे त्यानं नवविवाहित जोडप्याला शुभेच्छा दिल्या आहेत. शेअर केलेल्या पहिल्या फोटोत निक हा पत्नी प्रियांकाबरोबर फोटोसाठी पोझ देताना दिसत आहे. हा फोटो त्याचा खूप रोमॅंटिक आहे. या कार्यक्रमासाठी प्रियांकानं काळा कटआउट ड्रेस घातला होता. दुसरीकडे निकनं गुलाबी सूट परिधान केला होता. तसेच आणखी एका फोटोत निक हा भाऊ जो, फ्रँकलिन आणि आई डेनिस जोनासबरोबर दिसत आहेत. हे फोटो शेअर करताना निकनं लिहिलं, "अभिनंदन कॅथलीन डेलेसा आणि निक मिरचुक, आम्ही तुमचा आनंद साजरा करण्यासाठी तिथे आलो. याबद्दल आम्हाला खूप छान वाटत आहे." प्रियांका चोप्रानं देखील तिच्या इंस्टाग्राम स्टोरीवर निक आणि तिचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिनं नवविवाहित जोडप्याला त्यांच्या नवीन प्रवासासाठी शुभेच्छा दिल्या आहे.

निक आणि प्रियांकाची केलं चाहत्यांनी कौतुक : दरम्यान निकनं शेअर केलेल्या पोस्टवर आता अनेकजण कमेंट्स करत आहेत. या पोस्टवर एका यूजरनं लिहिलं, "सर्वात सुंदर जोडी." दुसऱ्या एकानं लिहिलं, दोघेही एकत्र खूप सुंदर दिसतात." आणखी एकानं लिहिलं, "मला ही जोडी खूप आवडते." याशिवाय काहीजण या पोस्टवर हार्ट आणि फायर इमोजी शेअर करून यांच्यावर प्रेम व्यक्त करताना दिसत आहेत. प्रियांका आणि निक सोशल मीडियावर अनेकदा आपल्या कुटुंबाबरोबरचे फोटो शेअर करत असतात. दोघेही सोशल मीडियावर खूप सक्रिय आहेत.

हेही वाचा :

  1. प्रियांका चोप्रानं कुटुंबासह 'द ब्लफ'च्या क्रूबरोबर मजेशीर झलक केली शेअर - priyanka share pics and videos
  2. अनंत अंबानींच्या लग्नात सहभागी झाल्यानंतर प्रियांका चोप्रानं ऑस्ट्रेलियातून मुलगी मालती मेरीबरोबर केला फोटो शेअर - priyanka chopra
  3. प्रियांका चोप्राचे फॅमिली व्हेकेशनमधील फोटो झाले सोशल मीडियावर व्हायरल, पाहा पोस्ट - Priyanka Chopra

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.