ETV Bharat / entertainment

रकुल प्रीत आणि जॅकी भगनानी यांनी गुवाहाटीमधील कामाख्या देवी मंदिरात कुटुंबासह घेतलं दर्शन - गुवाहाटीमधील कामाख्या देवी मंदिर

Rakul and Jackky at Kamakhya Devi Temple: अभिनेत्री रकुल प्रीत सिंग आणि अभिनेता जॅकी भगनानी लग्नाच्या 15 दिवसांनंतर कामाख्या देवीच्या दर्शनासाठी त्यांच्या कुटुंबासह गुवाहाटी येथे गेले आहेत. आता त्याचे येथील काही फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत.

Rakul and Jackky at Kamakhya Devi Temple
कामाख्या देवी मंदिरात रकुल आणि जॅकी
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 7, 2024, 2:05 PM IST

मुंबई - Rakul and Jackky at Kamakhya Devi Temple: हिंदी चित्रपटसृष्टीची सुंदर जोडी रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी आता त्यांच्या वैवाहिक आयुष्याचा आनंद घेत आहेत. हे जोडपे गुवाहाटीतील कामाख्या मंदिरात गेले. कामाख्या मातेचे दर्शन घेण्यासाठी हे दाम्पत्य कुटुंबासह येथे आले आहे. आता जोडप्यानं याठिकाणावरील काही फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोंमध्ये हे जोडपे देसी लूकमध्ये दिसत आहे. मंदिरातील फोटोमध्ये रकुल आणि जॅकी भक्तीमध्ये तल्लीन झालेले दिसत आहेत. रकुल आणि जॅकी या दोघांनीही आपापल्या इन्स्टा स्टोरीजवर हे फोटो शेअर केले आहेत.

Rakul and Jackky at Kamakhya Devi Temple
कामाख्या देवी मंदिरात रकुल आणि जॅकी

रकुल आणि जॅकी कामाख्या मंदिरात : याशिवाय त्यांनी या पोस्टमध्ये त्यांच्याबरोबर त्याचं कुटुंब असल्याचं देखील सांगितलं आहे. जॅकी पिवळ्या कुर्ता पायजमामध्ये तर रकुल प्रीत सिंग ऑरेंज सूट सलवारमध्ये आहे. या दाम्पत्याच्या कपाळावर त्रिपुंड लावल्यानं त्यांच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक दिसून येत आहे. या जोडप्याचे हे फोटो सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहेत. 21 फेब्रुवारीला गोव्यात लग्न झाल्यानंतर हे जोडपे अद्याप हनीमूनला गेलेले नाही. याशिवाय त्यांनी मुंबईत बी-टाऊन स्टार्ससाठी कोणतीही पार्टी आयोजित केलेली नाही.

रकुल प्रीत आणि जॅकी सिंगचे आगामी चित्रपट : लग्नानंतर रकुल आणि जॅकीचा एक व्हिडिओ व्हायरल झाला होता. या व्हिडिओत दोघेही 'बडे मियाँ छोटे मियाँ' या चित्रपटामधील गाण्यावर डान्स करताना दिसले. रकुल प्रीत सिंगचा पती जॅकी भगनानी हा 'बडे मियाँ छोटे मियाँ' चित्रपटाचा निर्माता आहे. हा चित्रपट येत्या ईदच्या मुहूर्तावर म्हणजेच एप्रिलमध्ये रिलीज होत आहे. या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत अक्षय कुमार, टायगर श्रॉफ, पृथ्वीराज सुकुमारन, मानुषी छिल्लर आणि सोनाक्षी सिन्हा हे कलाकार दिसणार आहेत. याशिवाय दुसरीकडे रकुल 'इंडियन 2' या तमिळ चित्रपटामध्ये दिसणार आहे. यानंतर ती 'जगथ जेंत्री' या तेलुगू चित्रपटामध्ये दिसणार आहे. तिचा अजय देवगणबरोबरचा 'दे दे प्यार दे 2' हा देखील हिंदी चित्रपट येणार आहे.

हेही वाचा :

  1. 'नाटू नाटू' गाण्यावर रामचरणसह क्रिकेटच्या मैदानात नाचला सचिन तेंडुलकर
  2. 'बिग बॉस-17'चा विजेता मुनावर फारुकीनं घेतली 'मास्टर ब्लास्टर' सचिन तेंडुलकरची विकेट
  3. श्वानाबरोबरच्या फोटोमुळे सारा तेंडुलकर आणि शुभमन गिलच्या डेटिंगबद्दल पसरल्या अफवा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.