ETV Bharat / entertainment

Pulkit Samrat and kriti kharbanda :'फुक्रे 3' फेम पुलकित आणि क्रितीनं मेहेंदी सेरेमनीचे फोटो केले शेअर - Pulkit Samrat and kriti kharbanda

Pulkit Samrat and kriti kharbanda : पुलकित सम्राट आणि क्रिती खरबंदा यांनी त्याच्या लग्नातील मेहेंदी सेरेमनीचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले आहेत. या फोटोमध्ये पुलकित त्याच्या वधूला मेहेंदी लावताना दिसत आहे.

Pulkit Samrat and kriti kharbanda
पुलकित सम्राट आणि क्रिती खरबंदा
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 20, 2024, 4:39 PM IST

मुंबई -Pulkit Samrat and kriti kharbanda : हिंदी चित्रपटसृष्टीचे सुंदर जोडपे अभिनेता पुलकित सम्राट आणि अभिनेत्री क्रिती खरबंदा यांनी नुकतेच गुरुग्राममधील ग्रँड आयटीसी भारत येथे सात फेरे घेतले आहेत. पुलकित आणि क्रितीला अनेकांनी त्यांच्या लग्नासाठी शुभेच्छा दिल्या आहेत. या जोडप्यानं 15 मार्च रोजी लग्न केलं असून त्यांनी 16 मार्च रोजी लग्नामधील काही फोटो चाहत्यांबरोबर शेअर केली आहेत. या जोडप्याच्या लग्नामधील फोटो सेलिब्रिटी आणि चाहत्यांना खूप आवडले आहेत. दरम्यान, पुलकित आणि क्रितीनं त्याच्या मेहंदी सेरेमनीचे सुंदर फोटो पोस्ट केले आहेत.

पुलकित आणि क्रितीच्या मेहेंदी सेरेमनीचे फोटो : पुलकित आणि क्रितीच्या मेहेंदी सेरेमनीच्या फोटोमध्ये त्यानं हिरव्या रंगाचा कुर्ता पायजमा घातला आहे आणि तो आपल्या वधूच्या हातावर मेहंदी लावत आहे. दुसरीकडे क्रितीनं मेहंदी समारंभासाठी ऑफ व्हाईट रंगाचा लेहेंगा परिधान केला आहे. यावर तिनं सुंदर असे दागिणे घातले आहेत. या लूकमध्ये ती खूप देखणी दिसत आहे. फोटोत पुलकित आणि क्रिती मेहंदी सोहळा खूप एन्जॉय करताना दिसत आहेत. या जोडप्यानं मेहेंदी सेरेमनीचे फोटो शेअर करत पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं, ''प्रेमाचा रंग असा आहे की आपण दंग झालो आहोत.'' याशिवाय शेअर केलेल्या एका फोटोत पुलकित नाचताना दिसत आहे.

पुलकित आणि क्रितीची प्रेमकहाणी : या फोटोच्या पोस्टवर अनेकजण प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहेत. 19 मार्च रोजी क्रितीनं तिच्या पहिल्या रसोईचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. या फोटोंमध्ये ती आजी आणि सासूबरोबर दिसत होती. क्रितीनं तिच्या पहिल्या रसोई समारंभासाठी गुलाबी रंगाचा ड्रेस परिधान केला होता. तिनं पहिल्या रसोईच्या दिवशी रव्याचा हलवा बनवला होता. पुलकित आणि क्रिती 2019 मध्ये 'पागलपंती' चित्रपटाच्या सेटवर भेटले होते. दोघांमध्ये आधी मैत्री झाली. यानंतर त्याच्या मैत्रीचं रुपांतर हे प्रेमात झालं. पुलकित सम्राटचे हे दुसरे लग्न आहे. यापूर्वी त्यानं 2014 मध्ये गर्लफ्रेंड श्वेता रोहिराबरोबर लग्न केलं होतं. मात्र 2015 मध्ये त्यांच नात तुटले आणि दोघांचा घटस्फोट झाला.

हेही वाचा :

  1. 'डॉन 3' चित्रपटासाठी चर्चेत असलेली शोभिता धुलिपालानं प्रियांका चोप्राबरोबरचा फोटो केला शेअर
  2. लवकरच आई होणाऱ्या दीपिका पदुकोणने शेअर केला दुर्मिळ सेल्फी, रणवीरनेही दिली उत्स्फूर्त प्रतिक्रिया
  3. Panchayat 3 Announcement : जितेंद्र कुमार आणि नीना गुप्ता स्टारर 'पंचायत सीझन3'ची झाली घोषणा

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.