ETV Bharat / entertainment

नवविवाहित जोडपे रकुल आणि जॅकीनं 'बडे मियाँ छोटे मियाँ'मधील 'मस्त मलंग झूम' गाण्यावर केला भन्नाट डान्स

Rakul Preet Singh and Jackky Bhagnani : नवविवाहित जोडपे रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी यांनी त्यांच्या डान्सचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या जोडप्याची सुंदर डान्स केमिस्ट्री व्हिडिओत पाहायला मिळत आहे.

Rakul Preet Singh and Jackky Bhagnani
रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 4, 2024, 2:25 PM IST

मुंबई - Rakul Preet Singh and Jackky Bhagnani : अभिनेत्री रकुल प्रीत सिंग आणि जॅकी भगनानी नुकतेच लग्न करून त्यांच्या घरात स्थायिक झाले आहेत. रकुल-जॅकीनं 21 फेब्रुवारी रोजी गोव्यात लग्न केलंय. त्याचा हा विवाह सोहळा खूप चर्चेत होता. या जोडप्यांच्या लग्नातील अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत. रकुल आणि जॅकीच्या लग्नात अनेक सेलेब्सनं हजेरी लावली होती. या जोडप्याला त्याच्या सुखी संसारासाठी अनेकांनी शुभेच्छा दिल्या आहेत. आता नवविवाहित जोडपे आता त्यांच्या नव्या वैवाहिक जीवनाचा आनंद घेताना दिसत आहे. रकुल आणि जॅकीचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे.

रकुल आणि जॅकीचा डान्स व्हिडिओ व्हायरल : रकुल आणि जॅकीनं हा व्हिडिओ आज 4 मार्च रोजी इन्स्टाग्राम सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये हे जोडपे 'बडे मियाँ छोटे मियाँ' चित्रपटातील 'मस्त मलंग झूम' या पार्टी गाण्यावर जोरदार डान्स करत आहे. व्हिडिओत रकुल आणि जॅकीनं काळ्या रंगाचा पोशाख परिधान केला आहे. हे जोडपे एकत्र खूप सुंदर दिसत आहे. या जोडप्याचा हा व्हिडिओ अनेकांना आवडत आहे. अनेकजण व्हिडिओवर प्रतिक्रिया देऊन रकुल आणि जॅकीवर प्रेमाचा वर्षाव करताना दिसत आहेत. व्हिडिओत लग्नानंतर या जोडप्याच्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक दिसून येत आहे.

रकुलने मानले टायगर श्रॉफचे आभार : हा व्हिडिओ शेअर करत या पोस्टच्या कॅप्शनमध्ये रकुलनं लिहिलं, ''आम्हाला या गाण्यावरील स्टेप्स शिकवल्याबद्दल टायगर श्रॉफचे खूप खूप धन्यवाद'. मला 'मस्त मलंग' स्टेप जुळवण्यात मजा आली.'' आता चाहते अली अब्बास जफर दिग्दर्शित 'बडे मियाँ छोटे मियाँ' या चित्रपटात अक्षय कुमार, टायगर श्रॉफ, सोनाक्षी सिन्हा, रकुल प्रीत सिंग आणि मानुषी छिल्लर मुख्य भूमिकेत दिसणार आहेत. ईदच्या मुहूर्तावर 9 एप्रिल, 2024 रोजी हा चित्रपट रुपेरी प्रदर्शित होणार आहे. सध्या या चित्रपटाचं प्रमोशन अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ करताना दिसत आहेत. या चित्रपटात हे दोन्हा स्टार्स अ‍ॅक्शन करताना दिसणार आहेत.

हेही वाचा :

  1. आई अंबेला समर्पित 'विश्वंभरी स्तुती'वर नीता अंबानीचा मंत्रमुग्ध करणार डान्स परफॉर्मन्स
  2. सारा अली स्टारर 'ऐ वतन मेरे वतन'चा ट्रेलर रिलीज ; पाहा व्हिडिओ
  3. सिद्धार्थ मल्होत्रासह करिना कपूरची अनंत राधिकाच्या प्री वेडिंगमध्ये हजेरी, सोशल मीडियात शेअर केले फोटो

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.