ETV Bharat / entertainment

ट्रोल करणाऱ्यांकडून नताशा स्टॅनकोविकची अचानक माफी, काय आहे कारण? - hardik jasmin dating rumours - HARDIK JASMIN DATING RUMOURS

Natasa Stankovic : हार्दिक पांड्या आणि गायक जास्मिन वालिया हे एकामेकांना डेट करत असल्याची सोशल मीडियात चर्चा सुरू आहेत. यादरम्यान काही नेटिझन्सनं नताशा स्टॅनकोविकची सोशल मीडियात माफी मागितली आहे.

Natasa Stankovic
जास्मिन वालिया (नताशा, हार्दिक आणि जास्मिन (ANI/IANS))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 15, 2024, 6:00 PM IST

मुंबई - Natasa Stankovic : टीम इंडियाचा अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याची पूर्वाश्रमीची पत्नी नताशा स्टॅनकोविक यांच्या घटस्फोटाची अनेक दिवस चर्चा झाली. मात्र, घटस्फोटानंतरही पुन्हा एकदा नताशा आणि हार्दिक पांड्या चर्चेत आले आहेत. त्यामागील कारण जाणून घेऊ.

हार्दिक हा मॉडेल जास्मिन वालियाबरोबर नात्यात असल्याची सोशल मीडियात चर्चा आहे. आता जस्मिनचा एक फोटो समोर आला आहे. या फोटोत जस्मिनबरोबर एक मिस्ट्री बॉयही बसलेला दिसत आहे. या मिस्ट्री बॉयच्या हातावर एक टॅटू आहे. सोशल मीडियातील दाव्यानुसार हा टॅटू हार्दिक पांड्याच्या टॅटूशी जुळत आहे. सोशल मीडियावर जास्मिन आणि हार्दिकच्या अफेअरच्या चर्चांना वेग आला आहे. त्यामुळे हार्दिकपासून विभक्त झाल्यानंतर नताशाला ट्रोल करणाऱ्यांनी आता तिची माफी मागितली आहे.

नताशाच्या पोस्टवर नेटिझन्सची माफी : नताशा हार्दिकपासून विभक्त झाल्यानंतर सर्बियामध्ये तिच्या घरी राहत आहे. तिथे नताशा मुलगा अगस्त्यबरोबर एन्जॉय करतानाचे फोटो अनेकदा सोशल मीडियात शेअर करत असते. नुकतेच नताशानं आकाशी रंगाच्या ड्रेसमध्ये काही सुंदर फोटो शेअर केले आहेत. यामध्ये एका युजरनं कमेंट करत लिहिलं आहे की, "सॉरी नताशा, संपूर्ण गोष्ट जाणून घेतल्याशिवाय आम्ही तुझ्यावर आरोप केले. तू त्याच्यापेक्षा अधिक चांगली आहेस." तर दुसऱ्या युजरनं लिहिलं की, " काळ्या पोरांपासून सावधान राहा." आणखी एकानं लिहिलं," "नात्यात कोणत्याही प्रकारचे दु:ख कोणालाही नको असते. हार्दिक हा महान खेळाडू आहे. पण चांगला पती आणि पिता होऊ शकला नाही." आता अनेकजण नताशाला सोशल मीडियाच्या माध्यामातून पाठिंबा दर्शवित आहेत.

हार्दिक जस्मिन वालियाला डेट करत आहे ? : सोशल मीडियावर व्हायरल झालेले हार्दिक आणि जस्मिनचे फोटो पाहून वेगेवेगळे अंदाज केले जात आहेत. एका दाव्यानुसार ते दोघेही एकत्र सुट्टीचा आनंद घेत आहेत. तसेच एकमेकांना डेट करत आहेत. मात्र, याबाबत दोघांनी अधिकृतपणं पुष्टी केलेली नाही. हार्दिक हा जस्मिनला इन्स्टाग्रामवर फॉलो करत आहे. दोघांनी एकाच पूलमधून व्हिडिओ आणि फोटो शेअर केले होते. तेव्हा सोशल मीडियावर त्यांच्या 'अफेअर'ची अफवा पसरण्यास सुरुवात झाली. दोघांचे फोटो हे त्यांच्या ग्रीसमधील सुट्ट्यांमधील आहेत. दरम्यान हार्दिक आणि नताशा यांनी 2020मध्ये लग्न केलं होतं. यानंतर या दोघांनी जुलै 2024 मध्ये सोशल मीडियावर एका पोस्टद्वारे घटस्फोट घेतल्याचं जाहीर केलं.

हेही वाचा :

  1. नताशा स्टॅनकोविकपासून विभक्त झाल्यानंतर हार्दिक पांड्या कोणाला करत आहे डेट? वाचा सविस्तर - HARDIK PANDYA
  2. हार्दिक पांड्यापासून वेगळे झाल्यानंतर एक्स बॉयफ्रेंड अली गोनीनं केला नताशा स्टॅनकोविकवर प्रेमाचा वर्षाव - Natasa Stankovic Ex Boyfriend
  3. हार्दिक पांड्याबरोबर घटस्फोट केल्यानंतर नताशानं मुलाबरोबर 'असा' वाढदिवस केला साजरा - Natasa Stankovic share pics

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.