ETV Bharat / entertainment

नवाजुद्दीन सिद्दीकी आणि आलियानं लग्नाचा 14 वा वाढदिवस केला साजरा, फोटो पाहून चाहते चकीत - Nawazuddin Siddiqui and Aaliya - NAWAZUDDIN SIDDIQUI AND AALIYA

Nawazuddin Siddiqui : नवाजुद्दीन सिद्दीकीनं त्याच्या लग्नाचा 14 वा वाढदिवस त्याच्या पूर्वाश्रमीच्या पत्नीबरोबर साजरा केला. आता दोघांनाही एकत्र पाहून आश्चर्यचकित चाहते झाले आहेत.

Nawazuddin Siddiqui
नवाजुद्दीन सिद्दीकी
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Mar 26, 2024, 2:23 PM IST

मुंबई - Nawazuddin Siddiqui : हिंदी चित्रपटसृष्टीतील अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे अनेकदा चर्चेत असतो. गेल्या वर्षी एका हायव्होल्टेज ड्रामानंतर त्यानं पत्नी आलिया सिद्दीकीपासून घटस्फोट घेतला आहे. घटस्फोटानंतर नवाजुद्दीनचा त्रास कमी झालेला नाही. नवाजुद्दीन सिद्दीकीनं आपल्या मुलांचा ताबा मिळावा म्हणून त्यानं आपल्या पत्नीला अनेकदा विनंती केली होती. यानंतर आलियानं बिग बॉस या रियलिटी शोमध्ये प्रवेश करून नवाजुद्दीन सिद्दीकीबद्दलचे अनेक खुलासे केले होते. आता जोडप्याबद्दल एक बातमी समोर आलेली आहे. ही बातमी कोणालाही आश्चर्यचकित करू शकते.

नवाजुद्दीन सिद्दीकीचा लग्नाचा वाढदिवस : नवाजुद्दीन सिद्दीकी आणि आलिया यांना पुन्हा एकदा एकत्र यायचं आहे, असं सध्या दिसत आहे. सोशल मीडियावर समोर आलेल्या या फोटोंद्वारे असा अंदाज लावल्या जात आहे. व्हायरल झालेल्या फोटोत नवाजुद्दीन आणि आलिया त्यांच्या लग्नाचा 14 वा वाढदिवस साजरा करताना दिसत आहे. आलियानं सोशल मीडियावर फोटो शेअर केले आहेत, ज्यामध्ये ती नवाजुद्दीन सिद्दीकी आणि तिच्या मुलांबरोबर आहेत. गेल्या काही वर्षांपासून आलियानं नवाजुद्दीन सिद्दीकी आणि त्याच्या कुटुंबावर अनेक आरोप केले होते. आता 25 मार्चला आलियानं तिचा फॅमिली फोटो शेअर करत नवाजुद्दीनवर प्रेमाचा वर्षाव केला आहे.

नवाजुद्दीन सिद्दीकीचे आगामी चित्रपट : या फोटोच्या कॅप्शनमध्ये तिनं लिहिलं, ''लग्नाच्या 14 व्या वाढदिवसानिमित्त तुला शुभेच्छा, तू माझ्यासाठी सर्वकाही आहेस. एवढेच नाही तर येणाऱ्या सर्व लग्नाचे वाढदिवस आपण एकत्र साजरे करावेत अशी मी प्रार्थना करते.'' या पोस्टवर अनेकजण प्रतिक्रिया देऊन या जोडप्याला एकत्र राहण्याचा सल्ला देत आहेत. दरम्यान नवाजुद्दीन सिद्दीकीच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो शेवटी 'सैंधव' या तेलुगू चित्रपटामध्ये अभिनेता व्यंकटेशबरोबर दिसला होता. आता पुढं नवाजुद्दीन 'फ्राईट फ्लाइट', 'सेक्शन 108' आणि 'नूरानी चेहरा' या चित्रपटांमध्ये दिसणार आहेत. याशिवाय तो 'पवनपुत्र भाईजान'मध्ये सलमान खानबरोबर स्क्रिन शेअर करताना दिसणार आहे.

हेही वाचा :

  1. राम चरणच्या वाढदिवसाच्या निमित्त 'गेम चेंजर'मधील पहिलं गाणं होईल रिलीज - Ram Charan CDP birthday Celebration
  2. महिला प्रतिष्ठेच्या गप्पा मारणाऱ्या कंगना रणौतनं उर्मिला मातोंडकरला 'सॉफ्ट पॉर्न स्टार' म्हणत केली होती हेटाळणी - Kangana Ranaut
  3. पाकिस्तानी तरुंगात अडकलेल्या मच्छीमारांची प्रेरणादायी गोष्ट 'थांडेल', नागा चैतन्यने सांगितला प्रेमकथेचा तपशील - Sai Pallavi in Thandel

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.