ETV Bharat / entertainment

19 वर्षांनंतर येतोय 'नवरा माझा नवसाचा' चित्रपटाचा सीक्वेल, अशोक सराफ असणार 'या' भूमिकेत! - Navra Maja Navsacha 2 - NAVRA MAJA NAVSACHA 2

Navra Maja Navsacha 2 : अभिनेता सचिन पिळगावकर आणि अभिनेता अशोक सराफ यांची भूमिका असलेला 'नवरा माझा नवसाचा' चित्रपटाचा सीक्वेल 19 वर्षांनंतर येणार आहे. आता हा चित्रपट 20 सप्टेंबरला रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे.

Navra Maja Navsacha 2
नवरा माझा नवसाचा 2 (Reporter)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 21, 2024, 1:49 PM IST

Updated : Jul 21, 2024, 2:22 PM IST

मुंबई - Navra Maja Navsacha 2 : 'नवरा माझा नवसाचा' या मराठी चित्रपटाला यश मिळालं होतं. या लोकप्रिय चित्रपटाचा सीक्वेल प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

मराठी चित्रपट हे आशय घनतेमुळे ओळखले जातात. तसेच मराठी चित्रपटांचे सीक्वेल देखील धमाकेदार असतात. किंबहुना हल्ली जवळपास प्रत्येक चित्रपटाच्या शेवटी पुढील भाग येऊ शकतो, असे अनेकदा दाखवले जाते. काही यशस्वी चित्रपटांचे सीक्वेल्स यावेत, असे प्रेक्षकांना वाटत असते. त्यातीलच एक चित्रपट म्हणजे 'नवरा माझा नवसाचा' आहे. मराठी चित्रनगरीत हा एक 'कल्ट' चित्रपट म्हणून ओळखला जातो. तब्बल 19 वर्षांनंतर या चित्रपटाचा सीक्वेल येणार असल्यानं प्रेक्षकांमध्ये कमालीची उत्सुकता आहे.

Navra Maja Navsacha 2
नवरा माझा नवसाचा 2 (Reporter)

'नवरा माझा नवसाचा 2' चित्रपट येईल भेटीला : 'नवरा माझा नवसाचा' मधील प्रेक्षकांचे लाडके त्रिकुट सचिन पिळगांवकर, सुप्रिया पिळगावकर, अशोक सराफ हे 'नवरा माझा नवसाचा 2'मध्ये प्रमुख भूमिकेत दिसणार आहेत. यावेळेस त्यांच्याबरोबर स्वप्नील जोशी आणि हेमल इंगळे ही रोमँटिक जोडी सुद्धा असेल. तसेच मराठीतील एनर्जेटिक कलाकार सिद्धार्थ जाधव महत्वपूर्ण भूकिकेत दिसणार आहे. ज्येष्ठ कलावंत निर्मिती सावंत, वैभव मांगले यांच्याही खास भूमिका असतील. या चित्रपटाची प्रदर्शन तारीख घोषीत करण्यासाठी चित्रपटाची टीम मुंबईतील सिद्धिविनायक मंदिरात पोहोचली. यावेळी चित्रपटाचे निर्माते आणि दिग्दर्शक सचिन पिळगावकर, अभिनेत्री सुप्रिया पिळगावकर आणि महाराष्ट्र भूषण अशोक सराफ उपस्थित राहिले.

'नवरा माझा नवसाचा 2'ची निर्मिती : सचिन पिळगावकर यांनी निर्मिती, कथा, पटकथा आणि दिग्दर्शन अशी सर्व महत्त्वाची जबाबदारी उचलली आहे. संतोष पवार यांनी या चित्रपटामधील संवाद लिहिले आहेत. पहिल्या भागातील प्रवास एसटीनं झाला होता. यावेळेस कोकण रेल्वेनं प्रवास असणार आहे. पहिल्या भागात बस कंडक्टर असलेले अशोक सराफ आता 'नवरा माझा नवसाचा 2' मध्ये तिकीट चेकर अर्थात टीसी झाले आहेत. सुश्रिया चित्र या निर्मिती संस्थेची निर्मिती असलेल्या 'नवरा माझा नवसाचा 2' या चित्रपटाचा कोकण रेल्वेमधील धमाल विनोदी प्रवास 20 सप्टेंबरपासून सुरू होणार आहे.

हेही वाचा-

Last Updated : Jul 21, 2024, 2:22 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.