मुंबई - Natasha Hardik Not Divorced : हार्दिक पांड्या आणि नताशा स्टॅनकोविक पुन्हा एकदा चर्चेत आले आहेत. गेल्या आठवड्यापासून या स्टार कपलच्या विभक्त होण्याच्या बातम्या येत आहेत. हार्दिक आणि नताशा घटस्फोट घेणार असल्याचं बोललं जात होतं. सोशल मीडियावर हे जोडपं एकमेकांकडे दुर्लक्ष करत होतं. या जोडप्यामध्ये बिनसल्याची चर्चा सुरू झाली होती.
असं दिसतं की आता या जोडप्यामध्ये सर्व काही ठीक आहे. खरं तर, आता नताशानं तिच्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे. नताशानं पती हार्दिकबरोबरचे डिलीट केलेले लग्नाचे फोटो इंस्टाग्रामवरून रिस्टोअर केले आहेत आणि युजर्स आता यावरही प्रतिक्रिया देत आहेत.
एका रेडीट युजरनं केला होता की नताशानं तिच्या अकाउंटमधून पांड्या आडनाव देखील काढून टाकलं आहे. त्याचवेळी घटस्फोटानंतर हार्दिक पांड्याला त्याची 70 टक्के संपत्ती पत्नी नताशाला द्यावी लागेल, असं बोललं जात होतं आणि या जोडप्याच्या घटस्फोटाच्या अफवेनं सोशल मीडियाचा बाजार देखील चांगलाच तापला होता.
आता नताशाने विभक्त होण्याचा अंदाज लावणाऱ्या त्या सर्व ट्रोलर्सची बोलती बंद केली आहे. तिनं हार्दिक पांड्याबरोबर तिच्या शाही लग्नाचे फोटो पुन्हा सोशल मीडियावर शेअर केले आहेत आणि याबरोबरच नताशानं हार्दिक बरोबरचे तिचे वैयक्तिक फोटोही शेअर केले आहेत. यानंतर अनेक जण तिला सर्व काही अलबेल आहे ना?, असं विचारत आहेत.
हार्दिक पांड्यानं यावेळी मुंबई इंडियन्स या आयपीएल संघाचं नेतृत्व केलं. त्याचा सामना पाहण्यासाठी नताशा एकदाही हजर नव्हती. त्यानंतर नताशाचा वाढदिवस साजरा झाला, त्यावेळी तिच्या सोशल मीडियावर हार्दिकची शुभेच्छा देणारी पोस्ट दिसली नव्हती. यानंतर दोघात बिनसल्याचं आणि दोघेही विभक्त होत असल्याच्या चर्चांना उधाण आलं होतं. नताशा आणि हार्दिकनं २०२० मध्ये लग्न केलं होतं.
हेही वाचा -