ETV Bharat / entertainment

नताशा स्टॅनकोविच मित्र अलेक्झांडर ॲलेक्सबरोबर डिनर डेटवर झाली स्पॉट, व्हिडिओ व्हायरल - NATASA AND ALEKSANDAR ALEX

भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्याची पूर्वाश्रमीची पत्नी नताशा स्टॅनकोविच तिच्या मित्राबरोबर रात्री उशिरा डिनर पार्टी करताना स्पॉट झाली.

Natasa Stankovic
नताशा स्टॅनकोविच (अलेक्झांडर ॲलेक्स आणि नताशा स्टॅनकोविच (ANI))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Oct 22, 2024, 10:02 AM IST

मुंबई: भारतीय क्रिकेटपटू हार्दिक पांड्यापासून घटस्फोट घेतल्यानंतर अभिनेत्री-मॉडेल नताशा स्टॅनकोविच पुन्हा एकदा चर्चेत आली आहे. नताशानं अलीकडील फोटो आणि व्हिडिओंद्वारे पुन्हा एकदा लोकांचं लक्ष वेधून घेतलं आहे. सोशल मीडियावर सोमवारी, 21 ऑक्टोबर रोजी व्हायरल झालेल्या व्हिडिओत नताशा मुंबईत तिचा मित्र अलेक्झांडर ॲलेक्सबरोबर लेट नाईट डिनरसाठी गेली होती. दोघेही जेवणानंतर रेस्टॉरंटमधून बाहेर पडताना स्पॉट झाले. याशिवाय नताशा तिची कार ड्रायव्ह करतानाचे फोटो देखील सोशल मीडियावर समोर आले आहेत .

नताशा स्टॅनकोविच आणि तिचा मित्र अलेक्झांडर ॲलेक्स झाले एकत्र स्पॉट : एका व्हायरल झालेल्या व्हिडिओत नताशा पापाराझींकडे पाहूण सुंदर अशी स्माईल देत आहे. आता तिचे सोशल मीडियावर व्हिडिओ यूजर्सनं पाहिल्यानंतर अनेकजण तिला ट्रोल करत आहेत. काही यूजर्स हार्दिकमुळे नताशाला फेम मिळाल्याचं म्हणताना दिसत आहेत. दरम्यान नताशाच्या लूकबद्दल बोलायचं झालं तर यावेळी तिनं पांढरी टी-शर्टसह काळ्या रंगाचा कोट आणि पँट परिधान केला होता. लूकला आणखी सुंदर बनविण्यासाठी तिनं चश्मा घातला होता. याशिवाय तिनं आपले केस मोकळे सोडले होते. दुसरीकडे नताशाचा मित्र अलेक्झांडरनं पांढरी टी-शर्ट आणि निळी पॅंट घातली होती.

नताशा आणि हार्दिक यांचा घटस्फोट : दरम्यान अलेक्झांडर हा एक फिटनेस ट्रेनर आहे, जो बॉलिवूड अभिनेत्री दिशा पटानीचा कथित बॉयफ्रेंड असल्यामुळे अनेकदा चर्चेत असतो. तसेच नताशा आणि हार्दिक चार वर्षे एकत्र राहिल्यानंतर, त्यांनी परस्पर संमतीनं वेगळे होण्याचा निर्णय घेतला. 18 जुलै 2024 रोजी त्यांनी त्यांच्या सोशल मीडिया हँडलवर याबद्दल एक अधिकृत नोट देखील शेअर केली. या दोघांना एक मुलगा देखील आहे, ज्याचं नाव अगस्त्य आहे. जेव्हा नताशानं तिच्या सोशल मीडिया प्रोफाइलवरून तिच्या लग्नाचे फोटो काढून टाकले, तेव्हा तिच्या घटस्फोटाच्या अफवा सोशल मीडियावर वेगानं पसरल्या होत्या. मात्र हार्दिकनं आतापर्यत त्याच्या इंस्टाग्रामवरचे नताशाबरोबरचे फोटो डिलीट केले नाही. आता नताशा आणि हार्दिक सध्या त्याच्या करिअरवर लक्ष देत आहेत.

हेही वाचा :

  1. दोनदा लग्न करुनही सिंगल, वर्षाला कमावतो कोट्यवधी रुपये; 'बर्थडे बॉय' हार्दिकची कशी आहे कारकीर्द?.
  2. हार्दिक पांड्याची पूर्वाश्रमीची पत्नी नताशा स्टॅनकोविकचा कथित बॉयफ्रेंडबरोबरचा पूल व्हिडिओ व्हायरल - hardik pandya and natasa stankovic
  3. ट्रोल करणाऱ्यांकडून नताशा स्टॅनकोविकची अचानक माफी, काय आहे कारण? - hardik jasmin dating rumours

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.