मुंबई: नताशा स्टॅनकोविक आणि हार्दिक पांड्या यांनी यावर्षी जुलैमध्ये घटस्फोटाची घोषणा केल्यानंतर दोघेही चर्चेत आले होते. या जोडप्याला अगस्त्य नावाचा एक मुलगा देखील आहे. दरम्यान, काही दिवसापूर्वी अशी अफवा पसरली होती की, नताशा आपल्या मुलासह सर्बियाला परत जाणार आहे. आता अलीकडेच नताशानं एका मुलाखतीत तिच्या घटस्फोटाबद्दल सांगितलं आहे. तिनं आपल्या पूर्वाश्रमीचा पती हार्दिक पांड्याबद्दल एक विधान केलंय. नताशा स्टॅनकोविकनं क्रिकेटपटू हार्दिक पांड्यापासून विभक्त झाल्यानंतर तिच्या आयुष्याविषयी माहिती देत म्हटलं, "आम्ही (हार्दिक आणि मी) अजूनही एक कुटुंब आहोत. आम्हाला एक मूल आहे. हे मूल नेहमीच आमचे असेल, अगस्त्याला आपल्या आई-वडिलांच्या प्रेमाची गरज आहे. "
नताशा स्टॅनकोविकनं केला खुलासा : सर्बियाला जाण्याबद्दल बोलतांना नताशानं म्हटलं," गेल्या 10 वर्षांपासून मी दरवर्षी त्याच वेळी सर्बियाला जात असते." नताशनं सर्बियात परतण्याच्या अफवाही फेटाळून लावल्या आहेत. या मुलाखतीदरम्यान तिनं पुढं म्हटलं, "मी परत सर्बियाला जाणार नाही, कारण अगस्त्याची शाळा इथे आहे आणि मला त्याच्या अभ्यासात अडथळा आणायचा नाही. त्याच्यासाठी मला इथे खंबीर राहावे लागले. अगस्त्यबरोबर राहून मी स्वतःवर प्रेम करायला शिकले आहे. मुलासाठी आनंदी राहणे, हे मला समजले आहे. आई म्हणून आनंदी आणि मानसिकदृष्ट्या निरोगी राहणे महत्वाचे आहे. मला फक्त खंबीरपणे उभे राहायचे होते. कोणी काहीही म्हणत असले तरी, त्या क्षणी, तुम्हाला तुमची योग्यता कळते, तुम्ही कोण आहात हे तुम्हाला ठाऊक आहे आणि तुमचे हृदय शुद्ध आहे हे तुम्हाला माहीत आहे, कोणीही तुम्हाला हादरवू शकत नाही."
नताशा आणि हार्दिकचा घटस्फोट : नताशा स्टॅनकोविच आणि हार्दिक पांड्यानं लग्नाच्या चार वर्षांनंतर घटस्फोटाची घोषणा करून त्याच्या चाहत्यांना खूप मोठा धक्का दिला होता. या दोघांनी त्यांच्या सोशल मीडियावर पोस्ट केलेल्या संयुक्त निवेदनात घटस्फोटाबद्दलची बातमी शेअर केली. दरम्यान नताशाच्या वर्क फ्रंटवर, बोलायचं झालं तर ती प्रीतिंदरच्या 'तेरे करके' म्युझिक व्हिडिओमध्ये दिसली होती.
हेही वाचा :
- नताशा स्टॅनकोविच मित्र अलेक्झांडर ॲलेक्सबरोबर डिनर डेटवर झाली स्पॉट, व्हिडिओ व्हायरल
- दोनदा लग्न करुनही सिंगल, वर्षाला कमावतो कोट्यवधी रुपये; 'बर्थडे बॉय' हार्दिकची कशी आहे कारकीर्द?
- हार्दिक पांड्याची पूर्वाश्रमीची पत्नी नताशा स्टॅनकोविकचा कथित बॉयफ्रेंडबरोबरचा पूल व्हिडिओ व्हायरल - hardik pandya and natasa stankovic