मुंबई - Natasa Stankovic : भारतीय क्रिकेटर हार्दिक पांड्या त्याच्या व्यावसायिक आयुष्याबरोबर त्याच्या वैयक्तिक आयुष्यामुळे देखील चर्चेत आहे. हार्दिकची पत्नी नताशा स्टॅनकोविचनं काही दिवसांपूर्वी घटस्फोटाबद्दल विधान केलं होतं. दरम्यान हार्दिक आणि नताशा दोघेही यावर सध्या मौन बाळगून आहेत, पण नताशा तिच्या इन्स्टाग्राम पोस्टच्या माध्यमातून अचानक आलेल्या विचाराबद्दल सांगितलं आहे. नताशा स्टॅनकोविच लाइमलाइटपासून सध्या दूर आहे, मात्र ती इन्स्टाग्रामवर खूप सक्रिय असते. नताशाला घटस्फोटच्या अफवामुळे अनेकांनी ट्रोल केलं होतं. ती आता इंस्टाग्राम स्टोरीवर शेअर केलेल्या व्हिडिओमध्ये कॉफी पिताना बोलत आहे.
नताशा स्टॅनकोविचनं शेअर केला व्हिडिओ :या व्हिडिओमध्ये ती म्हणते, "मी बसून कॉफी पीत होते आणि मला अचानक एक विचार आला की लोक किती कोणाविषयी जजमेंटल होतात. जेव्हा आजूबाजूला काही वेगळे काही चालले असेल तर ते पाहून आपण थांबत नाही. त्याचा आपण काही विचार देखील करत नाही. आपण त्यांच्याबद्दल त्वरित निर्णय घेतो. यानंतर ती व्यक्ती कोणत्या परिस्थितीतून जात आहेत, त्या क्षणी त्याच्या बरोबर काय होत याबद्दल आपण पाहत नाही, म्हणून मला सांगायचे आहे की, आपण थोडी कमी जजमेंटल व्हायला पाहिजे आणि सहानुभूती दाखवायला हवी."
नताशा स्टॅनकोविचचे हार्दिक पांड्याबरोबरचे नाते : टी-20 विश्वचषक जिंकल्यानंतर हार्दिक पांड्या खूप चर्चेत होता, त्याच्याबद्दल सर्वत्र चर्चा होत होती, पण त्याची पत्नी नताशानं त्याचे अभिनंदन केलं नाही. यामुळे नताशा ट्रोल झाली, जरी तिचे हार्दिकबरोबरचे संबंध चांगले नसल्याच्या अफवा आधीच पसरत होत्या, तरीही तिनं त्याला अभिनंदन करायला पाहिजे होतं, असं अनेकांनी प्रतिक्रिया दिली होती. घटस्फोटाबद्दल सध्या नताशा आणि हार्दिक यांनी काहीही सांगितलेलं नाही. आता अनेकजण हार्दिक आणि नताशामध्ये काही ठिक नसल्याचं म्हणत आहेत. दरम्यान नताशा स्टॅनकोविचच्या बॉलिवूडमधील वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर ती 'लुप्ट' आणि '7 अवर्स टू गो' या चित्रपटांमध्ये दिसली आहे.