ETV Bharat / entertainment

तनुश्री दत्ताच्या लैंगिक छळाच्या आरोपांवर नाना पाटेकरांनी दिली 'ही' प्रतिक्रिया - nana patekar - NANA PATEKAR

Nana Patekar and Tanushree Dutta : तनुश्री दत्ताच्या लैंगिक छळाच्या आरोपांवर आता नाना पाटेकरनं मौन सोडलंय. त्यांनी दिलेल्या एका मुलखतीत काही खुलासे केले आहेत.

Nana Patekar and Tanushree Dutta
तनुश्री दत्ता आणि नाना पाटेकर (instagram)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 23, 2024, 3:14 PM IST

मुंबई - Nana Patekar and Tanushree Dutta : बॉलिवूडचा ज्येष्ठ अभिनेता नाना पाटेकर यांचं नाव अनेकदा वादात सापडलं आहे. 2018 मध्ये तनुश्री दत्तानं त्याच्यावर लैंगिक छळाचा गंभीर आरोप केला होता. यानंतर त्यांची बदनामी झाली होती. तनुश्री दत्ताच्या म्हणण्यानुसार, 'हॉर्न ओके प्लीज'च्या गाण्याच्या शूटिंगदरम्यान नानांनी तिच्याबरोबर गैरवर्तन केलं होतं. या बातमीमुळे सर्वत्र खळबळ उडाली होती. आता 6 वर्षांनंतर नाना पाटेकर यांनी या बातम्यांवर मौन सोडलं आहे. त्यांनी यामागचं सत्य सांगितलं आहे. याप्रकरणी नानानं काय म्हटलं याबद्दल जाणून घेण्यासाठी संपूर्ण बातमी वाचा...

तनुश्रीच्या आरोपांवर नानांनी सोडलं मौन : नुकतेच नाना पाटेकरला एका मुलाखतीत आपल्या वैयक्तिक आणि व्यावसायिक आयुष्याशी संबंधित अनेक प्रश्न विचारण्यात आले होते. यावेळी नाना पाटेकर यांना तनुश्री दत्तानं केलेल्या लैंगिक छळाबाबतही विचारणात आलं होतं. यावेळी त्यांना हा प्रश्न विचारण्यात आला की, तनुश्री दत्तानं त्याच्यावर आरोप केल्यावर राग का आला नाही. याला उत्तर देताना त्यांनी म्हटलं की, "माझ्यावरीलचे आरोप खोटे आहेत, हे मला पहिल्यापासूनच माहीत होतं. यामुळेच मला कधी राग आला नाही. त्या सर्व गोष्टी जुन्या आहेत. सगळ्यांना सत्य माहीत होतं आणि मी लोकांच्या ट्रोलिंगकडे दुर्लक्ष करतो."

नाना पाटेकरनं केलं दुर्लक्ष : पुढं त्यांनी म्हटलं, "मी सोशल मीडियावरील गोष्टींकडे लक्ष देत नाही. कोण काय लिहित आहे आणि काय बोलत आहे हे मी नियंत्रित करू शकत नाही. मी कोणाचे तोंड बंद करू शकत नाही, म्हणून मी याकडे लक्ष देत नाही, तुम्हाला तुमची सत्यता जाणून घेणे आवश्यक आहे आणि पुरेसे आहे. बाकी लोकांचं काम आहे म्हणायचं, ते नक्कीच काहीतरी बोलतील. याबद्दल आपण काही करू शकत नाही." दरम्यान नाना पाटेकरच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर तो 'द वॅक्सीन वॉर' या चित्रपटामध्ये पल्लवी जोशीबरोबर दिसला होता. हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर काही विशेष कमाई करू शकला नाही.

हेही वाचा :

  1. सोनाक्षी सिन्हाच्या लग्नासाठी मनीषा कोईरालानं पाठवली खास भेटवस्तू - SONAKSHI SINHA ZAHEER IQBAL WEDDING
  2. 'बिग बॉस ओटीटी 3'मध्ये 'या' स्पर्धकांनी केली एंट्री, देवोलीना भट्टाचार्यनं 'हा' घेतला आक्षेप - bigg boss ott season 3
  3. कंगना रणौतच्या प्रतिक्रियेनंतर अन्नू कपूरनं माफी मागितली, जाणून घ्या प्रकरण... - annu kapoor apologized

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.