ETV Bharat / entertainment

नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला लवकरच विवाहबंधनात अडकणार? - Naga Chaitanya - NAGA CHAITANYA

Naga Chaitanya-Sobhita Dhulipala : टॉलिवूड अभिनेता नागा चैतन्य त्याची गर्लफ्रेंड शोभिता धुलिपाला हिच्याशी विवाहबंधनात अडकणार आहे. लवकरच याबाबत घोषणा सोशल मीडियावर अक्किनेनी कुटुंब करू शकते. दोघेही बऱ्याच दिवसांपासून डेट करत आहेत.

Naga Chaitanya-Sobhita Dhulipala
नागा चैतन्य - शोभिता धुलिपाला (Naga Chaitanya and Sobhita Dhulipala to Tie the Knot Soon? (ETV Bharat))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 8, 2024, 11:09 AM IST

Updated : Aug 8, 2024, 3:31 PM IST

मुंबई - Naga Chaitanya-Sobhita Dhulipala : नागा चैतन्यनं 2021 मध्ये सामंथा रुथ प्रभूला घटस्फोट दिला, त्यानंतर त्यानं अभिनेत्री शोभिता धुलिपालाला डेट करायला सुरुवात केली. नागा चैतन्य आणि शोभिताच्या डेटिंगच्या बातम्या बऱ्याच दिवसांपासून येत होत्या. नागा चैतन्य शोभिता धुलिपालाबरोबर लग्न करण्याच्या तयारीत आहे. नागा चैतन्यच्या जवळच्या सूत्रांनी पुष्टी केली आहे की, लग्नाच्या योजनांना अंतिम रूप देण्यासाठी दोन्ही कुटुंबे आज एकांतात भेटतील. अक्किनेनी कुटुंबाचे चाहते अधिकृत घोषणेची आतुरतेनं वाट पाहत आहेत.

नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला लग्नाच्या तयारीत : सोशल मीडियावर या दोघांच्या लग्नाच्या बातम्या वाऱ्यासारख्या पसरत आहेत. आता अनेकजण सोशल मीडियावर या जोडप्याचं अभिनंदन करताना दिसत आहेत. शोभिता धुलिपालानं 2013 मध्ये फेमिना मिस इंडिया खिताब जिंकला होता. तिनं 2016 मध्ये चित्रपटसृष्टीत प्रवेश केला. तेव्हापासून ती प्रसिद्धीझोतात आली होती. सध्या तिला टॉलीवूड, बॉलीवूड आणि हॉलीवूडमधून ऑफर मिळत आहेत. दुसरीकडे, नागा चैतन्य हा त्याच्या चित्रपटांच्या शूटिंगमध्ये व्यग्र आहे. नागा हा चंदू माँडेटी दिग्दर्शित 'थंडेल' या चित्रपटामध्ये काम करत आहे. दरम्यान अक्किनेनी कुटुंब या जोडप्याच्या लग्नाची लवकरच घोषणा करेल.

नागा चैतन्य आणि समांथा रुथ प्रभूचं नात : दरम्यान नागा चैतन्यनं 2017 मध्ये अभिनेत्री समांथा रुथ प्रभूबरोबर लग्न केलं, परंतु त्यांचं नाते काही वर्षेच टिकलं. दरम्यान नागा चैतन्य आणि समांथा रुथ प्रभू यांनी अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केलं आहे. यामध्ये 'ये माया चेसावे', ऑटोनगर सूर्या', 'मजिली', 'बेबी' आणि 'मनम' हे चित्रपट आहेत. 'ये माया चेसावे' हा समांथा रुथ प्रभूचा डेब्यू चित्रपट होता. समांथा अद्याप सिंगल आहे. दरम्यान घटस्फोटानंतर लगेचच नागा चैतन्यनं शोभिता धुलिपालाला डेट करायला सुरुवात केली होती. मात्र, दोघांनीही अद्याप त्यांच्या नात्याबद्दल जाहीरपणे काहीही सांगितलेलं नाही. अनेकदा दोघांना एकत्र पाहण्यात आलं आहे. लंडनमध्ये लंच डेटवरही दोघे एकत्र दिसले होते.

हेही वाचा :

  1. नागा चैतन्यनं पोस्ट केलेल्या वडील नागार्जुनच्या थ्रोबॅक फोटोवर तब्बूची प्रतिक्रिया - tabu reaction
  2. टू-टाइम रिलेशनशिपमध्ये राहिल्याचं नागा चैतन्यनं केलं कबुल, व्हिडिओ व्हायरल - naga chaitanya
  3. Sobhita Dhulipala on naga chaitanya : सामंथा रुथ प्रभू आणि नागा चैतन्यचे कौतुक करताना दिसली शोभिता धुलिपाला

Last Updated : Aug 8, 2024, 3:31 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.