ETV Bharat / entertainment

नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपालाचं झाला साखरपुडा, नागार्जुननं केले फोटो शेअर - Naga and Sobhita Engaged - NAGA AND SOBHITA ENGAGED

Naga Chaitanya and Sobhita Dhulipala : तेलुगू अभिनेता नागा चैतन्यनं 8 ऑगस्ट रोजी अभिनेत्री शोभिता धुलिपालाबरोबर साखरपुडा केला. ही घोषणा चैतन्यचे वडील नागार्जुन यांनी सोशल मीडियावर केली आहे. आता या जोडप्याचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले आहेत.

Naga Chaitanya and Sobhita
नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला (Nagarjuna - X)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 8, 2024, 2:27 PM IST

मुंबई - Naga Chaitanya and Sobhita Dhulipala : 'मास' स्टार नागार्जुन अक्किनेनीचा मुलगा नागा चैतन्यनं अभिनेत्री शोभिता धुलिपालाबरोबर 8 ऑगस्ट रोजी साखरपुडा केला आहे. साऊथचा सुपरस्टार नागार्जुननं नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांच्या एंगेजमेंटची घोषणा केली आणि एक्स हँडलवर फोटो शेअर केले आहेत. फोटोत नागार्जुनबरोबर चैतन्य आणि त्याची होणारी पत्नी शोभिता धुलिपाला दिसत आहेत. या फोटोच्या कॅप्शनमध्ये नागार्जुननं लिहिलं, "आमचा मुलगा नागा चैतन्यचा, शोभिता धुलिपालाशी आज सकाळी 9.42 वाजता साखरपुडा झाला असून आम्हाला हे जाहीर करताना आनंद होत आहे. शोभिताच्या घरात प्रवेश झाल्यामुळे आम्ही आनंदी आहोत. अभिनंदन, तुम्हा दोघांना दीर्घायुष्यासाठी हार्दिक शुभेच्छा. 8.8.8 अमर्याद प्रेमाची सुरुवात."

नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपालाचा साखरपुडा : या जोडप्याची एंगेजमेंट आज हैदराबादमध्ये झाली आहे. 2022 मध्ये नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांच्या नात्याबद्दल अफवा उडू लागल्या, जेव्हा लंडनच्या एका रेस्टॉरंटमधील दोन्ही स्टार्सचे फोटो व्हायरल झाले होते. यानंतर त्याच्या नात्याबद्दलची पुष्टी झाली होती. मात्र या जोडप्यानं आपल्या नात्याबद्दल काही उघडपणे सांगितलं नाही. दरम्यान साखरपुडा झाल्यानंतर चाहते या जोडप्याला आयुष्यभर आनंदी राहण्याच्या शुभेच्छा देत आहेत. 2021 मध्ये समांथा रुथ प्रभूपासून घटस्फोट घेतल्यानंतर नागा चैतन्यचं हे दुसरे लग्न आहे.

नागा चैतन्यबद्दल : दरम्यान, नागा चैतन्यचा पहिला विवाह 2017 मध्ये झाला होता. ऑक्टोबर 2021 मध्ये नागा आणि समांथानं एका संयुक्त निवेदनात सोशल मीडियावर त्यांचे वेगळे होण्याची घोषणा केली होती. तेव्हापासून नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला एकत्र असल्याच्या बातम्या येऊ लागल्या होत्या. दरम्यान नागाच्या चित्रपटामधील कामाबद्दल बोलायचं झालं तर त्यानं अनेक साऊथ चित्रपटांमध्ये काम केलं आहे. यामध्ये 'प्रेमन', 'ओका लैला कोसम', 'जोश' आणि इतर काही चित्रपट आहेत. 'लाल सिंग चड्ढा' या चित्रपटातून त्यानं बॉलिवूडमध्ये पदार्पण केलं. या चित्रपटात आमिर खान आणि करीना कपूर प्रमुख भूमिकेत होते.

हेही वाचा :

  1. नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला लवकरच विवाहबंधनात अडकणार? - Naga Chaitanya
  2. नागा चैतन्यनं पोस्ट केलेल्या वडील नागार्जुनच्या थ्रोबॅक फोटोवर तब्बूची प्रतिक्रिया - tabu reaction
  3. टू-टाइम रिलेशनशिपमध्ये राहिल्याचं नागा चैतन्यनं केलं कबुल, व्हिडिओ व्हायरल - naga chaitanya

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.