ETV Bharat / entertainment

शोभिता धुलिपालाबरोबर फोटो शेअर केल्यानंतर नागा चैतन्यनं ट्रोलिंगपासून वाचण्यासाठी कमेंट सेक्शन केलं बंद - NAGA CHAITANYA SHARE PHOTO WITH GF

नागा चैतन्यनं एक फोटो त्याच्या इंस्टाग्रामवर शेअर केला आहे. यामध्ये तो त्यांची होणारी पत्नी शोभिता धुलिपालाबरोबर दिसत आहे.

naga chaitanya
नागा चैतन्य (नागा चैतन्य - शोभिता धुलिपाला (Naga Chaitanya and Sobhita Dhulipala to Tie the Knot Soon? (ETV Bharat))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Oct 20, 2024, 9:59 AM IST

मुंबई : अभिनेता नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांनी त्यांच्या नात्याबद्दची घोषणा करून संपूर्ण देशाला आश्चर्यचकित केलं होतं. या जोडप्यानं एंगेजमेंट केल्यानंतर सर्वांना एक धक्का बसला होता. हे जोडपे त्यांच्या नात्याबद्दल मीडियाशी कधीही बोलले नाही. आता एंगेजमेंटच्या दोन महिन्यांनंतर चैतन्यनं शोभिताबरोबरचा एक फोटो शेअर केला आहे. या फोटोची सोशल मीडियावर खूप चर्चा होत आहे. या फोटो शेअर करताना त्यानं कॅप्शनमध्ये लिहिलं, 'सगळे सर्वत्र एकाच वेळी.' फोटोमध्ये नागा चैतन्य बॅगी पँट आणि ब्लॅक जॅकेटमध्ये दिसत आहे. दुसरीकडे शोभितानं बॅगी पँट आणि ब्लॅक टॉप परिधान केलं असून तिनं कमरेला जाकीट बांधलं आहे. याशिवाय तिनं तिचे केस बनमध्ये बांधले आहेत. ही सेल्फी आरशात घेण्यात आली आहे. याशिवाय नागा चैतन्यनं लिफ्टमध्ये आपल्या होणाऱ्या पत्नीबरोबर फोटोसाठी पोझ दिली.

ट्रोलिंग टाळण्यासाठी कमेंट सेक्शन बंद केला : फोटो शेअर करताना नागा चैतन्यनं ट्रोल होऊ नये म्हणून एक व्यवस्थाही केली आहे. त्यानं कमेंट सेक्शन बंद केला आहे. नागा चैतन्यनं शोभिताबरोबर साखरपुडा केल्यापासून तो सतत ट्रोलर्सच्या निशाण्यावर आहे. नागानं शोभिताबरोबरच्या त्याच्या एंगेजमेंटमधील फोटो शेअर केले, तेव्हा त्याला अनेक द्वेषपूर्ण कमेंट्सचा सामना करावा लागला होता. आता जेव्हा त्यानं शोभिताबरोबरचा फोटो शेअर केला आहे, तर ट्रोलिंग टाळण्यासाठी कमेंट सेक्शन बंद केल्याचं दिसत आहे. नागा चैतन्यनं 8 ऑगस्ट रोजी शोभिताबरोबर फोटो शेअर करून साखरपुडा झाल्याची घोषणा केली होती.

नागा चैतन्यनं घेतला सामंथापासून घटस्फोट : नागा चैतन्यच्या आधी, त्याचे वडील आणि साऊथचा सुपरस्टार नागार्जुननं साखरपुड्यामधील मुलगा आणि होणाऱ्या सुनेचे फोटो सोशल मीडियावर शेअर केले होते. नागा चैतन्यचं पहिलं लग्न सामंथा रुथ प्रभुबरोबर 2017मध्ये झालं होतं. यानंतर 2021 मध्ये या जोडप्याचा घटस्फोट झाला. या बातमीमुळे सर्वांना एक धक्का बसला होता. सामंथापासून नागा चैतन्य वेगळा झाल्यानंतर अनेकजण त्याच्यावर फसवणूक केल्याचा आरोप करत आहेत. नागा चैतन्यनं शोभिता धुलिपालाबरोबर साखरपुडा केल्यानंतर सामंथाच्या चाहत्यांना स्वतःवर नियंत्रण ठेवता आले नाही आणि त्यांनी या दोघांना ट्रोल करण्यास सुरुवात केली.

हेही वाचा :

  1. नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपालाचं झाला साखरपुडा, नागार्जुननं केले फोटो शेअर - Naga and Sobhita Engaged
  2. नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला लवकरच विवाहबंधनात अडकणार? - Naga Chaitanya
  3. नागा चैतन्यनं पोस्ट केलेल्या वडील नागार्जुनच्या थ्रोबॅक फोटोवर तब्बूची प्रतिक्रिया - tabu reaction

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.