मुंबई - अभिनेता नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांच्या लग्नाची तारीख उघड झाली आहे. दोघांचा साखरपुडा धूमधडाक्यात पार पडला होता. आता नागा आणि शोभिता लवकरच लग्न करणार आहेत. साऊथ अभिनेत्री सामंथा रुथ प्रभूशी घटस्फोट झाल्यानंतर नागा चैतन्य शोभिताशी डेटिंग करत होता. आता दोघेही सात फेरे घेऊन लग्नाच्या बेडीत अडकणार आहेत. ८ ऑगस्टला नागा आणि शोभिताच्या एंगेजमेंटने चाहत्यांमध्ये उत्साह संचारला होता. आता या जोडप्याच्या लग्नाची तारीख समोर आली आहे.
नागा चैतन्य आणि शोभिता धुलीपालाचं लग्न कधी? - मिळालेल्या माहितीनुसार नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांचा विवाह चालू वर्षातच होणार आहे. यााठी जोडप्याच्या चाहत्यांना जास्त वेळ थांबावे लागणार नाही. नागा आणि शोभिताचे लग्न 4 डिसेंबर 2024 रोजी होणार आहे. नागा आणि शोभिताच्या लग्नाला कुटुंबीय, जवळचे नातेवाईक आणि मित्रमंडळी हजेरी लावणार असल्याचे बोलले जात आहे. नुकतेच नागार्जुनचे वडील अक्किनेनी नागेश्वर राव यांच्या स्मरणार्थ कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं होतं. त्यावेळी नागार्जुनने आपली भावी सून शोभिताची ओळख साऊथ सुपरस्टार चिरंजीवी यांना करुन दिली होती.
नागा चैतन्य आणि शोभिता धुलिपाला यांच्या लग्नाची अधिकृत तारीख जाहीर झालेली नाही. तरीही हे जोडपं 4 डिसेंबरला विवाह करणार असल्याची जोरदार चर्चा आहे. त्याच्या चाहत्यांनीही या तारखेवर शिक्का मोर्तब केल्याचं दिसत आहे. या जोडीला लोक शुभेच्छा देत आहेत.
नागा चैतन्यानं 2017 मध्ये साऊथ अभिनेत्री सामंथा रूथ प्रभू हिच्या बरोबर लग्न केलं होतं. या दोघांचा संसार कसातरी चार वर्षे टिकला. दोघांच्याही एकमेकांबद्दलच्या तक्रारी होत्या. त्यानंतर 2021 मध्ये दोघांनी संमतीनं घटस्फोट घेतला. काही काळानंतर, नागाचे नाव पोन्नियिन सेल्वन चित्रपट फेम अभिनेत्री शोभितासोबत जोडले जाऊ लागले आणि दोघेही अनेकदा डेटवर गेलेले दिसले. परंतु नागा आणि शोभिता यांनी त्यांच्या नात्याबद्दल कधीही काहीही सांगितले नाही. दरम्यान, ऑगस्ट महिन्यात एंगेज झालेल्या नागा आणि शोभिताने त्यांच्या चाहत्यांना एक मोठे सरप्राईज दिले.