मुंबई - Bigg Boss 17 winner Munawar Faruqui : बिग बॉस 17 चा विजेता बनल्यानंतर मुनावर फारुकीचे मुंबईच्या डोंगरी भागात जोरदार सेलेब्रिशन पार पडले. या मिरवणूकीचे चित्रीकरण करणाऱ्या ड्रोन कॅमेरा ऑपरेटरविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आली आहे. मुनावरच्या विजयाचा आनंद साजरा करण्यासाठी डोंगरी येथे मोठी गर्दी झाली होती. सेलेब्रिशनम्यान, स्टँड अप कॉमेडियन मुनावरने त्याच्या कारच्या सनरूफवर उभे राहून मिळालेल्या प्रसिद्ध ट्रॉफीचे प्रदर्शन केले होते.
मिळालेल्या माहितीनुसार, मुनावर फारुकीच्या चाहत्याचे नाव अरबाज युसूफ खान (२६) असून पीएसआय तौसिफ मुल्ला यांच्यासोबत गस्तीवर असताना पोलिस शिपाई नितीन शिंदे यांनी त्याला पहिले. मुंबईच्या डोंगरी येथे सेलिब्रेशनदरम्यान ड्रोन वापरण्याची परवानगी नसलेल्या ड्रोन ऑपरेटरशी बोललल्यानंतर पोलिसांनी पोलीस स्टेशनशी संपर्क साधला. वृत्तानुसार, पोलिसांनी ड्रोन कॅमेराही ताब्यात घेतला आहे.
ड्रोन ऑपरेशनसाठी मुंबई पोलीस आयुक्तांचे निर्बंध तोडल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला असून, अशा चित्रीकरणासाठी पूर्वपरवानगी आवश्यक असते. यापूर्वी, पोलिसांनी सार्वजनिक सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी ड्रोन कॅमेऱ्यांसह उडणाऱ्या वस्तूंवर बंदी घातली होती. अपवाद फक्त पोलिसांद्वारे हवाई पाळत ठेवणे किंवा पोलीस उपायुक्तांनी लेखी परवानगी दिल्यानंतर चित्रीकरण करणे हा आहे.
कॉमेडियन मुनावर फारुकी बिग बॉस 17 मध्ये मिळालेला त्याचा मोठा विजय साजरा करत होता. मुंबईतील डोंगरी येथे त्याच्या हजारो समर्थकांनी त्याचे उत्साहाने स्वागत केले. त्याने पोस्ट केलेल्या व्हिडिओमध्ये तो त्याच्या कारचे सनरूफ उघडून तेथे उभा असल्याचे दिसत आहे. त्याच्या गाडीभोवती लोकांचा मोठा जमाव जमला होता. त्याने त्याची बिग बॉसची विजय ट्रॉफी चाहत्यांना दाखवली आणि ती उचलताना दिसला. अनेक मीडिया हाऊसने त्याच्या या सेलेब्रिशनच्या जोरदार बातम्या मथळ्यांसह दिल्या होत्या. 'डोंगरी का राजा' अशी बिरुदावलीही त्याच्या नावाच्या मागे अनेकांनी लावली होती. मुनावर फारुकीला पाहण्यासाठी डोंगरीच्या रस्त्यावर दुतर्फा मोठी गर्दी जमली होती. यामुळे काही काळ वाहतुकीलाही अडथळा निर्माण झाला होता.
रिअॅलिटी शोच्या विजेत्या मुनावर फारुकीवर चाहत्यांनी कौतुकाचा वर्षाव केला. त्यांच्या समर्थकांनी आरडाओरडा केला, फोटो काढले आणि त्याला अभिवादन केले. मुनावरनेही त्यांना हात जोडून अभिवादन केले आणि त्यांच्या पाठिंब्याबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.
हेही वाचा -