मुंबई -Munawar faruqui: 'बिग बॉस 17' चा विजेता आणि स्टँडअप कॉमेडियन फारुकी हा पुन्हा चर्चेत आला आहे. त्याला जीवे मारण्याची धमकी मिळाली आहे. मुनावर हा गेल्या काही दिवसांपासून दिल्लीत होता. यानंतर जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्यानंतर तो तातडीनं मुंबईत परतला आहे. मुनावरला धमकी दिल्याप्रकरणी दिल्ली पोलिसांना माहिती मिळाली होती. दिल्ली पोलिसांना मिळालेल्या माहितीनुसार मुनावरच्या हत्येची योजना आखली जात होती. यासाठी काही लोकांना त्यांच्यावर नजर ठेवण्यासाठी दिल्लीला पाठवण्यात आलं होतं. सध्या मुनावरचा जीव हा धोक्यात आहे.
मुनावर फारुकीचा जीव धोक्यात : मुनावर हा वादग्रस्त यूट्यूबर एल्विश यादवबरोबर दिल्लीतील एका हॉटेलमध्ये थांबला होता. रिपोर्ट्सनुसार, दिल्ली पोलिसांना शनिवारी रात्रीच याप्रकरणी माहिती मिळाली होती. दिल्ली पोलीस गोळीबार प्रकरणावर तपास करत होती. त्याचवेळी या चौकशीत संशयितांनी हा धक्कादायक खुलासा केला होता. मुनावर हा दिल्लीतील सूर्या हॉटेलमध्ये असून त्याच्यावर नजर ठेवण्याच्या सूचना मिळाल्याबद्दल त्यानं पोलिसांना सांगितलं. पोलिसांनी आयजीआय (IGI) इनडोअर स्टेडियम आणि हॉटेल गाठून तपास सुरू केला. मुनावर हा हॉटेलच्या पहिल्या मजल्यावर राहत होता.
मुनावर फारुकी मुंबईत परत आला : एंटरटेनर्स क्रिकेट लीगमध्ये सामना खेळण्यासाठी मुनावर दिल्लीच्या आयजीआय स्टेडियममध्ये गेला होता. ही लीग 13 सप्टेंबरपासून सुरू झाली असून 22 सप्टेंबरपर्यंत चालणार आहे. आता मुनावर फारुकीचं दिल्लीत राहणे सुरक्षित नसल्यानं त्याला मुंबईला पाठवण्यात आलं आहे. मुनावर फारुकीला वारंवार धमक्या मिळत आहेत. मुनावर अनेकदा सांगितलं आहे की, त्याला खूपदा जीवे मारण्याच्या धमक्या मिळाल्या आहेत. दरम्यान 'बिग बॉस 17' जिंकल्यानंतर मुनावर हा प्रसिद्धी झोतात आला. त्यानं यापूर्वी 'लॉकअप सीजन 1' हा शो देखील जिंकला आहे. मुनावरचा खूप मोठा चाहतावर्ग आहे. अनेकदा तो आपल्या चाहत्यांबरोबर सोशल मीडियाच्या माध्यमातून संवाद साधत असतो. तो सोशल मीडियावर खूप सक्रिय आहे.
हेही वाचा :