ETV Bharat / entertainment

मृणाल ठाकूरनं 'कल्की 2898 एडी' टीमचं केलं कौतुक, शेअर केली पोस्ट - mrunal thakur - MRUNAL THAKUR

Mrunal Thakur in Kalki 2898 AD : अभिनेत्री मृणाल ठाकूर 'कल्की 2898 एडी'मध्ये दिसल्यानंतर ती चर्चेत आली आहे. आता तिनं एक पोस्ट सोशल मीडियावर शेअर करून 'कल्की 2898 एडी'मधील टीमचं कौतुक केलं आहे.

Mrunal Thakur in Kalki 2898 AD
मृणाल ठाकूर कल्की 2898 एडीमध्ये (Photo (ANI))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jul 7, 2024, 4:43 PM IST

मुंबई - Mrunal Thakur in Kalki 2898 AD : अभिनेत्री मृणाल ठाकूर 'कल्की 2898 एडी'चा एक भाग आहे. अमिताभ बच्चन, दीपिका पदुकोण, प्रभास, कमल हासन स्टारर 'कल्की 2898 एडी'मध्ये ती महत्वाच्या भूमिकेत दिसली आहे. नाग अश्विन दिग्दर्शित या चित्रपटात तिनं छोटी भूमिका साकारली आहे. अलीकडेच मृणालनं सोशल मीडियावर अनेक फोटो पोस्ट केले आहेत. या पोस्टद्वारे तिनं 'कल्की 2898 एडी'च्या टीमचे कौतुक करून अनुभव शेअर केला आहे. रविवारी 7 जुलै रोजी मृणाल ठाकूरनं तिच्या अधिकृत इंस्टाग्रामवर काही फोटो पोस्ट केल्यानंतर ती चर्चेत आली. 'कल्की 2898 एडी'च्या डबिंग दरम्यान ही फोटो क्लिक करण्यात आली आहेत. या फोटोंमध्ये मृणाल गरोदर असल्याच्या पात्रात दिसत आहे.

'कल्की 2898 एडी'मधील स्टार कास्टचं केलं कौतुक : मृणालनं तिचा अनुभव शेअर करता कॅप्शनमध्ये लिहिलं, "काय चित्रपट आहे. 'कल्की 2898 एडी'च्या दृश्यानं मला पूर्णपणे आश्चर्यचकित केलंय. या चित्रपटात संपूर्ण टीमनं अप्रतिम काम केलं आहे. कलाकारांपासून ते सेट, संगीत, व्हीएफएक्स, वेशभूषा, सर्व काही छान आहे. नाग अश्विन गारू, तुमची दृष्टी आणि उत्कृष्ट कृतीला सलाम." 'बिग बी' आणि दीपिकाच्या व्यक्तिरेखेचे ​कौतुक करतानं तिनं पुढं लिहिलं की, "अमिताभ बच्चन सर, तुम्ही खरेच शहंशाह आहात. अश्वत्थामाच्या भूमिकेत तुझा अभिनय अप्रतिम आहे. दीपिका पदुकोण, तू सुमतीची भूमिका खूप सुंदर केली आहेस आणि मला तुझी पडद्यावरची उपस्थिती खूप आवडली, खूप छान काम केले आहेस."

मृणालनं केलं प्रभासचे कौतुक : प्रभासचे कौतुक करताना मृणाल लिहिलं, "प्रभास गारू मी कुठून सुरुवात करू, तू खरोखरच पार्कमधून बाहेर काढले आहेस. मला तुझ्या भूमिकेतील प्रत्येक पैलू आणि तू ज्या कौशल्यानं भैरवची भूमिका साकारली आहेस ते खूप आवडले. माझा आवडता भाग म्हणजे तुमचं आणि कीर्ती सुरेशबरोबरचे नाते. खूप छान काम केलंय." निर्मात्यांचे अभिनंदन करताना, मृणालनं लिहिलं, "माझ्या या चित्रपटांपैकी एक, वैजयंती मूव्हीजचा हा उत्कृष्ट चित्रपट जगभरात धमाका करत आहे. नाग अश्विन गारू अभिनंदन. जागतिक स्तरावर वादळ निर्माण करणारा हा चित्रपट पाहणे खूप हृदयस्पर्शी आहे. या भव्य विश्वाचा एक छोटासा भाग बनून छान वाटलं." मृणालच्या या पोस्टवर अनेकजण कमेंट करून तिचे कौतुक करत आहेत.

हेही वाचा :

  1. 'कल्की 2898 एडी'ची बॉक्स ऑफिसवर 9 दिवसात छप्परफाड कमाई - Kalki 2898 AD Box Office Collection
  2. अनंत अंबानी आणि राधिका मर्चंट यांच्या संगीत समारंभात दीपिका पदुकोणचा लूक पाहून चाहते झाले घायाळ - SANGEET CEREMONY

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.