ETV Bharat / entertainment

साऊथ स्टार मोहनलाल रुग्णालयात दाखल, डॉक्टरांनी अभिनेत्याला दिला 'हा' महत्त्वाचा सल्ला - Mohanlal Admit In Hospital - MOHANLAL ADMIT IN HOSPITAL

Mohanlal Admit In Hospital: साऊथ अभिनेता मोहनलाल यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहं. त्यामुळे त्यांचे चाहते चिंता व्यक्त करत आहेत. त्यांच्या प्रकृतीविषयी जाणून घ्या.

Mohanlal Admit In Hospital
मोहनलालला रुग्णालयात केलं दाखल (Mohanlal Hospitalised With Fever and Breathing Issues Amidst Barroz Release Excitement (ANI))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Aug 18, 2024, 4:04 PM IST

मुंबई - Mohanlal Admit In Hospital: साऊथ अभिनेता मोहनलाल यांना ताप, श्वास घेण्यात अडचण आणि स्नायूदुखीचा त्रास होत आहे. डॉ. गिरीश कुमार यांच्या अधिकृत माहितीनुसार, मोहनलाल यांना व्हायरल रेस्पीरेटरी इन्फेक्शननं ग्रासलं आहे. आता त्यांच्यावर रुग्णालयात औषधोपचार होत आहेत. डॉक्टरांनी मोहनलाल यांना पाच दिवस सार्वजनिक ठिकाणी जाणे टाळण्याचा सल्ला दिला आहे. आता सोशल मीडियावर मोहनलाल यांचे चाहते त्याच्याबद्दल चिंता व्यक्त करताना दिसत आहेत.

मोहनलाल यांना रुग्णालयात करण्यात आलं दाखल : अमृता इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्सेसनं मोहनलाल यांच्या आरोग्यासंबंधित एक अधिकृत निवेदन प्रसिद्ध केलं आहे. यामध्ये असं लिहिलं आहे की, "अभिनेता यांची तब्येत बरी होत आहे. त्यांना खूप ताप असून श्वास घेण्यास त्रास होत आहे. स्नायू दुखत आहेत. मोहनलाल यांना व्हायरल रेस्पीरेटरी इन्फेक्शन आहे." मोहनलाल हे लवकरात लवकर बरे व्हावे, यासाठी चाहते प्रार्थना करत आहेत.

मोहनलालचं वर्कफ्रंट : दरम्यान त्यांच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचं झालं तर मोहनलाल यांचा 'एल2 एम्पुरान ' हा चित्रपट सध्या चर्चेत आहे. नुकतेच त्यांनी या चित्रपटाच्या शूटिंगचं शेड्यूल पूर्ण केलं आहे. तसेत आता पुढं ते 'रामबाण', 'पुष्पा 2: द रूल', 'कन्नप्पा', 'वृषभा', 'वयानदन थंबन', 'राम', आणि 'ओन्नम सर' या चित्रपटांमध्ये दिसणार आहेत. आता चाहते त्याच्या चित्रपटांची खूप आतुरतेन वाट पाहत आहेत. यापूर्वी त्यांचा 'मनोरथंगल' हा चित्रपट प्रदर्शित झाला. या चित्रपटामध्ये त्यांच्याबरोबर मुख्य भूमिकेत साऊथ अभिनेता फहद फासिलदेखील आहे. याशिवाय मोहलाल स्टारर 'बरोज' हा चित्रपट रुपेरी पडद्यालर 12 सप्टेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाकडून त्यांना खूप अपेक्षा आहेत. हा चित्रपट पाहण्यासाठी त्याचे चाहतेदेखील खूप आतुर असल्याचं दिसत आहेत. या चित्रपटात त्यांच्याबरोबर राफेल अमरगो, पाझ वेगा, पद्मावती राव आणि जयचंद्रन पालझी हे कलाकार दिसणार आहेत.

हेही वाचा :

  1. कमल हासन, मामूट्टी, मोहनलाल, फहद फासिलसह दिग्गज प्रतिभावंतांचा 'मनोरथंगल' ट्रेलर रिलीज - Manorathangal Trailer
  2. शाहरुख खानसाठी मोहनलालच्या घरी होणार डिनर पार्टी, 'जिंदा बंदा'वर थिरकणार दोन सुपरस्टार्स? - Shah Rukh Khan
  3. 'जवान'मधील 'जिंदा बंदा' गाण्यावर थिरकला मोहनलाल, मामूट्टीसह घालवले हृदयस्पर्शी क्षण - Mohanlal Dance

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.