मुंबई - Shamita Shetty : हिंदी चित्रपटसृष्टीचे स्टार्स त्यांच्या उत्कृष्ट अभिनयासाठी ओळखले जातात. मात्र, असं काही स्टार्स आहेत, ज्यांच्याकडे अभिनयाशिवाय इतरही अनेक गुण आहेत. काही स्टार्सना त्यांच्या मोकळ्या वेळात रंगकाम करायला आवडते. बॉलिवूडमध्ये असे काही स्टार्स आहे, ज्यांची पेटिंग पाहून कोणीही दंग होईल. शमितानं एक अप्रतिम पेंटिंग बनवली आहे. दरम्यान शमिता सोशल मीडियावर खूप सक्रिय असते. अनेकदा ती सुंदर फोटो आणि व्हिडिओ चाहत्यांबरोबर शेअर करत असते. आता अलीकडेच तिनं तिच्या इन्स्टावर एक नवीन व्हिडिओ शेअर केला आहे, ज्यामुळे ती चर्चेत आली आहे.
शमिता शेट्टीची पेटिंग : या पोस्टमध्ये ती चारकोल पेंटिंग करताना दिसत आहे. व्हिडिओत आपण पाहू शकतो की, शमिता चित्रकलेचे कौशल्य कागदावर उतरवत आहे. यानंतर तिची पेंटिंग पूर्ण झाल्यानंतर तिनं चाहत्यांना याची झलक देखील दाखवली आहे. शमितानं चारकोल पेंटिंगद्वारे दगडांमध्ये एक बंद दरवाजा बनवला आहे. तिनं बनवलेली ही पेंटिंग खूप सुंदर आहे. आता तिची पेटींग पाहून अनेकजण तिचे सोशल मीडियावर कौतुक करताना दिसत आहे. दरम्यान हा व्हिडिओ शेअर करताना शमितानं लिहिलं, 'कला ही स्वतंत्र व्यक्तीचा प्रवास आहे.' शमिताची चित्रकला कौशल्य दाखवण्याची ही पहिलीच वेळ नाही, याआधीही तिनं अनेक वेळा सुंदर चित्रं काढली आहेत. एकदा तिनं भगवान शिव आणि माता गौरी यांचं चित्र काढलं होतं. तिनं याचा देखील व्हिडिओ शेअर केला होता. शमिताची हे पेंटिंग देखील तिच्या चाहत्यांना खूप आवडलं होतं.
शमिता शेट्टी बद्दल : शमितानं 2001 मध्ये 'मोहब्बतें' या ब्लॉकबस्टर चित्रपटातून चित्रपटसृष्टीत पदार्पण केलं होतं. ती तिच्या पहिल्याच चित्रपटामुळे प्रसिद्धीझोतात आली होती, त्यानंतर ती अनेक हिट चित्रपटांमध्ये दिसली. मात्र शमिताला तिची बहीण शिल्पाइतकी प्रसिद्धी मिळवता आली नाही. तिनं बॉलिवूडच्या छोट्या पडद्यावरील रिॲलिटी शो 'बिग बॉस ओटीटी 1' मध्ये भाग घेतला. या शोमध्ये ती अंतिम फेरीत पोहोचली. यानंतर तिनं 'बिग बॉस 15' मध्ये भाग घेतला ज्यामध्ये ती फिनालेमध्ये पोहोचली होती.
हेही वाचा :