ETV Bharat / entertainment

'मिर्झापूर सीझन 3' च्या रिलीजची तारीख ठरली, जाणून घ्या ही क्राईम थ्रिलर सीरिज कधी आणि कुठे पहायची - MIRZAPUR SEASON 3 - MIRZAPUR SEASON 3

MIRZAPUR SEASON 3 : भारतातील बहुप्रतीक्षित मिर्झापूर या वेब सीरिजचा तिसरा सीझनच्या रिलीजची तारीख लीक झाली आहे. जाणून घ्या तुम्हाला गुड्डू आणि कालिन भैय्याचा हा ड्रामा कधी आणि कुठे पाहायला मिळेल.

Mirzapur Season 3
मिर्झापूर सीझन 3 ((IAMGE- IANS))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 30, 2024, 4:26 PM IST

मुंबई - देशातील बहुचर्चित वेबसीरिज मिर्झापूरच्या तिसऱ्या सीझनची देश विदेशातील चाहते आतुरतेनं वाट पाहत आहेत. मिर्झापूर आणि मिर्झापूर 2 च्या धमाक्यानंतर यशानंतर आता मिर्झापूर सीझन 3 देखील प्रेक्षकांच्या मनोरंजनासाठी सज्ज झाला आहे. या क्राईम थ्रिलर सीरिजच्या तिसऱ्या सीझनची रिलीज डेट समोर आली आहे. आतापर्यंत असं बोललं जात होतं की, मिर्झापूर सीझन 3 जुलैमध्ये रिलीज होईल, परंतु आज 30 मे रोजी त्याची स्ट्रीम डेट समोर आली आहे. प्राइम व्हिडिओवर मिर्झापूर सीझन 3 कधी रिलीज होईल ते जाणून घ्या.

पंकज त्रिपाठी, रसिका दुग्गल, अली फजल, श्वेता त्रिपाठी, हर्षिता गौर आणि विजय वर्मा यांच्या भूमिका असलेली मिर्झापूर 3 ही मालिका पुन्हा एकदा चाहत्यांचे मनोरंजन करणार आहे. मिर्झापूर ३ मध्ये नवे चेहरेही दिसणार असल्याचं बोललं जात आहे. त्याचबरोबर अनेक वेळा प्रदर्शनाची तारीख न मिळाल्यानं मालिका पाहण्याची प्रेक्षकांची उत्सुकता वाढली होती. एक्सेल एंटरटेनमेंट 2022 पासून मिर्झापूर 3 ही मालिका बनवत आहे. अखेर मिर्झापूर 3 ची रिलीज डेट समोर आली आहे.

मिर्झापूर ३ कधी प्रदर्शित होणार?

दरम्यान, मिर्झापूर 3 च्या निर्मात्यांनी पंकज त्रिपाठी आणि अली फजल यांचे फोटो इंस्टाग्रामवर शेअर केले आहेत. मीडिया रिपोर्ट्सनुसार मिर्झापूर 3 ही मालिका 9 जुलै रोजी अमेझॉन प्राइम व्हिडिओवर प्रसारित होणार आहे. मात्र निर्मात्यांनी अद्याप रिलीजची तारीख जाहीर केलेली नाही.

जर आपण गुड्डू भैय्या उर्फ अली फजल पोस्टरबद्दल बोलायचं तर त्यात त्यानं हातात एक काठी धरली आहे आणि त्याच्या कॅप्शनमध्ये लिहिलंय, "ठ से ठहरीए, बस कुछ दिन और." अजून काही दिवस थांबा... म्हणजे रिलीज डेट लवकरच येणार आहे, असात या कॅप्शनला सुचवायचं आहे.

मिर्झापूर सीजन 3 मध्ये काय दिसणार?

मिर्झापूर 2 या मालिकाचे अखेर अतिशय नाट्यमय पद्धतीने झाला होता. मिर्झापूर 3 मध्ये त्या सर्व घटना सुरू ठेवल्या जातील, ज्यामध्ये गुड्डू भैय्या (अली फजल) च्या हातून मुन्ना भैय्या (दिव्येंदू शर्मा) च्या मृत्यूनंतर, कालिन भैय्या (पंकज त्रिपाठी) यानं शरदबरोबर (अंजूम शर्मा) युती केली होती. आता कालिन, गुड्डू, शरद, बीना, गोलू आणि शत्रुघ्न यांच्यात सत्तेसाठीची लढत पाहायला मिळणार आहे, जी अत्यंत चुरशीची होणार आहे. मिर्झापूर सीझन 3 चे दिग्दर्शन गुरमीत सिंग आणि आनंद अय्यर यांनी केलं आहे.

हेही वाचा -

  1. अनंत आणि राधिकाच्या लग्नाचा अखेर मुहूर्त ठरला..जाणून घ्या कसा असेल विवाह सोहळा - Anant and Radhika wedding
  2. रणवीर सिंग स्टारर 'राक्षस' चित्रपट कायमस्वरुपी रखडला, निर्मात्यांनी जारी केलं निवेदन - Ranveer Singh Rakshas Update
  3. "कोण होतीस तू काय झालीस तू...": 'हिरामंडी' फेम अभिनेत्री अदिती राव हैदरीचा जुना लूक पाहून लोक आश्चर्यचकित - Aditi Rao Hydari old look

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.