ETV Bharat / entertainment

कालिन भैय्याचा धाक आणि गुड्डू पंडितच्या दहशतीनं उडवला थरकाप, 'मिर्झापूर 3' चा खतरनाक ट्रेलर रिलीज - Mirzapur 3 Trailer released - MIRZAPUR 3 TRAILER RELEASED

Mirzapur 3 Trailer released : बहुप्रतीक्षित क्राईम थ्रिलर सिरीज 'मिर्झापूर 3' चा ट्रेलर आज 20 जून रोजी रिलीज झाला आहे. 'मिर्झापूर 3' चा ट्रेलर खूपच थरारक आहे.

Mirzapur 3 Trailer released
मिर्झापूर 3 ((Photo: YouTube/ Prime Video India))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 20, 2024, 6:31 PM IST

मुंबई - Mirzapur 3 Trailer released : ओटीटी प्लॅटफॉर्मवरील सर्वात थरारक मालिका 'मिर्झापूर'च्या तिसऱ्या सीझनचा ट्रेलर आज 20 जून रोजी रिलीज झाला आहे. 'मिर्झापूर 3'साठी चाहत्यांना बराच काळ वाट पाहावी लागली होती. आता या मालिकेचे निर्माते प्रेक्षकांना जास्त काळ प्रतीक्षा करण्यापासून दिलासा देण्यासाठी पुढं आले आहेत. आज 'मिर्झापूर 3' चा ट्रेलर रिलीज झाला आहे. 'मिर्झापूर 3' 5 जुलै रोजी प्राइम व्हिडिओवर प्रसारित होणार आहे. जाणून घेऊया कसा आहे 'मिर्झापूर ३' चा ट्रेलर?

कसा आहे 'मिर्झापूर ३' चा ट्रेलर?

'मिर्झापूर 3' चा 2.37 मिनिटांचा ट्रेलर अत्यंत धक्कादायक आणि थरकाप उडवणारा आहे. 'मिर्झापूर 3' च्या ट्रेलरमध्ये अली फजल साकारत असलेला गुड्डू पंडित खूपच आक्रमक आणि थरारक आहे. अली फजलनं आपल्या भूमिकेत मन आणि आत्मा ओतण्याचा प्रयत्न केला आहे. सत्तेासाठीच्या लढाईच्या या रक्तरंजित मालिकेत प्रत्येक पात्र जोरदार धमाका करत आहे. प्रत्येकजण ज्या पात्राची वाट पाहत आहेच त्या 'कालिन भैया'च्या बरोबर ट्रेलर संपतो. ट्रेलरमध्ये विजय वर्माची एक छोटीशी झलक आहे, पण ते सर्वांचंच लक्ष वेधून घेतो.

'मिर्झापूर 3' स्टारकास्ट

रसिका दुग्गल आणि श्वेता त्रिपाठी यांनीही दमदार काम केलं आहे. ईशा तलवार, अंजुमन शर्मा, प्रियांशू पैन्युली, हर्षिता शेखर गौर, राजेश तैलंग, शीबा चड्ढा, प्रमोद पाठक, शरनवाज जिजिना, मेघना मलिक, मनु ऋषी चड्ढा, नेहा सरगम, लिलीपुट फारुकी, अलका अमीन, अनंगशा बिस्वास, रोहित प्रभू, तिजवा, तिवारी प्रसन्न शर्मा, अनिल जॉर्ज महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहेत.

'मिर्झापूर 3' बद्दल

'मिर्झापूर 3' ची निर्मिती चित्रपट निर्माता फरहान अख्तर आणि एक्सेल एंटरटेनमेंट प्रॉडक्शन कंपनीचे मालक रितेश सिधवानी यांनी केली आहे. 'मिर्झापूर 3' चे दिग्दर्शन गुरमीत सिंग आणि आनंद अय्यर यांनी केले आहे. अपूर्व धर, अविनाश सिंग तोमर, अविनाश सिंग, विजय नारायण वर्मा यांनी 'मिर्झापूर ३' ची कथा लिहिली आहे.

हेही वाचा -

सनी देओल आणि दिग्दर्शक गोपीचंद मालिनेनी मिळून साकारणारा 'बिग बजेट अ‍ॅक्शन' चित्रपट - Sunny Deol film

मुलगी सोनाक्षी सिन्हाच्या लग्नात शत्रुघ्न सिन्हा हजर राहणार की नाही? "खामोश..." म्हणत केला खुलासा - Sonakshi Sinha wedding

अचानक थिएटरमध्ये पोहोचला कार्तिक आर्यन, बच्चे कंपनीच्या डोळ्यात आनंदाश्रू - पाहा व्हिडिओ - Chandu Champion show

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.