ETV Bharat / entertainment

हेमा मालिनीच्या मथुरेतील हॅट्रिकनंतर पाहा काय म्हणतेय ईशा देओल... - mathura lok sabha election - MATHURA LOK SABHA ELECTION

Hema Malini : हेमा मालिनी या मथुरा लोकसभा निवडणुकीत तिसऱ्यांदा विजयी झाल्या आहेत.त्यांची मुलगी ईशा देओलनं सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत आईला शुभेच्छा दिल्या आहेत.

Hema malini
हेमा मालिनी (Esha Deol - instagram)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 5, 2024, 2:34 PM IST

मुंबई - Hema malini : 2024 च्या लोकसभा निवडणुकीत हेमा मालिनी मथुरा येथून तिसऱ्यांदा विजयी झाल्या आहेत. आता अनेक चाहते त्यांचे अभिनंदन करताना दिसत आहेत. दरम्यान, हेमा मालिनी याची मुलगी ईशा देओलनं एक खास पोस्ट शेअर करून तिच्या आईचं अभिनंदन केलं आहे. तिनं आपल्या आईचा एक सुंदर फोटो शेअर केला आहे. ईशा देओलनं शेअर केलेल्या या पोस्टवर चाहते प्रतिक्रिया देऊ शकत नाहीत. पण ते लाइक्सच्या माध्यमातून आपल्या प्रेमाची उधळण करताना दिसत आहेत. 10 तासात या पोस्टला 11 हजारांहून अधिक लाईक्स दिले गेले आहेत.

ईशा देओलनं शेअर केली पोस्ट : हेमा मालिनी यांनी या फोटोमध्ये लाल रंगाचा सूट घातलेला दिसत आहे. या पोस्टबरोबर ईशानं कॅप्शनमध्ये लिहिलं होत की, "अभिनंदन ममा. हॅटट्रिक." तसेच तिनं पोस्टमध्ये सुंदर इमोजी जोडले आहेत. चाहते या पोस्टवर कमेंट्स करू शकणार नाहीत, कारण या फोटोवर कमेंट्स विभाग बंद करण्यात आला आहे. तसेच ईशान इंस्टाग्राम स्टोरीवर आणखी एक फोटो शेअर केला आहे. या फोटोत ती भारतीय जनता पार्टीच्या सदस्यांबरोबर दिसत आहे. हेमा मालिनी सलग मथुरेतून लोकसभा निवडणूक जिंकल्यानंतर देओल कुटुंब खुश आहे. हेमा मालिनी यांनी काँग्रेसचे उमेदवार मुकेश धनगर यांच्या विरोधात निवडणूक लढवली होती. त्या 293407 मतांनी विजयी झाल्या आहेत.

मथुरेच्या मंडी परिषदेत मतमोजणी : याआधी हेमा मालिनी यांच्या प्रचारादरम्यान त्यांच्या दोन्ही मुली ईशा देओल आणि अहाना देओल या मथुरेत त्यांच्याबरोबर उपस्थित होत्या. या दरम्यान ईशा देओलनं जनतेशी संवाद साधला होता. यामध्ये तिनं मथुरेचा नक्की विकास होईल, असं सांगितलं होत. दरम्यान मथुरेच्या मंडी परिषदेत मतमोजणी झाली. कडेकोट बंदोबस्तात मतमोजणी पार पडली. त्याचवेळी बाहेर राजकीय पक्षांचे शेकडो कार्यकर्ते व समर्थक इथे उपस्थित होते. मत मोजणीबाबत मीडिया आणि सोशल मीडियावर क्षणोक्षणी अपडेट्स दिले जात होते. दरम्यान, हेमा मालिनी यांच्या विजयाची घोषणा करण्यात आली. तेव्हा सर्व कार्यकर्त्यांनी यावेळी जल्लोष केला.

हेही वाचा :

  1. 'द ग्रेट इंडियन कपिल शो'मध्ये सानिया मिर्झानं केला 'प्रेमाच्या शोधात' असल्याचा खुलासा - Sania Mirza
  2. अर्जुन रामपालनं रचला इतिहास, 'चाइल्ड रिलीफ अ‍ॅन्ड यू' अमेरिकेसाठी 1.5 डॉलर दशलक्ष केलं जमा - arjun rampal
  3. वरुण धवन आणि नताशा दलाल यांना कन्यारत्नाची प्राप्ती - Varun Dhawan And Natasha Dalal

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.