ETV Bharat / entertainment

'बडे मियाँ छोटे मियाँ' मधील 'मस्त मलंग झूम' गाणं रिलीज ; पाहा व्हिडिओ - अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ

Mast Malang Jhoom song out : अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ अभिनीत 'बडे मियाँ छोटे मियाँ' चित्रपटामधील 'मस्त मलंग झूम' गाणं रिलीज करण्यात आलं आहे. या गाण्यामध्ये या अ‍ॅक्शन जोडीव्यतिरिक्त 'दबंग लेडी' सोनाक्षी सिन्हा देखील दिसत आहे.

Mast Malang Jhoom song out
मस्त मलंग झूम गाणं रिलीज
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 28, 2024, 12:46 PM IST

मुंबई - Mast Malang Jhoom song out : अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफ स्टारर 'बडे मियाँ छोटे मियाँ' चित्रपट सध्या खूप चर्चेत आहे. आता या चित्रपटामधील 'मस्त मलंग झूम' गाणं रिलीज करण्यात आलं आहे. या गाण्यात अक्षय कुमार आणि टायगर सूट आणि बूटमध्ये डान्स करताना दिसत आहेत. याशिवाय या गाण्यात सोनाक्षी सिन्हा देखील दिसत आहे. या पार्टी थीम साँगमध्ये तिन्ही कलाकार जबरदस्त डान्स मूव्ह करत आहे. 'बडे मियाँ छोटे मियाँ' मधील 'मस्त मलंग झूम' गाणं इंटरनेटवर लोकप्रिय झालं आहे. या चित्रपटामध्ये अक्षय आणि टायगर थरारक स्टंट करताना दिसणार आहेत.

  • " class="align-text-top noRightClick twitterSection" data="">

'मस्त मलंग झूम' गाणं : 'मस्त मलंग झूम' गाणं 2.31 मिनिटांचं आहे. या गाण्याला विशाल मिश्रा, अरिजित सिंग आणि निकिता गांधी यांनी गायलं आहे. 'मस्त मलंग झूम' गाण्याचे संगीतकार विशाल मिश्रा आहेत. इर्शाद कामिल यांनी या गाण्याचे बोल लिहिले आहेत. दरम्यान या चित्रपटाच्या स्टार कास्टबद्दल बोलायचं झालं तर, 'बडे मियाँ छोटे मियाँ'मध्ये अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफव्यतिरिक्त पृथ्वीराज सुकुमारन, सोनाक्षी सिन्हा, अलाया एफ महत्त्वाच्या भूमिकेत आहेत. 27 फेब्रुवारीला अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफनं त्यांच्या अधिकृत इंस्टाग्रामवर 'मस्त मलंग झूम'चा टीझर शेअर केला होता. या ॲक्शन जोडीनं त्यांच्या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं होतं की, 'तुम्ही ॲक्शन पाहिली आहे. तुम्ही ब्रोमान्स पाहिला आहे. आता आम्हाला नृत्य पाहा. 'मस्त मलंग झूम'चा टीझर आता रिलीज झाला आहे. गाणं उद्या येईल.''

'बडे मियाँ छोटे मियाँ' चित्रपटाबद्दल : या गाण्याचा टीझर रिलीज होताच अनेकांनी यावर कमेंट्स करून आपली प्रतिक्रिया दिली होती. अनेक चाहत्यांनी या गाण्याचा टीझर पाहून अरिजित सिंगचं कौतुक केलं होतं. 'बडे मियाँ छोटे मियाँ' हा चित्रपट 9 एप्रिल रोजी रुपेरी पडद्यावर रिलीज होणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन अली अब्बास जफर यांनी केलंय. अली जफर, जॅकी भगनानी, वाशू भगनानी, दीपशिखा देशमुख आणि हिमांशू किशन मेहरा यांनी पूजा एंटरटेनमेंट आणि आझ (AAZ) फिल्म्सच्या बॅनरखाली निर्मित या चित्रपटाची वाट अनेकजण पाहात आहेत.

हेही वाचा :

  1. रुबीना दिलैक आणि अभिनव शुक्लानं त्याच्या मुलींचे गोंडस फोटो केले शेअर
  2. ट्रेलर रिलीजपूर्वी नव्या पोस्टरसह सिद्धार्थने वाढवली 'योद्धा'ची उत्सुकता
  3. रजनीकांत आणि साजिद नाडियादवाला एका अविस्मरणीय चित्रपट प्रवासासाठी एकत्र

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.