मुंबई - पॅन इंडिया चित्रपट 'ऑपरेशन व्हॅलेंटाईन'मध्ये अभिनेत्री मानुषी छिल्लरने रडार ऑफिसरची भूमिका साकारली आहे. या भूमिकेची तयारी करत असताना घेतलेल्या अनुभवाची रंजक माहिती तिनं शेअर केली आहे.
सत्य घटनांपासून प्रेरित 'ऑपरेशन व्हॅलेंटाइन'चे दिग्दर्शन शक्ती प्रताप सिंग हाडा यांनी केले आहे. या चित्रपटातून ते दिग्दर्शनात पदार्पण करत आहेत. युध्दात आघाडीवर काम करणाऱ्या हवाई दलातील वीरांच्या शौर्याच्या कथा यात मांडण्यात आली आहे. राष्ट्राचे रक्षण करताना त्यांना येणाऱ्या आव्हानांचा सामना करावा लागतो याचे थरारक प्रसंग यात दाखवण्यात आले आहेत.
चित्रपटाच्या तयारीबद्दल बोलताना मानुषी म्हणाली, "ऑपरेशन व्हॅलेंटाईनमध्ये मी साकारत असलेल्या भूमिकेसाठी मला रडार अधिकाऱ्याची जबाबदारी काय असते, देहबोली कशी असावी, अका विशिष्ठ आवाजात आज्ञा कशी द्यायची यासारख्या मुलभूत गोष्टी समजून घ्यायच्या होत्या. या काही गोष्टी आहेत ज्यावर मला काम करायचे होते."
मानुषीने आपल्या पात्रात सत्यता आणि अचूकता कशी आणली जाईल याची खात्री केली, याबद्दल ती म्हणाली, "सुदैवाने, सेटवर भारतीय वायुसेनेच्या टीममधील महत्त्वाच्या व्यक्ती होत्या. त्यामुळे जेव्हा जेव्हा आम्हाला कोणत्याही अतिरिक्त माहितीची आवश्यकता पडत असे किंवा मी कुठेही जात असे तेव्हा सेटवर माझ्याकडे नेहमी ते मार्गदर्शन करत होते. एक सामान्य रडार अधिकारी एखादी विशिष्ट गोष्ट कशी करेल याबद्दल मला त्यांच्याकडून खूप माहिती मिळाली. त्यामुळे या सर्व मुलभूत गोष्टी मी शिकले. यामध्ये केवळ रडार अधिकाऱ्याचे चित्रण कसे करायचे हे शिकत नव्हते, तर हवाई दलात घडणाऱ्या मूलभूत गोष्टी शिकत होते. इव्हॅक्युएशन आणि उड्डाण करणारे विमान यासारख्या संज्ञा यामुळे कळल्या. त्यामुळे, हे सर्व समजून घेणे हे एक पूर्णपणे नवीन जग होते. मी डीआरडीओची मुलगी आहे, त्यामुळे साहजिकच, मला वरवरच्या गोष्टी माहित आहेत, परंतु मी त्यात खोलवर जात होते..."
अलीकडेच, सुपरस्टार सलमान खानने चित्रपटाच्या अधिकृत हिंदी ट्रेलरचे लॉन्चिंग केले. यावेळी त्यैाने ऑपरेश व्हॅलेंटाईन टीमला 1 मार्चच्या रिलीजसाठी शुभेच्छाही दिल्या. तेलुगू ट्रेलर अभिनेता राम चरण याने डिजिटली लॉन्च केला होता.
या ट्रेलरमध्ये वरुण तेज शत्रूचा सामना करण्यासाठी सज्ज असलेला एक IAF पायलट म्हणून दाखवण्यात आला आहे. तर मानुषी कुशल वायुसेनेच्या रडार अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे. ट्रेलरमध्ये रोमांच, भावना आणि उत्साह यांचे परिपूर्ण मिश्रण आहे. शक्ती प्रताप सिंग हाडा, आमिर खान आणि सिद्धार्थ राज कुमार यांनी लिहिलेला हा चित्रपट 1 मार्च 2024 रोजी तेलुगू आणि हिंदीमध्ये प्रदर्शित होणार आहे.
हेही वाचा -