ETV Bharat / entertainment

'सिर्फ एक बंदा काफी है'च्या यशानंतर मनोज बाजपेयीनं केल्या भावना व्यक्त - MANOJ BAJPAYEE NEWS - MANOJ BAJPAYEE NEWS

Manoj Bajpayee News : 'सिर्फ एक बंदा काफी है' हा कोर्टरूम ड्रामा खूप हिट झाला आहे. आता या यशानंतर मनोज बाजपेयीनं आपलं मत व्यक्त केलंय.

Manoj Bajpayee
मनोज बाजपेयी (मनोज बाजपेयी (फाईल फोटो) (ANI))
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Jul 30, 2024, 11:06 AM IST

Updated : Jul 30, 2024, 12:38 PM IST

मुंबई - Manoj Bajpayee News : अभिनेता मनोज बाजपेयीनं त्याच्या अभिनय कारकीर्दत 100हून अधिक चित्रपटांमधून अभिनय केला आहे. विविधांगी व्यक्तिरेखा आणि वैशिष्ट्यपूर्ण अभिनयासाठी ओळखला जाणाऱ्या मनोज बाजपेयीनं अलीकडेच त्याच्या 'सिर्फ एक बंदा काफी है' या चित्रपटासाठी मिळालेल्या भरभरून प्रेमासाठी चाहत्यांचे आभार मानले आहेत. 'सिर्फ एक बंदा काफी है' हा कोर्टरूम ड्रामा अनेकांना आवडला आहे. या चित्रपटाची कहाणी खऱ्या घटनेवर आधारित आहे. या चित्रपटात मनोज बाजपेयीनं वकिलाची भूमिका साकारली आहे.

'सिर्फ एक बंदा काफी है' कोर्टरूम ड्रामा : या चित्रपटामध्ये मनोज बाजपेयी हा कथित धर्मगुरुकडून अन्याय झालेल्या मुलींना न्याय देण्याचा प्रयत्न करतो. दरम्यान ओटीटी प्लॅटफॉर्मवर 'सिर्फ एक बंदा काफी है' रिलीज होऊन एक वर्षाहून अधिक काळ झाला आहे. हा कोर्टरूम ड्रामा 13 मे 2023 रोजी झी5वर प्रदर्शित झाला होता. अलीकडेच, एका मुलाखतीत मनोज बाजपेयीनं म्हटलं, "सिर्फ एक बंदा काफी है' या चित्रपटानं इतिहास रचला आहे. ओटीटी प्लॅटफॉर्मवर रिलीज होऊन 1 वर्षाहून अधिक काळ झाला आहे. 1 अब्जहून अधिक लोकांनी हा ड्रामा पाहला आहे. मला खूप प्रेम आणि कौतुक मिळालं आहे."

'सिर्फ एक बंदा काफी है'चं मोठं यश : मनोज आणि अपूर्व सिंह कार्की पुन्हा एकदा एका नव्या कोर्टरूम ड्रामासाठी एकत्र येणार आहेत. काही दिवसांपूर्वी मनोजं पत्नी शबाना रझा बाजपेयी यांच्या वाढदिवसानिमित्त ही घोषणा केली होती. मनोज बाजपेयीनं सांगितलं की, "तो अपूर्वच्या नवीन शीर्षक न ठरलेल्या कोर्टरूम ड्रामामध्ये काम करणार आहे. याची निर्मिती ओरेगा स्टुडिओ करेल. याशिवाय विक्रम खखर आणि शबाना रझा बाजपेयीही निर्मात्याच्या खुर्चीवर असतील. 'सिर्फ एक बंदा काफी है'नं झी5वर 1 अब्ज पेक्षा जास्त वॉच मिनिट्स मिळवलं आहेत. ही या चित्रपटासाठी मोठी उपलब्धी आहे. त्यामुळे मनोज बाजपेयी सध्या यशाचा आनंद लुटत आहे.

हेही वाचा :

  1. मनोज बाजपेयीचा 100 वा चित्रपट : कुटुंबाच्या रक्षणासाठी प्राणाची बाजी लावणारा 'भैय्या जी' - Bhaiyya Ji Movie Promotion
  2. मनोज बाजपेयी अभिनीत 'भैय्या जी'चा ट्रेलर रिलीज, पाहा व्हिडिओ - Bhaiyya Ji Trailer out
  3. मनोज बाजपेयी स्टारर 'भैय्या जी'मधील 'बाघ का करेजा' गाणं रिलीज, पाहा व्हिडिओ - manoj bajpayee

Last Updated : Jul 30, 2024, 12:38 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.