पणजी (गोवा) - प्रसिद्ध फॅशन डिझायनर मनीष मल्होत्राचा निर्माता म्हणून पहिलाच "साली मोहब्बत" हा चित्रपट भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात (IFFI) प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटातून अभिनेत्री टिस्का चोप्रा पहिल्यांदा दिग्दर्शक म्हणून काम करत आहे. या चित्रपटात राधिका आपटे, दिव्येंदू, अंशुमान पुष्कर, सौरसेनी मैत्रा, शरत सक्सेना आणि अनुराग कश्यप यांच्यासह अनेक कलाकारांचा समावेश आहे.
इफ्फीचा प्रीमियर 22 नोव्हेंबरला होणार आहे. जिओ स्टुडिओ आणि स्टेज 5 प्रॉडक्शनचा सस्पेन्स ड्रामा असलेला "साली मोहब्बत" हा चित्रपट अप्रमाणिकता, फसवणूक आणि खुनाच्या कथेत अडकलेल्या गृहिणीवर आधारित आहे.
स्क्रिनिंगबद्दल उत्साहित झालेली टिस्का म्हणाली, "'साली मोहब्बत' ही माझ्या हृदयाच्या जवळची कथा आहे. माझ्या दृष्टीकोनावर विश्वास ठेवल्याबद्दल आणि दिग्दर्शक म्हणून माझ्या प्रवासाला पाठबळ दिल्याबद्दल मी मनीष मल्होत्रा आणि जिओ स्टुडिओची अत्यंत आभारी आहे. मला आशा आहे की प्रेक्षक या कथानकाशी जोडले जातील. मी या चित्रपटाच्या प्रीमियरसाठी कऊपच उत्साहित झाली आहे."
रिलायन्स इंडस्ट्रीजच्या मीडिया आणि कंटेंट बिझनेस हेड ज्योती देशपांडे या चित्रपटाकडे मनीष मल्होत्राचा सर्जनशील उपक्रम म्हणून पाहातात. "'साली मोहब्बत'च्या मार्फत मनीषने त्याच्या सर्जनशीलतेचा वारसा वाढवला आहे, आता त्याच्या डिझाइन्सप्रमाणेच मन मोहून टाकणाऱ्या कथा तयार होत आहेत," असं ज्याती देशपांडे म्हणाल्या.
निर्माता मनीष मल्होत्रा यांनीही साली मोहब्बत हा चित्रपट निर्माता म्हणून का निवडला याबद्दल त्यांचे विचार सांगितले, "स्टेज5 प्रॉडक्शनसह, मनाला भिडणारा आणि विचार करायला लावणारा सिनेमॅटिक अनुभव निर्माण करणे हे माझे उद्दिष्ट आहे. ज्या क्षणी मी साली मोहब्बतची स्क्रिप्ट वाचली, त्या क्षणी मी त्याच्या उत्कट आणि थरारक कथेकडे आकर्षित झालो. स्टेज 5 प्रॉडक्शनमध्ये, आम्ही सहकार्य करतो आहोत. मनापासून आवड आणि कलेबद्दलचे मनापासून प्रेम, दिग्दर्शकाबरोबर जवळून काम करून त्यांची दृष्टी कलात्मकतेने पडद्यावर आणण्यासाठी वचनबद्ध आहे. अशा ही कथा तयार करण्यासाठी टिस्का चोप्राची कमिटमेंट, जिओ स्टुडिओ आणि ज्योती देशपांडे यांचा पाठिंबा आणि ईफ्फी पिल्म फेस्टीव्हलमध्ये होणार सादरीकरण यासाठी मी उत्सुक आहे."
इंटरनॅशनल फिल्म फेस्टीव्हल ऑफ इंडाया (IFFI ) 2024 चित्रपट महोत्सव गोव्यात 20 नोव्हेंबर ते 28 नोव्हेंबर दरम्यान पार पडणार आहे. यामध्ये देशा विदेशाली नामवंत निर्माते, दिगदर्शक, चित्रपट समीक्षक, रसिक प्रेक्षक आणि चित्रपट व्यवसायाशी संबंधित लोक यात सामील होणार आहेत.