ETV Bharat / entertainment

दिग्दर्शक संगीत सिवन यांचे 61 व्या वर्षी निधन, सेलेब्रिटींनी वाहिली श्रद्धांजली - Sangeet Sivan passes away - SANGEET SIVAN PASSES AWAY

मल्याळम आणि हिंदी फिल्म्सचे दिग्दर्शक संगीत सिवन यांचे वयाच्या 61 व्या वर्षी निधन झालं आहे. मुंबईतील रुग्णालयात 8 मे रोजी त्यांनी अखेरचा श्वास घेतला.

Sangeet Sivan
दिग्दर्शक संगीत सिवन (( Photo Instagram ))
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 9, 2024, 9:45 AM IST

मुंबई - मल्याळम आणि हिंदी चित्रपटांचे दिग्दर्शन करणारे दिग्दर्शक संगीत सिवन यांचे वयाच्या ६१ व्या वर्षी मुंबईत निधन झाले. त्यांनी मोहनलाल यांच्याबरोबर त्यांच्या मल्याळम चित्रपटांमध्ये काम केले होते. 'जोर', 'क्या कूल हैं हम', 'दीवाना 2' आणि 'यमला पगला' या हिंदी चित्रपटांचे दिग्दर्शन करुन शिवन यांनी बॉलिवूडमध्येही आपले योगदान दिले आहे. शिवन यांना मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. याच ठिकाणी त्यांनी ८ मे रोजी अखेरचा श्वास घेतला.

या सेलिब्रिटींनी व्यक्त केला शोक

दिग्दर्शक संगीत सिवन यांच्याबरोबर काम करणारा अभिनेता रितेश देशमुख याने त्यांना अखेरची श्रद्धांजली वाहणारी एक नोट पोस्ट केली आहे. रितेशने लिहिलंय, 'संगीत शिवन सर राहिले नाहीत हे समजल्यानंतर खूप दुःख झाले. क्या कूल हैं हम आणि अपना सपना मनी मनी या चित्रपटासाठी मी त्यांचे पुरेसे आभार मानू शकत नाही, ते खूप चांगले व्यक्ती होता. त्यांचे कुटुंब आणि प्रियजन, त्यांची पत्नी, मुले, भाऊ यांच्याप्रती माझ्या मनापासून संवेदना. वैभवात विश्रांती घ्या..संगीतदा'. अभिनेता तुषार कपूरनेही त्याच्या सोशल मीडिया हँडलवरून सिवन यांच्या निधनाबद्दल शोक व्यक्त केला आहे.

चित्रपटांचे दिग्दर्शक म्हणून काम

संगीत सिवन हे छायाचित्रकार आणि सिनेमॅटोग्राफर सिवन यांचे ज्येष्ठ पुत्र आणि संतोष सिवन आणि संजीव सिवन यांचे ते भाऊ होते. त्यांनी रघुवरन आणि सुकुमारन अभिनीत 'व्यूहम' हा मल्याळम भाषेतील गुन्हेगारी चित्रपट लिहिला आणि दिग्दर्शित केला. त्यांनी मोहनलाल यांच्यासोबत 'योद्धा', 'गंधर्वम' आणि 'निर्मय' या तीन ब्लॉकबस्टर चित्रपटांचे दिग्दर्शन केले. 'चुरा लिया है तुमने', 'क्या कूल हैं हम', 'अपना सपना मनी मनी' यांसारखे बॉलिवूड चित्रपटही त्यांनी केले. त्यांनी क्लिक हा श्रेयस तळपदे, चंकी पांडे यांच्या भूमिका असलेला हॉरर चित्रपट बनवल्यानंतर ते पुन्हा मल्याळम चित्रपटाकडे वळले होते. त्यानंतर त्यांनी 'यमला पगला दीवाना 2'मधून पुनरागमन केले.

हेही वाचा -

  1. 'द ग्रेट इंडियन कपिल शर्मा शो'मध्ये सोनाक्षी सिन्हानं तिच्या लग्नाबद्दल केलं भाष्य, जाणून घ्या सविस्तर - THE GREAT INDIAN KAPIL SHARMA SHOW
  2. फरहान अख्तरने शेअर केली 'डॉन ३' च्या शूटिंग लोकेशनची झलक - Farhan Akhtar Don 3
  3. प्रियांका चोप्रानं जॉन सीना स्टारर ॲक्शन कॉमेडी चित्रपटाचं शूटिंग केलं पूर्ण - priyanka chopra

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.