ETV Bharat / entertainment

मलायका अरोरानं खास मैत्रीण करिश्मा कपूरला पाठवल्या 'पन्नाशी'च्या शुभेच्छा - Karisma Kapoor birthday

author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Jun 25, 2024, 9:49 AM IST

Karisma Kapoor birthday : अभिनेत्री करिश्मा कपूरच्या 50 व्या वाढदिवसानिमित्त तिची खास मैत्रीण मलायका अरोरानं वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत. यासाठी तिनं करिश्माबरोबरचे काही सुंदर संस्मरणीय फोटो शेअर करत एक सुंदर संदेश पाठवला आहे.

Malaika Arora and Karisma Kapoor
मलायका अरोरा आणि करिश्मा कपूर (Instagram/ ANI)

मुंबई - Karisma Kapoor birthday : करिश्मा कपूर आज आपला 50 वा वाढदिवस पूर्ण करत आहे. तिला तिची खास मैत्रीण, अभिनेत्री आणि नृत्यांगना मलायका अरोरा हिनं शुभेच्छा दिल्या आहेत. यासाठी तिनं करिश्माबरोबरच्या फोटोंचा कॅरोसेल शेअर केलं आहे.

मलायकानं तिच्या इंस्टाग्राम हँडलवर फोटोंची मालिका पोस्ट केली. यामध्ये करिश्मा तिची बहीण करीना कपूर आणि मैत्रिणी मलायका आणि अमृता अरोराबरोबर पोज देताना दिसत आहे. मलायकानं वाढदिवसाच्या गोड शुभेच्छा देताना कॅप्शनमध्ये लिहिले, "तुझा पन्नाशीचा लूक खूपच सहज सुंदर दिसतो लोलो. करिश्मा तुला वाढदिवसाच्या शुभेच्छा...आम्ही तुझ्यावर प्रेम करतो."

'अनारी', 'अंदाज अपना अपना', 'राजा बाबू', 'कुली नंबर 1', 'साजन चले ससुराल', 'जीत', 'राजा हिंदुस्तानी', 'दिल तो पागल है', यासह अनेक हिट चित्रपटांसाठी करिश्मा कपूर ओळखली जाते. करिश्मा कपूरनं 'फिजा' आणि 'झुबेदा' या नाट्यमय चित्रपटातील तिच्या मुख्य भूमिकांसाठी फिल्मफेअरमध्ये अनुक्रमे सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री (समीक्षक) पुरस्कार जिंकले आहेत. करिश्मा कपूर अलिकडेच 'मर्डर मुबारक'या नेटफ्लिक्सवरील चित्रपटात अखेरची दिसली होती. या चित्रपटात पंकज त्रिपाठी, सारा अली खान, विजय वर्मा, डिंपल कपाडिया, संजय कपूर, टिस्का चोप्रा, सुहेल नय्यर आणि तारा अलीशा बेरी यांनीही काम केले होते.

करिश्मा आगामी 'ब्राउन' या मालिकेत दिसणार आहे. 'डेल्ही बेली' फेम अभिनय देव यांनी दिग्दर्शित केलेला 'ब्राऊन' हा चित्रपट रीटा ब्राउन यांच्यावर आधारित आहे. याशिवाय ती 'इंडियाज बेस्ट डान्सर'च्या चौथ्या सीझनला जज करताना दिसणार आहे.

मलायकाबद्दल बोलायचं झालं तर तिनं 'कांते' आणि 'ईएमआय' सारख्या चित्रपटात काम केलं आहे. 'छैय्या छैय्या', 'गुर नालो इश्क मीठा', 'माही वे', 'काल धमाल' आणि 'मुन्नी बदनाम हुई' यांसारख्या तिच्या डान्स नंबरसाठीही ती ओळखली जाते. इंडियाज गॉट टॅलेंट या शोमध्ये मलायका जज पॅनलमध्ये आहे. ती 2019 मधील एमटीव्ही 'सुपरमॉडेल ऑफ द इयर'ची जज आणि होस्ट होती. ती अभिनेता अर्शद वारसी आणि कोरिओग्राफर फराह खानबरोबर 'झलक दिखला जा' हा शो जज करत होती.

हेही वाचा -

  1. "दीपिकाचं होणारं बाळ 'कल्की'सारखाच चित्रपट बनवेल", कमल हासनचे उद्गार - Kalki 2898 AD
  2. शाहरुख खानची बॉलिवूडमध्ये 32 वर्षे, जाणून घ्या त्याच्या हिट चित्रपटांबद्दल - SHAH RUKH KHAN
  3. प्रभास स्टारर 'थीम ऑफ कल्की'चा प्रोमो रिलीज, मथुरेत होणार लॉन्चिंग - PRABHAS STARRER KALKI 2898 AD

ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.