मुंबई - Maidaan Glimpse : अभिनेता अजय देवगणने बुधवारी त्याच्या आगामी 'मैदान' चित्रपटातील झलक दाखवून चाहत्यांना उत्साहित केलं आहे. या व्हिडिओमध्ये अजय देवगण फॉर्मल ड्रेस घालून कामा निमित्त जात असताना रस्त्याच्या कडेला खेळणाऱ्या मुलांचा फुटबॉल त्याच्याकडे येतो. तो किक मारुन त्यांना परत करण्याच्या तयारीत असतानाच समोरुन ट्राम ट्रेन पास होत असते त्यामुळे ती मुलं बॉलला किक न मारण्याची विनंती करतात. नेमका याच वेळी जी किक तो मारतो त्यामुळे हवेत स्विंग होऊन ट्रामला न थडकता बॉल मुलांकडे येतो. यामुळे मुलांच्या चेहऱ्यावर उमटलेले आश्चर्याचे भाव दिसतात. या मनोरंजक टीझरच्या व्हिडिओमुळे मैदान या स्पोर्ट्स ड्रामाच्या अत्यंत उत्कंठावर्धक चित्रपटाबद्दलची उत्कंठा वाढणार आहे.
इंस्टाग्रामवर अजय देवगणने कॅप्शनसह व्हिडिओ शेअर केला: "आ जाओ मैदान में! आम्ही भारतीय फुटबॉलच्या सुवर्ण युगाची अविश्वसनीय सत्य कथा सादर करण्यास तयार आहोत."
'मैदान' हा स्पोर्ट्स ड्रामा चित्रपट अमित रविंदरनाथ शर्मा यांनी दिग्दर्शित केला आहे. बोनी कपूर आणि झेड स्टुडिओ द्वारे सह-निर्मित हा चित्रपट भारतीय फुटबॉलच्या सुवर्ण वर्षांच्या स्मरणार्थ एक स्पोर्ट्स ड्रामा आहे. अजयने सय्यद अब्दुल रहीम यांची भूमिका साकारली आहे. या अष्टपैलू फुटबॉलपटूला भारतीय फुटबॉलचे संस्थापक जनक मानले जाते. या चित्रपटात प्रियमणी, गजराज राव आणि बंगाली अभिनेता रुद्रनील घोष देखील आहेत.
2020 मध्ये नवीन कोरोनाव्हायरस महामारीचा सामना करण्यासाठी लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे, निर्माता बोनी कपूर यांना चित्रपटाचा सेट वेगळे करणे भाग पडले. शिवाय, चक्रीवादळाने 2021 च्या मे मध्ये 'मैदाना'चा सेट खराब करुन टाकला. बऱ्याच विलंबानंतर, हा चित्रपट 2024 च्या ईदला रिलीज होणार आहे. आश्चर्याची गोष्ट म्हणजे, या चित्रपटाला अक्षय कुमार आणि टायगर श्रॉफचा अॅक्शन चित्रपट 'बडे मियाँ छोटे मियाँ' याच्याशी बॉक्स ऑफिसवर मोठी टक्कर होणार आहे.
हेही वाचा -