ETV Bharat / entertainment

महेश बाबू तेलुगू व्हर्जनमध्ये 'मुफासा द लायन किंग'साठी व्हॉईस ओव्हर करणार, 'या' दिवशी होईल ट्रेलर रिलीज - MAHESH BABU - MAHESH BABU

Mahesh Babu Voice Over For Mufasa: 'मुफासा: द लायन किंग'चे निर्माते चित्रपटाच्या व्हॉईस ओव्हरवर सध्या काम करत आहेत. इंग्रजी आणि हिंदी ट्रेलर रिलीज झाल्यानंतर तेलुगू व्हर्जनसाठी 'मुफासा: द लायन किंग' चित्रपटामधील मुफासाच्या पात्राला महेश बाबू आवाज देणार आहे.

Mahesh Babu Voice Over For Mufasa
महेश बाबू मुफासासाठी व्हॉईस ओव्हर करणार (Etv Bharat)
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Aug 21, 2024, 2:53 PM IST

मुंबई - Mahesh Babu Voice Over For Mufasa : साऊथचा अभिनेता महेश बाबू आगामी डिस्ने चित्रपट 'मुफासा: द लायन किंग'च्या टीममध्ये सामील झाला आहे. यापूर्वी बॉलिवूड अभिनेता शाहरुख खाननं या चित्रपटाच्या हिंदी आवृत्तीसाठी मुफासाच्या पात्राला आवाज दिला आहे. आता तेलुगू आवृत्तीमध्ये महेश बाबूला मुफासासाठी आवाज देण्यासाठी निवडण्यात आलं आहे. डिस्ने इंडियानं या वृत्ताला दुजोरा दिला आहे. याशिवाय, 'मुफासा: द लायन किंग'च्या तेलुगू आवृत्तीबद्दल एक अपडेट समोर आली आहे. 21 ऑगस्ट रोजी वॉल्ट डिस्ने स्टुडिओ इंडियानं एक्सवर 'मुफासा: द लायन किंग'च्या तेलुगू आवृत्तीच्या ट्रेलरबद्दल खुलासा केला.

महेश बाबू देणार तेलुगू आवृत्तीमध्ये मुफासाला आवज : निर्मात्यांनी मुफासाचे पोस्टर तेलुगू व्हर्जनमध्ये पोस्ट केले. या पोस्टरबरोबर त्यांनी महेश बाबूच्या फोटोला देखील जोडले आहे. पोस्टर शेअर करताना निर्मात्यांनी या पोस्टच्या कॅप्शनमध्ये लिहिलं की, "जंगल लाइफच्या सर्वोच्च राजाला जिवंत करत आहे. सुपरस्टार महेशला तेलुगूमध्ये मुफासाचा आवाज म्हणून सादर करण्यास उत्सुक आहे. सोमवारी रिलीज होणारा 'मुफासा: द लायन किंग'चा तेलुगू ट्रेलर पाहा." दरम्यान बॉलिवूड सुपरस्टार शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान हा या चित्रपटात सिम्बाला आवाज देईल आणि अबराम खान छोट्या मुफासाला आवाज देत आहे. आता हा चित्रपट पाहण्यासाठी अनेकजण उत्सुक आहेत.

'मुफासा'चा तेलुगू ट्रेलर कधी होईल रिलीज : ट्रेड ॲनालिस्ट तरण आदर्श यांनी 'मुफासा: द लायन किंग'च्या तेलुगू व्हर्जनच्या ट्रेलर रिलीज डेटबद्दल खुलासा केला आहे. तरण यांच्या म्हणण्यानुसार, 'मुफासा: द लायन किंग'चा तेलुगू ट्रेलर हा 26 ऑगस्ट 2024 रोजी सकाळी 11.07 वाजता लॉन्च होईल. हा चित्रपट 20 डिसेंबर 2024 रोजी यावर्षी ख्रिसमसच्या मुहूर्तावर इंग्रजी, हिंदी, तमिळ आणि तेलुगू या चार भाषांमध्ये रुपेरी पडद्यावर प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाची बऱ्याचं दिवसांपासून चर्चा सुरू आहेत. 'मुफासा: द लायन किंग' चित्रपटाचा हिंदी ट्रेलर हा देखील चाहत्यांना खूप आवडला होता.

हेही वाचा :

  1. 'मुफासा: द लायन किंग'चा हिंदी व्हर्जनमधला ट्रेलर रिलीज, पाहा व्हिडिओ - MUFASA THE LION KING
  2. 'द लायन किंग'चा प्रीक्वल 'मुफासा: द लायन किंग'चा ट्रेलर रिलीज, पाहा व्हिडिओ - mufasa the lion king trailer out
  3. The Lion King prequel लायन किंग प्रीक्वल मुफासा: द लायन किंगची डिस्नेकडून घोषणा, प्रतीक्षा रिलीज तारखेची

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.