मुंबई - Mahesh and Namrata Wedding Anniversary : साऊथ सुपरस्टार महेश बाबूसाठी 10 फेब्रुवारी हा दिवस खूप विशेष आहे. 10 फेब्रुवारी 2005 रोजी त्यानं अभिनेत्री नम्रता शिरोडकरशी लग्न केलं होत. दरम्यान, त्यानं पत्नीला 19व्या लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या आहेत. त्यानं सोशल मीडियावर एक रोमँटिक फोटो शेअर करून पत्नीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देत लिहिलं, ''प्रेम, आनंद आणि आयुष्यातील प्रत्येक सुंदर क्षणाचे भागीदार, एनएसजीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा.'' महेशचे आणि नम्रताचे चाहते त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना दिसत आहेत.
महेश बाबू आणि नम्रता शिरोडकरचं लग्न : महेश बाबूच्या पोस्टमध्ये त्यानं एक थ्रोबॅक फोटो पोस्ट केला आहे. फोटोत नम्रता महेशला किस करताना दिसत आहे. या जोडप्याचा हा फोटो अनेकांना आवडला आहे. महेश बाबू अनेकदा आपल्या पत्नीसह परदेशात सुट्टीचा आनंद घेण्यासाठी जात असतो. अनेकदा तो आपल्या कुटुंबासोबतचे फोटो सोशल मीडियावर चाहत्यांबरोबर शेअर करतो. दरम्यान या जोडप्याला दोन मुले (एक मुलगा आणि एक मुलगी) आहेत. महेब बाबूची मुलगी सिताराला अभिनेत्री व्हायचे आहे आणि तिनं अनेक चित्रपटांमध्येही काम केलं आहे. अनेकदा ती आपले व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते.
महेश बाबू वर्कफ्रंट : 12 जानेवारीला मकर संक्रांतीच्या मुहूर्तावर सुपरस्टार महेश बाबू आणि श्रीलीला स्टारर चित्रपट 'गुंटूर कारम' रिलीज झाला होता. या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर 250 कोटींहून अधिकचा व्यवसाय केला आहे. 'गुंटूर कारम' ॲक्शन कॉमेडी ड्रामा चित्रपटाचे दिग्दर्शन त्रिविक्रम श्रीनिवास यांनी केलंय, ज्यांनी 'अला वैकुंठपुरमलो' चित्रपटाचे दिग्दर्शन केलं होतं. त्याच्या या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत अल्लू अर्जुन काम केलंय. 'अला वैकुंठपुरमलो' हिंदी रिमेक 'शेहजादा' आहे, ज्यात कार्तिक आर्यन आणि क्रिती सेनॉन आहेत. महेश बाबू आगामी 'जन गण मन' या चित्रपटामध्ये दिसणार आहे. हा चित्रपट देशभक्तीवर आधारित असणार आहे.
हेही वाचा :