ETV Bharat / entertainment

'माहेरची साडी'च्या प्रदर्शनाला 33 वर्ष पूर्ण, गुणी 'ट्रॅजेडी क्वीन' अलका कुबल नाही तर 'ही' अभिनेत्री होती निर्मात्याची पहिली पसंत - Maherchi Sadi Completed 33 Years

Maherchi Sadi Completed 33 Years : 'माहेरची साडी' हा मराठी घराघरात पोहोचलेल्या मराठी चित्रपटानं आज 33 वर्ष पूर्ण केली. 'माहेरची साडी' या चित्रपटानं मराठी चित्रपटसृष्टीला अलका कुबल (आठल्ये) यांच्या रुपानं नवी 'ट्रॅजेडी क्वीन' दिली. या चित्रपटानं मराठी चित्रपटसृष्टीतील चित्रपटांचे आधीचे सर्व रेकॉर्ड मोडले. मात्र या चित्रपटातल्या आपल्या व्यक्तिरेखेसाठी पहिली पसंत दुसरीच अभिनेत्री होती, अशी माहिती अलका कुबल - आठल्ये यांनी ईटीव्ही भारतशी एक्स्लुसिव्ह बोलताना दिली.

Maherchi Sadi Completed 33 Years
अलका कुबल आठल्ये (ETV Bharat)
author img

By ETV Bharat Entertainment Team

Published : Sep 18, 2024, 3:52 PM IST

Updated : Sep 18, 2024, 4:07 PM IST

मुंबई Maherchi Sadi Completed 33 Years : खच्चून भरलेलं चित्रपटगृह. . .त्यात हमसून हमसून रडणाऱ्या महिला अन् हुंदके देणाऱ्या मुली, चित्रपटगृहाबाहेर जाऊन आसवांनी भिजलेला रुमाल पिळून पुन्हा भावनेला वाट मोकळी करुन देणारी माणसं. अतिशयोक्ती वाटावा असा प्रसंग! विशेष म्हणजे हे चित्र मुंबईतल्या मराठी चित्रपटांच्या हक्काच्या 'भारतमाता' चित्रपटगृहासह उर्वरित महाराष्ट्रातल्या अनेक चित्रपटांनी पाहिलं. चित्रपटाने तुफान व्यावसायिक मिळवणं नवीन नाही. मात्र बॉक्स ऑफिस यशाबरोबरच चित्रपटरसिकांच्या मनाचा ठाव घेणं, ही बाब दुर्मिळ! काही चित्रपट इतिहास घडवण्याचं प्राक्तन घेऊन रसिकांसमोर येतात. त्यातही एखादाच दंतकथा बनतो. 'माहेरची साडी' म्हणजे अशीच एक दंतकथा. चित्रपट झळकला आणि मराठी चित्रपटविश्वाला नवी 'ट्रॅजेडी क्वीन' मिळाली. होय मराठीतली नवी ट्रॅजेडी क्वीनच, जिनं महाराष्ट्रातील घराघरात, मनामनात आपल्या अभिनयाचं गारुड केलं, जिनं महिलांसह पुरुषांनाही चित्रपटगृहात हमसून हमसून रडायला लावलं. ते नाव म्हणजे अलका कुबल (आठल्ये). आज 'माहेरची साडी' या चित्रपटाला 33 वर्ष पूर्ण झाली, मात्र आजही हा चित्रपट लागला, तर कलाप्रिय मराठी माणूस हुंदके आवरत नकळत आपल्या डोळ्यातून येणाऱ्या आसवांना वाट मोकळी करुन देतो. महिलांना अश्रूंचा आवेग आवरत नाही. त्या पदर डोळ्याला लाऊन हमसून हमसून रडतात. मराठी चित्रपट सृष्टीत 'दंतकथा' ठरलेल्या 'माहेरची साडी' या चित्रपटानं आज 33 वर्ष पूर्ण केली, त्यानिमित्तानं ही विशेष माहिती.

मराठी चित्रपट सृष्टीला मिळाली नवी 'ट्रॅजेडी क्वीन' : मराठी चित्रपटसृष्टीत अलका कुबल यांच्या 'माहेरची साडी' या चित्रपटानं सगळे रेकॉर्ड ब्रेक केले. अलका कुबल यांच्या रुपानं मराठी चित्रपटसृष्टीला नवी 'ट्रॅजेडी क्वीन' मिळाली. या चित्रपटानं अलका कुबल (आठल्ये) यांना घराघरात पोहोचवलं. त्या मराठी चित्रपटरसिकांच्या अलकाताई झाल्या. या चित्रपटाच्या आधीही अलकाताईंनी काही चित्रपटांमध्ये काम केलं होतं. वयाच्या 15 व्या वर्षी त्या दिवंगत स्मिता पाटील यांच्या जबरदस्त अभिनयानं नटलेल्या 'चक्र' चित्रपटातून कॅमेऱ्याला सामोऱ्या गेल्या. नंतरही काही मराठी चित्रपटांमधून महत्त्वाच्या व्यक्तिरेखा साकारल्या. मात्र 'माहेरची साडी'नं चित्रपटसृष्टीचं सर्व गणितच बदललं. अलकाताई जणू सर्व मराठी कलाप्रेमींच्या घरच्या सदस्य झाल्या. आजही 'माहेरची साडी' हा चित्रपट पाहणारा प्रेक्षक मुश्किलीने हुंदका आवरतो. महाराष्ट्रातील असं क्वचितच एखादं घर असेल, जिथल्या सदस्याने त्या काळात हा चित्रपट पाहिला नाही. महिलांच्या मनावर आजही या चित्रपटाचं गारुड कायम आहे. हिंदी चित्रपटसृष्टीत दिवंगत मीना कुमारी यांना 'ट्रॅजेडी क्वीन' म्हणून ओळखलं जातं. हेच बिरुद मराठीत अलकाताईंनी मिळवलं.

अलकाताईंचं स्मरणरंजन : 'माहेरची साडी' प्रदर्शित झाल्याच्या घटनेला 33 वर्ष पूर्ण झाल्याबद्दल ईटीव्ही भारतने अलका कुबल- आठल्ये यांच्याशी संवाद साधला. ईटीव्ही भारतशी एक्स्लुसिव्ह बोलताना 'माहेरची साडी' च्या आठवणींना अलकाताईंनी उजाळा दिला.

"निर्माता विजय कोंडके यांना या चित्रपटात काम करण्यासाठी भाग्यश्री पटवर्धन ही अभिनेत्री हवी होती. मात्र विजय चव्हाण, पितांबर काळे आणि उमेश वैद्य यांनी या भूमिकेसाठी माझ्या नावाचा आग्रह धरला. त्यामुळे या 'ऑल टाइम ग्रेट' चित्रपटासाठी मला जे योगदान देता आलं त्याचं मोठं श्रेय या तिघांना जातं. खरंतर सुरुवातीला हा चित्रपट फारसा चालला नाही. मात्र तिसऱ्या, चौथ्या आठवड्यानंतर चित्रपटानं मोठी भरारी घेतली. 'माहेरची साडी' ने आम्हाला स्वप्नवत यश मिळवून दिलं. आजही 'माहेरची साडी' म्हणजे अलका कुबल हे समीकरण घट्ट आहे. या चित्रपटातले माझे काही सहकारी आमची साथ सोडून अनंताच्या प्रवासाला निघून गेले, याचं मात्र खूप वाईट वाटतं."

चित्रपटाच्या रम्य आठवणी जागवताना यातल्या विजय चव्हाण, विक्रम गोखले, रमेश भाटकर, सुहासिनी देशपांडे आदी सहकाऱ्यांबरोबरचा स्नेहभावाची आठवून अलकाताईंचा आवाज कातर झाला.

'माहेरची साडी' चित्रपटाची रेकॉर्डब्रेक कामगिरी : मराठी चित्रपटसृष्टीत नवनवे विक्रम प्रस्थापित करण्याचा मान 'माहेरची साडी' कडे जातो. पुण्यातल्या 'विजयानंद' थिएटरमध्ये सलग 131 आठवडे चाललेल्या 'सांगत्ये ऐका' नंतर सलग दोन वर्षांहून अधिक काळ पुण्यातल्याच 'प्रभात' थिएटरमध्ये 'माहेरची साडी'ने मुक्काम ठोकला. नेमकं सांगायचं तर, 'माहेरची साडी' तब्बल 127 आठवडे चित्रपटगृहात चालला. संत तसंच छत्रपती शिवाजी महाराज आणि त्यांच्या मावळ्यांचे चरित्रपट, लावणीपट, सामाजिक चित्रपट, विनोदी चित्रपट अशा वेगवेगळ्या लाटेवर स्वार झालेल्या चित्रपटसृष्टीत 'माहेरची साडी' नंतर कौटुंबीक चित्रपटांची नवी लाट आली. एका अर्थाने या चित्रपटाने एक ट्रेंड सेट केला. दिवंगत सुलोचना, जयश्री गडकर, सीमा देव यांच्यासारख्या घरंदाज अभिनेत्रींच्या प्रभावळीत अलका कुबल-आठल्ये सन्मानाने दाखल झाल्या.

'त्या' काळी सर्वाधिक कमाई करणारा चित्रपट : दादा कोंडके यांचे पुतणे विजय कोंडके यांनी दिग्दर्शित केलेला 'माहेरची साडी' हा चित्रपट त्या काळी सर्वाधिक कमाई करणारा पहिला मराठी चित्रपट ठरला. या अगोदर कोणत्याही मराठी चित्रपटानं 'माहेरची साडी' इतकी कमाई केली नव्हती. या चित्रपटानं पहिल्या तीन महिन्यांत तब्बल 12 कोटी रुपयांचा गल्ला कमावला. दिवंगत विक्रम गोखले, रमेश भाटकर, विजय चव्हाण यांच्यासह अजिंक्य देव आणि उषा नाडकर्णी यांच्या अभिनयाने प्रेक्षकांची वाहवा मिळवली. उषा नाडकर्णी यांनी साकारलेल्या खाष्ट सासूने तर एवढी लोकप्रियता मिळवली की, दिवंगत ललिता पवार यांच्यानंतर पडद्यावरची सर्वात खाष्ट सासू म्हणून त्यांचंच नाव सर्वतोमुखी झालं.

महिला अलका कुबल यांच्यावरुन ओवाळायच्या लिंबू मिरच्या : एका खाष्ट सासूच्या आणि सासरच्या छळाचा जाच सहन करणारी केविलवाणी सुनेची व्यक्तिरेखा 'माहेरची साडी' चित्रपटात अलका कुबल यांनी रंगवली. त्यांनी साकारलेल्या लक्ष्मी या व्यक्तिरेखेनं महिलांच्या मनावर चांगलंच गारुड केलं. अलका कुबल कार्यक्रमासाठी बाहेर गेल्यानंतर महिला त्यांच्यावरुन लिंबू मिरची ओवाळून टाकायच्या. त्यांना हात धरुन जवळ घेऊ पाहायच्या. ही त्यांनी साकारलेल्या व्यक्तिरेखेला मिळालेली पावती होती.

'माहेरची साडी'चा सिक्वल येणार ? : 'माहेरची साडी' 1991 मध्ये प्रदर्शित झाला. या चित्रपटाचा सिक्वल येणार असल्याची चर्चा चित्रपटसृष्टीत सुरु आहे. मात्र याबाबत संबंधितांकडून अधिकृत दुजोरा मिळालेला नाही.

हेही वाचा :

  1. Maherchi sadi 2 : 30 वर्षांनी येणार 'माहेरची साडी' चा दुसरा भाग...
  2. 'माहेरची साडी' सिनेमा ७० आठवडे चाललेलं 'चित्रा' बंद पडणं दुर्दैवी - विजय कोंडके

Last Updated : Sep 18, 2024, 4:07 PM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2024 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.