ETV Bharat / entertainment

गीतकार जावेद अख्तर यांना दिलासा, तर कंगना रणौतची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली - Javed Akhtar

जावेद अख्तर यांची सार्वजनिक कार्यक्रमात बदनामी केल्याची तक्रार दाखल झाल्यानंतर कंगना रणौतनं मुंबई उच्च न्यायालयाचे दार ठोठावले होते. मात्र तिची ही याचिका उच्च न्यायालयानं फोटाळून लावली आहे.

Etv Bharat
Etv Bharat
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 2, 2024, 5:49 PM IST

मुंबई - गीतकार जावेद अख्तर यांची सार्वजनिक कार्यक्रमात कंगना रणौतने बदनामी केल्याप्रकरणी आज मुंबई उच्च न्यायालयात सुनावणी झाली. या सुनावणीमध्ये गीतकार जावेद अख्तर यांचा खटला आधी दाखल झाला असल्यामुळे, कंगना रणौत हिने दाखल केलेली याचिका उच्च न्यायालयाने साफ फेटाळून लावलेली आहे. त्यामुळे जावेद अख्तर यांना मोठा दिलासा मिळाला. 2 फेब्रुवारी रोजी पी. डी. नाईक यांच्या न्यायालयानं हा आदेश जारी केला आहे.

2016 मध्ये एका मासिकानं आयोजित केलेल्या सार्वजिनिक कार्यक्रमात अनेक कलाकारांसह अभिनेत्री कंगना रणौत उपस्थित होती. या मुलाखतीच्या दरम्यान कंगना रणौतने जावेद अख्तर यांच्या संदर्भात सार्वजनिकरित्या बदनामी करणारे विधान केले होते. त्यामुळे जावेद अख्तर यांनी तक्रार दाखल केली होती. त्यानंतर कंगना विरोधात त्यांनी खटलादेखील दाखल केला होता. कंगना रणौतच्यावतीने यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली गेली होती. त्यात तिनं खालच्या न्यायालयात तिच्यावर दाखल केलेल्या खटल्याला स्थगिती द्यावी, अशी मागणी केली होती. परंतु यासंदर्भात मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती पी. डी. नाईक यांनी जारी केलेल्या आदेशात, सर्वात आधी तक्रार आणि खटला जावेद अख्तर यांनी दाखल केला असल्यामुळे कंगना रणौतची याचिका फेटाळून लावत असल्याचे म्हटलं आहे.

काय झाले सुनावणीत?- कंगनाने सार्वजनिकरित्या बदनामीचे विधान केल्यानंतर जावेद अख्तर यांनी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार केली गेली होती. त्यानंतर एकमेकांच्या विरुद्ध तक्रारीदेखील मुंबईच्या संबंधित पोलीस ठाण्यामध्ये दाखल झाल्या होत्या. नंतर न्यायदंडाधिकारी न्यायालयात हा खटला दाखल झाला होता. 'कंगनाला आत्महत्या करावी लागेल', असे विधान केल्याचा आरोप कंगनानं न्यायालयात केला होता. तर, 'कंगना खोटं बोलत असून मी असे बोललो नसल्याचे', जावेद अख्तर म्हणाले होते.

जावेद अख्तर यांनी आधी केली तक्रार- न्यायमूर्ती पी.डी. नाईक यांनी दोन्ही बाजूंचा विचार करता आपल्या निर्णयात नमूद केलेले आहे की, "कंगना हिने तिच्याविरुद्ध दाखल केलेल्या खटल्याला स्थगिती मिळावी, अशी जी मागणी केलेली आहे. ती उचित नाही. कारण जावेद अख्तर यांनी तिच्या विरोधात फार आधीपासून तक्रार आणि खटला दाखल केलेला आहे. हे प्रकरण बरंच पुढे पुढे गेलेलं आहे. त्यामुळे आता कंगना रणौत म्हणते, तशी मागणी पूर्ण करता येत नाही. यामुळे तिची याचिका फेटाळून लावली जात आहे."

  • या संदर्भात कंगना हिचे वकील रिजवान सिद्दिकी यांना निकालाच्या संदर्भात विचारले असता ते म्हणाले, "आदेशाची प्रत न्यायालयाकडून जोपर्यंत जारी होत नाही, तोपर्यंत काही प्रतिक्रिया देता येणार नाही. परंतु न्यायालयानं असे म्हटले आहे की, जावेद अख्तर यांची तक्रार आणि खटला खूप आधीपासून दाखल झालेले आहेत. त्यामुळे आमची याचिका त्यांनी फेटाळून लावलेली आहे."

हेही वाचा -

  1. यशराजच्या महिला गुप्तहेर फ्रेंचायझीचा दिग्दर्शक ठरला, आलियासोबत शर्वरी वाघ साकारणार 'सुपर एजंट'
  2. निवडणुकीपूर्वी 'थलपथी' विजयचा राजकारणात प्रवेश, पक्षाचे नावही केले जाहीर
  3. पूनम पांडेच्या निधनावर कंगना रणौतने व्यक्त केला शोक

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.