ETV Bharat / entertainment

'लव्ह स्टोरीयाँ': करण जोहरने बनवली व्हॅलेंटाईन डेसाठी सहा भागांची मालिका - करण जोहर

Love Storiyaan: चित्रपट निर्माता करण जोहर भारतातील खऱ्या प्रेमकथेवर आधारित 'लव्ह स्टोरीयाँ' या सहा भागाच्या मालिकेची निर्मिती केली आहे. व्हॅलेंटाईन डेच्या दिवशी ही मालिका अमेझॉन प्राइम व्हिडिओवर दिसेल.

Karan Johar
करण जोहर
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : Feb 6, 2024, 12:56 PM IST

मुंबई - Love Storiyaan: करण जोहरने मंगळवारी व्हॅलेंटाईन डेला रिलीज होणाऱ्या 'लव्ह स्टोरीयाँ' ही खऱ्याखुऱ्या जीवनातील प्रेमकथांवर आधारित सहा भागांची हृदयस्पर्शी मालिका जाहीर केली. व्हॅलेंटाईन डेच्या अनोख्या प्रसंगासाठी त्याने वास्तव जीवनातील प्रेमकथांची मालिका बनवली असल्याचे त्याने इन्स्टग्रामवर शेअर केले.

'लव्ह स्टोरीयाँ' देशभरातील सहा वास्तविक जीवनातील त्यांच्या प्रेम, आशा, आनंद आणि प्रतिकूलतेवर विजय मिळवणाऱ्या जोडप्यांना फॉलो करते. ही मालिका अमेझॉन प्राईम व्हिडिओवर उपलब्ध असेल. करणने पोस्टर शेअर करत त्याला कॅप्शन दिलंय : "सच्ची मोहब्बत की सच्ची कहानी संपूर्ण भारतातून - या व्हॅलेंटाईनला तुमच्यासाठी येत आहे! 'लव्ह स्टोरीयाँ' 14 फेब्रुवारीला अमेझॉन प्राईम व्हिडिओवर.

अक्षय इंडीकर, अर्चना फडके, कॉलिन डी’कुन्हा, हार्दिक मेहता, शाझिया इक्बाल आणि विवेक सोनी या सहा दिग्दर्शकांच्या दृष्टीकोनातून या कथा मांडण्यात आल्या आहेत. करण जोहर, अपूर्व मेहता आणि सोमेन मिश्रा या कार्यकारी निर्मात्यांसोबत धर्माटिक एंटरटेन्मेंट प्रॉडक्शनने 'लव्ह स्टोरीयाँ'ची निर्मिती केली आहे. प्रिया रमाणी, समर हलर्णकर आणि निलोफर वेंकटरामन या माजी पत्रकारांनी स्थापन केलेल्या 'इंडिया लव्ह प्रोजेक्ट'च्या वास्तव जीवनातील कथांपासून ही मालिका प्रेरित आहे.

'लव्ह स्टोरीयाँ' ही मालिका 14 फेब्रुवारीला व्हॅलेंटाईन डे रोजी प्राइम व्हिडिओवर लॉन्च होईल, असे धर्माटिक एंटरटेन्मेंट प्रॉडक्शनने प्रसिद्ध केलेल्या प्रेस रिलीजमध्ये म्हटले आहे. 'कुछ कुछ होता है', 'कभी खुशी कभी गम', आणि 'रॉकी और रानी की प्रेम कहानी' यासारख्या चित्रपटांचे दिग्दर्शक जोहर म्हणाले की, "चाहत्यांना वास्तविक जीवनातील कथा सांगण्याचा धर्माटिकचा हा पहिला प्रयत्न आहे. आमच्यासाठी, 'लव्ह स्टोरीयाँ' ही खऱ्या प्रेमकथांचे अचूक सादरीकरण आहे. मालिका तिच्या सर्व प्रकारांमध्ये प्रेमाचा शोध घेते, सामान्यांच्या पलीकडे जाणाऱ्या कनेक्शनचे एक सुंदर चित्र ही मालिका रेखाटते," असे जोहरने सांगितले.

हेही वाचा -

  1. विजय देवरकोंडा आणि मृणाल ठाकूरच्या आगामी 'द फॅमिली स्टार'च्या पहिल्या गाण्याची झलक
  2. आमिर खानची मुलगी आयरा खान झाली ट्रोल ; व्हिडिओ व्हायरल
  3. रजनीकांत स्टारर 'लाल सलाम'चा ट्रेलर रिलीज ; पाहा व्हिडिओ

ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.