ETV Bharat / entertainment

जान्हवी, फरहान, राजकुमार रावसह बॉलिवूड सेलेब्रिटींनी मुंबईत केलं मतदान - Lok Sabha Election 2024 - LOK SABHA ELECTION 2024

Lok Sabha Election 2024 : महाराष्ट्रात लोकसभा निवडणुकीच्या 13 जागांसाठी सोमवारी 20 मे रोजी मतदान होत आहे. राजकुमार राव, जान्हवी कपूर, सनाया मल्होत्रा, फरहान अख्तर ​​यांच्यासह अनेक हिंदी चित्रपटसृष्टीतील सेलेब्रिटी मुंबईतील मतदान केंद्रांवर दाखल झाले आणि त्यांनी आपल्या बोटाला शाई लावलेल्या फोटोंसाठी पोज दिली.

Lok Sabha Election 2024
बॉलिवूड सेलेब्रिटींनी मुंबईत केलं मतदान (BOLLYWOOD CELEBS INSTAGRAM)
author img

By ETV Bharat Marathi Team

Published : May 20, 2024, 9:43 AM IST

Updated : May 20, 2024, 10:08 AM IST

मुंबई - Lok Sabha Election 2024 : लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यातील मतदानाला सोमवार २० मे रोजी सकाळपासून सुरुवात झाली आहे. महाराष्ट्र, उत्तर प्रदेशसह सहा राज्ये आणि दोन केंद्रशासित प्रदेशांमधील लोकसभेच्या 49 जागांसाठी मतदान होत आहे. बॉलिवूडचे सेलेब्स मतदान केंद्रावर आपला मतदानाचा हक्क बजावण्यासाठी पोहोचत आहेत. 'मिस्टर अँड मिसेस माही' स्टार राजकुमार राव, जान्हवी कपूर, सनाया मल्होत्रा, फरहान अख्तर ​​यांनी मतदान केलं आहे.

2024 च्या लोकसभा निवडणुकीसाठी मुंबईतील मतदान केंद्रावर मतदान केल्यानंतर 'मिस्टर अँड मिसेस माही' चित्रपटाचा अभिनेता राजकुमार राव आणि चित्रपटाची नायिका जान्हवी कपूर यांनी त्यांच्या शाई लावलेल्या बोटांनी पापाराझींसाठी पोझ दिली.

राजकुमार राव आणि जान्हवी कपूरनं केलं मतदान

मतदान केल्यानंतर बॉलीवूड अभिनेता राजकुमार रावनं प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना सांगितलं की, "आपली सर्वांची देशाप्रती मोठी जबाबदारी आहे, आपण मतदान केलं पाहिजे. आमच्या माध्यमातून जर लोकांवर प्रभाव टाकता येत असेल तर मतदानाचे महत्त्व लोकांना जागृत करणं हीच सर्वात मोठी गोष्ट आहे. त्यामुळे निवडणूक आयोगाने राष्ट्रीय आयकॉन म्हणून माझी निवड केल्याबद्दल मला खूप आनंद झाला आहे."

राजकुमार रावनं देशातील जनतेला आवाहन करत म्हटले की, "मी सर्वांना आवाहन करतो की कृपया बाहेर या आणि मतदान करा. आपला देश प्रगतीपथावर जावा, चमकावा अशी आपली सर्वांची इच्छा आहे. तो आधीच चमकत आला आहे. मला खात्री आहे की तो आणखी चमकेल." मतदान केल्यानंतर जान्हवी कपूर तिच्या कारकडे जात असताना मीडियाला बाईट देताना 'कृपया बाहेर या आणि मतदान करा' असा संदेश दिला.

त्याचप्रमाणे अभिनेता शाहिद कपूरही एका मतदान केंद्रावर दिसला. सान्या मल्होत्रा आणि फरहान अख्तर यांनीही लोकशाही प्रक्रियेत भाग घेतला. फरहान सोमवारी पहाटे त्याची बहीण झोया अख्तर हिच्याबरोबर सध्या सुरू असलेल्या लोकसभा निवडणुकीदरम्यान मतदानाचा हक्क बजावण्यासाठी गेला होता.

मुंबईतील लोकसभेच्या 6 जागांसाठी पाचव्या टप्प्यासाठी निवडणूक होत आहे. मुंबई उत्तर, मुंबई उत्तर पश्चिम, मुंबई उत्तर पूर्व, मुंबई उत्तर मध्य, मुंबई दक्षिण आणि मुंबई दक्षिण मध्य या जागा आहेत. पाचव्या टप्प्यात सुरू असलेल्या निवडणुकीचा भाग असलेल्या महाराष्ट्रातील इतर मतदारसंघांमध्ये धुळे, दिंडोरी, नाशिक, कल्याण, पालघर, भिवंडी आणि ठाणे यांचा समावेश आहे.

हेही वाचा -

  1. वयाच्या 13 व्या वर्षी फोटो ॲडल्ट साइटवर झाले होते लीक...; जान्हवी कपूरनं केला धक्कादायक खुलासा - JANHVI KAPOOR SEXUALISED AT 13
  2. मुंबईत पार पडणाऱ्या मतदानाकरिता पोलिसांसह प्रशासनाकडून तयारी, विचारवंतांकडून मतदानाचं आवाहन - Mumbai lok sabha voting
  3. लोकसभा निवडणुकीच्या पाचव्या टप्प्यासाठी आज होणार मतदान, महाराष्ट्रातील 'या' नेत्यांमध्ये होणार 'टाईट-फाईट' - Lok Sabha Elections 5th Phase

Last Updated : May 20, 2024, 10:08 AM IST
ETV Bharat Logo

Copyright © 2025 Ushodaya Enterprises Pvt. Ltd., All Rights Reserved.